अनेक दुर्लक्षित पर्यटनस्थळे असणारा जिल्हा ........ जळगाव

       
  आपण अनेकदा एखाद्या गोष्टीला एखाद्या
विशिष्ट चष्म्यातूनच बघतो .  त्या गोष्टीला इतर अनेक पैलू  असू शकतात हे आपल्या गावीही नसते . उदाहरणार्थ जळगावला गेल्यावर पर्यटन स्थळे बघायची असल्यास जा अजिंठा वेरूळला वगैरे . मात्र जळगावला गेल्यावर अजिंठा आणि वेरूळ सोडून अनेक बघण्यासारखी स्थळे आहेत जसे साडेतीन गणपतींपैकी एक पूर्ण पूर्ण गणपतीचे स्थान असणारे पद्मालय, ( पुणे परिसरात असणाऱ्या अष्टविनायकांखेरीज महाराष्ट्रात गणपतींची साडेअकरा स्थाने आहेत.  ज्यामध्ये नागपूर परिसरात
असणाऱ्या 8 गणपतीचा तसेच या साडेतीन गणपतींचा समावेश होतो ), तसेच उनपदेव आणि मनुदेवी या गरम पाण्याच्या झऱ्यांच्या ठिकाणासह अमळनेर येथील भारतातील मोजक्या ठिकाणी असणाऱ्या मंगळाचे  मंदिर वगैरे . मी नुकतीच यातील अमळनेर येथील मंगळाच्या मंदिराखेरीज अन्य तीन ठिकाणी भेट दिली . त्या प्रसंगी मला जाणवलेले तेथील स्थानमहत्व तुम्हाला सांगण्यासाठी आजचे लेखन.
          मी नेहमीप्रमाणे माझ्या प्रवासाची  सुरवात केली ती  शनिवारी रात्री . मी नेहमी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसने प्रवास करतो.  मात्र  नाशिकहून जळगावासाठी  शेवटची बस सायंकाळी सात वाजता असल्याने आणि मी त्या पर्यंत माझ्या नैमिक्तिक कामातून मोकळा होत नसल्याने मला  शेवटी रेल्वेच्या पर्याय निवडावा लागला  . तर नाशिकरोडहून मी त्यादिवशी  मंगला एक्क्सप्रेसने मनमाडला पोहोचलो . आणि मनमाड मधून झेलम एक्सप्रेसने जळगावला पोहोचलो . मला नाशिकहून विदर्भ एक्सप्रेसने मनमाडला न थांबता जळगावला जाता आले असते मात्र विदर्भ एक्सप्रेसने जळगावला पोहोचण्याची वेळ मला काहीसा गैरसोयीचा वाटल्याने मी हा मार्ग निवडला . असो . तर मी जळगावला पोहोचल्यावर, जळगावच्या जिल्हा पेठ भागातील नवीन बस स्टॅन्ड परिसरातील लॉज निवडून माझ्या त्या दिवशीचा प्रवास
थांबवला .दुसऱ्या दिवशी अर्थात रविवारी सकाळी तयार झाल्यावर मी तयार होऊन माझ्या स्थलदर्शनाला सुरवात केली . मी बसस्टँडवर पोहोचल्यावर जळगावहून पद्मालय मार्गे एरंडोल ला जाणारी बस तयारच होती . त्यात बसून माझ्या जळगाव जिल्हा दर्शनाची सुरवात झाली .
मित्रानो साडेतीन गणपतींपैकी एक स्थान असणाऱ्या पद्मालय या ठिकाणी पोहचण्यासाठी धुळे-जळगाव मार्गावरील एरंडोल हे ठिकाण खूप सोईचे आहे . तेथून सुमारे पंधरा वीस मिनिटात आपण या ठिकाणी पोहोचू शकतो . किंवा जळगावहून या ठिकाणी येण्यासाठी बसेस देखील आहेत . जळगावहून एरंडोल या ठिकाणी जाण्यासाठी दोन मार्ग आहेत . त्यातील एका मार्गावर पद्मालय आहे . एका सुंदर तळ्याच्या ठिकाणी हे मंदिर आहे . या ठिकाणी मंदिर संस्थनामार्फत राहायची सोय देखील करण्यात आली आहे . या ठिकाणचे वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी उजव्या आणि डाव्या दोन्ही सोंडेचे गणपती  एकाच गर्भगृहात विराजमान झालेले दिसतात . जळगावहून येताना  खुटवड  या
गावानंतर एक पाट लागतो . तो पाट ओलांडल्यावर डावीकडे एक रस्ता लागतो या रस्त्याने सुमारे सहा किलोमीटर गेल्यावर मंदिर लागते . मंदिर दगडी बांधणीतील असून सध्या या मंदिराला ऑईलपेंट देण्यात आला आहे . ज्यामुळे याचे मूळ सौदर्य काहींचे कमी झाले आहे असे मला वाटते . असो
मंदिर दर्शन झाल्यावर मी पुढील प्रवास सुरु केला . मंदिरातून बाहेर आल्यावर मी एका सहा आसनी रिक्षातून एरंडोलला आलो . तेथून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसने धरणगावाला आलो धरणगावाहून एका खाजगी मिनीबसने चोपडा या गावी आलो .
