गांधारीचे वंशज आणि MSRTC

                     मी नुकताच कर्नाटक राज्य परीवहन महामंडळाच्या बसेसबाबत मला आलेला अनुभव
फेसबुकवर पोस्टचा स्वरुपात शेअर केला होता. उत्तरादखल मला  आपल्या भारतातील सर्व राज्य परीवहन महामंडळाची ASRTU (All State Road Transport Union) नावाची एक शिखर संस्था असून आंतरराज्य परीवहनाबाबत तीचे काही मार्गदर्शक तत्वे आहेत, अशी एक टिपप्णी आली . मला आपली महाराष्ट्राची एसटी प्राणप्रिय असल्याने ती नक्की काय तत्वे आहेत ?हे माहिती करुन घेण्यासाठी जेव्हा त्या संस्थेच्या संकेतस्थळावर चौकशी केल्यावर अनेक बाबी समोर आल्या, त्या तूम्हाला सांगण्यासाठी आजचे लेखन .
या तत्वातील महत्त्वाचे सुत्र म्हणजे जेव्हा एखादे राज्य परीवहन महामंडळ स्व राज्य सोडून अन्य राज्यात सेवा देते, त्यावेळेस आपल्या स्व राज्यातील वाहतूक दर काहीही असो,आपणास संबधीत राज्यातील परीवहन सेवेतील दरांइतके दर ठेवणे क्रमप्राप्त आहे.
                         माझ्या वैयक्तीक अनुभवाच्या आधारे मी सांगू ईच्छितो की, महाराष्ट्रात येणाऱ्या गुजरात आणि कर्नाटक परीवहन महामंडळाच्या बसेस हा नियम पाळतात. मात्र गोवा आणि तेलंगणा या राज्य परीवहन महामंडळाकडून या नियमाला बिनदिक्कत हरताळ फासला जातोय.या दोन्ही परीवहन सेवांकडून पुणे ते सोलापूर आणि पुणे ते कोल्हापूर या मार्गावर आपल्या MSRTC पेक्षा तब्बल 40रुपये कमी घेतले जात आहेत .(जिज्ञांसूनी त्या त्या  SRTCच्या संकेतस्थळावर जावून अधिक चौकशी करावी ) यावर आपली एसटी काहीच कार्यवाही करत नाही . महाभारतात आपल्या अंधपतीच्या भक्तीप्रित्यर्थ देवी गांधारीने आपल्या डोळ्यावर काळी पट्टी बांधली होती . परीणामी आपल्या पुत्रांची अयोग्य पाउले तीला दिसली नाही. परीणामी त्यांचा निर्वंश  झाला .अन्य राज्यातील परीवहन सेवा आपल्या MSRTC च्या जागेत ,आपल्या बसेसच्या शेजारी त्यांची बस लावून व्यवसाय करत आहेत
                            .आपण एकवेळ खासगी बसवाहतूकदारांना बसस्थानकापासून काही अंतरावरच व्यवसाय करावा असे बंधन घालू शकतो. मात्र या इतर राज्यातील परीवहन सेवांना असे बंधन घालणे निव्वळ अशक्य आहे .आपल्या महाराष्ट्र राज्य परीवहन महामंडळाकरीता ही करा अथवा मरा असी स्थिती आहे . आपली एसटी
अनेक लोकांच्या घरची चूल पेटवते .त्यामुळे ती टिकलीच पाहिजे . तूम्हाला काय वाटते ? ते या ब्लॉग पोस्टच्या खाली नमुद करा .उठा चला 70वर्षाचा वारसा सांगणारी आपली एसटी वाचवूया.  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?