                    सन 1860साली नगरपरिषद स्थापन झालेले चोपडा शहर  मी बघितलेल्या काही छोट्या आणि टुमदार तसेच शांत शहरांपैकी एक आहे बसस्टँडपासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या नगरपरिषदेच्या कार्यालयासमोर असणारे मंदिर ,त्या मंदिराशेजारीच  जुन्या काळाची आजही आठवण करून देणारी दगडी वास्तू सारेच मन प्रसन्न करणारे . सध्या ज्या प्रकारे  कोणत्याही प्राचीन दगडी वास्तुंना ऑईलपेंट देऊन त्यांचे विद्रुपीकरण केले जाते . तसे  न केल्याने चोपड्याच्या नगरपरिषदेच्या कार्यालयाजवळील दगडी वास्तू अजूनच नजरेत भरते . नगरपरिषदेच्या शेजारून जाणारा रुंद रस्ता गावातील रस्ते कसे असतील? याची चुणूक दाखवतो .
चोपडा दर्शनानंतर मी माझा मोर्चा माझ्या अंतिम पर्यटनस्थानकडे अर्थात उनपदेव आणि मनुदेवी या गरम पाण्याच्या स्थळांकडे फिरवला . चोपड्याहून यावल अथवा जळगावला जाणाऱ्या बसमधून आपण या ठिकांणांहून जवळ असणाऱ्या अडावत या ठिकाणी जाऊ शकतो . अडावत हे ठिकाण चोपड्याहून सुमारे वीस किलोमीटर दूर आहे .अडावत या ठिकाणहून दोन्ही ठिकाणी जाण्यासाठी खाजगी गाड्यां करणे क्रमप्राप्त आहे .
श्रावणात होणाऱ्या यात्रेचा अपवाद वगळता या ठिकाणी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची सोय नसते . उनपदेव  या ठिकाणी महादेवाची पिंड असल्याने या ठिकाणी सोमवारी विशेष गर्दी असते . त्यावेळेस येथे शेअर ऑटोचा पर्याय उपलब्ध असतो . इतरवेळी आल्यास स्पेशल रिक्षाशिवाय गत्यंतर नाही . चोपड्याहून अडावत या गावात शिरताना एक पूल लागतो . या पुलाच्या गावाकडील बाजूने एक रस्ता आपणास दिसतो जो आपणास उनपदेव या ठिकाणी घेऊन जातो . सदर परिसर वनखात्याच्या यावल परिक्षेत्रात येतो . या ठिकाणी वन खात्यामार्फत पर्यटनासाठी खूप सोइ करण्यात आलेल्या आहेत , ज्यामध्ये विश्रामगृहाची सोय  विशेष महत्वाची आहे . या ठिकाणचे महत्व धार्मिकदृष्ट्या अधिक असले तरी पर्यटनाच्या दृष्टीने देखील हा परिसर खूप उत्तम रीतीने विकसित करण्यात आला आहे . या ठिकाणी लहान मुलांना खेळण्यासाठी बागेची सोय करण्यात आलेली आहे . उनपदेवाचा परिसरात एक छोटीसी गुहा देखील आहे . गुहेत तीन मूर्ती आहेत  उनपदेव नंतर या ठिकाणाहून जवळच असणाऱ्या मनुदेवीला गेलो . मनुदेवी हे ठिकाण उनपदेवपेक्षा थोडे मोठे आहे . मला उनपदेवपेक्षा मनुदेवीला अधिक गर्दी आढळली . न्याहारीच्या सोयी या मनुदेवीला आहेत उनपदेवला न्यहारीच्या सोयी नाहीत . यामुळे प्रथम उनपदेव करून नंतर मनुदेवीला भेट देणे अधिक सोईस्कर आहे . . उनपदेव आणि मनुदेवीचा सर्व परिसर उत्तम आहे .दोन्ही ठिकाणी मनसोक्त  फिरल्यावर मी परत चोपड्याला आलो . आणि तेथून अमळनेर धुळे मार्गे नाशिकला येणाऱ्या बसमधून माघारी फिरून परत नाशिकला आलो

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?