भारतीय रेल्वेची अपरिचित कहाणी भाग 5

आज 16 एप्रिल 2020 रोजी आपली भारतीय रेल्वे 167वर्षाची झाली . त्या निमित्याने सर्वप्रथम समस्त रेल्वे कर्मचारी आणि समस्त भारतीयांना मनापासून लक्ष लक्ष शुभेच्छा . मित्रानो आपली भारतीय रेल्वे जगातील सर्वात मोठा सार्वजनिक उपकक्रम आहे हे आपण जाणताच . विविध प्रकारच्या एकंदरीत 17 प्रकारच्या प्रवाशाची वाहतूक करणाऱ्या गाड्या या  आपल्या रेल्वेकडून चालवल्या जातात . ( या सर्व गाड्यांची माहिती मी भारतीय रेल्वेची अपरिचित कहाणी भाग 3आणि 4 मध्ये दिलीच आहे .)या 17 प्रकारच्या गाड्यांमध्ये जरी काही  तांत्रिक अडचणीमुळे 24 कोचेस असली तरी ते सर्व एकाच प्रकारचे नसतात . त्यांचे विविध प्रकार त्याचा स्वरूपानुसार पडतात . आता ते पाहूया . 
कोचेसच्या खाली कोणत्या प्रकारची चाकांची रचना आहे त्यानुसार त्यांची को -को प्रकारची रचना असलेले आणि बो -बो प्रकारची रचना असणारे अशी विभागणी करता येते . याचा प्रमाणे त्याच्याखाली डब्यातील पंखे चालवण्यासाठी जनरेटर आहे का ? डब्याचे  स्पेंशन कसे आहे यांनुसार आय सी एफ कोच आणि एल येऊ बी कोच असे दोन प्रकार पडतात .   पारंपरिक निळ्या रंगातील कोचेस ज्याला आय सी एफ (इंट्रीग्रेटेड कोच फॅक्टरी )  म्हणतात त्याच प्रमाण कमी करून सध्या आरामदायी असणाऱ्या एलएचबी ची निर्मिती सध्या भारतीय रेल्वे मोठ्या प्रमाणात करता आहे . एलएचबी प्रकारच्या कोचेसचा रंग राजधानी प्रकारच्या रेल्वेला असतो त्या प्रमाणे लाल असतो . यामध्ये डब्याखाली जनरेटर नसल्याने या प्रकारच्या रेल्वेत स्वतंत्र जनरेटर दिलेले असतात त्याच प्रमाणे आयसीएफच्या जवळ जाणारा पण एलएचबी सारखी  जाणीव करून देणारा प्रकार सुद्धा भारतीय रेल्वेत आढळतो तो म्हणजे अनुभूती कोच . ज्याचा रंग कॉफी रंगासारख असतो . हि झाली त्यांच्या रचनेनुसारची विविधता आता बघू त्यात देण्यात येणाऱ्या सुविधेतेनुसार पडणारे प्रकार . 
फर्स्टएसी भारतीय रेल्वेची सर्वात महाग सेवा म्हणून या कडे बघावे लागेल . फक्त या प्रकारच्या डब्यातून आपण आपले पाळीव प्राणीआपल्याबरोबर  नेऊ शकतो . याचे आरक्षण करताना सीट क्रमांक देण्यात येत नाही  गाडी सुटण्याचा वेळेस आपण जे कामपार्टमेन्ट निवडले असते . त्यानुसार आपणास सीट  दिले जातायत . याला इंग्रजी आद्याक्षर A सूचित केले जाते . या ठिकाणी केबिन दिलेली असते .या प्रकारच्या डब्यामध्ये प्रवाश्याना बेडशीट आणि चादर रेल्वेकडून पुरवले जातात . जे आपण घरी घेऊन जावो शकतो 
टू टायर एसी या मध्ये केबिन दिलेली नसते . तसेच या ठिकणी रेल्वेत देण्यात येणाऱ्या वस्तू आपण घरी घेऊन येऊ शकत नाही बाकी याची रचना फास्टएसी सारखीच असते . याचे भाडे फर्स्ट रसोई पेक्षा कमी असते . याठिकाणी आपण आपल्या बरोबर आपले पाळीव प्राणी घेऊन जाऊ शकत नाही . 
थ्री टायर एसी या मध्ये प्रवाश्याना फक्त  एसीत झोपण्याची सोय केलेली असते . अन्य कोणत्याही विशेष सुविधा रेल्वेमार्फ़त देण्यात येत नाही . या प्रकारच्या डब्यात 64 प्रवाश्याना झोपण्याची सोय केलेली असते .
यातील एक उपप्रकार म्हणता येईल अशा प्रकार गरीब रथ प्रकारात आढळतो . ज्यात बाजूच्या बाजूस दोन ऐवजी तीन सीट असतात . म्हणजेच एका कंपार्टमेंट मध्ये 9 लोक प्रवास करतात .  
एक्झेक्युटिव्ह क्लास चेअर कार या मध्ये एका रांगेत 2*2अशी रचना केलेली असते . हा प्रकार सकाळी मुख्य स्थानकातून निघून सायंकाळी पुन्हा मुख्य स्थानकात येणाऱ्या शताब्दी आणि जनशताब्दी प्रकारच्यागाड्यांमध्ये आढळतो . 
एसी चेअरकार मध्यम अंतरावर प्रवास करणाऱ्या लोकांना समोर ठेवत याची निर्मिती करण्यात आलेली आहे . ज्यामध्ये एक्झेक्युटिव्ह क्लास चेअर कार पेक्षा कमी भाडे असते मात्र याची रचना 2*3 अश्या प्रकारे एका प्रकारे  4 सीटची असते . 
सीटिंग कार  : एसी चेअर कर सारखी याची रचना असते मात्र यामध्ये एसी नसतो . 
सलीपर कोच यामध्ये एसी शिवाय प्रवाश्याना झोपून प्रवास करता येतो . 
जनरल कोच कोणीही  प्रवाशी यातून प्रवास करू शकतो . याची तिकीट सर्वात कमी असते . 
दीनदयाळ कोच मोदी सरकारच्या काळात सुरु करण्यात आलेल्या या प्रकारच्या कोचेसचे भाडे जनरल कोच सारखेच असते . मात्र यामध्ये अनेक आधुनिक सोया सुविधा देण्यात आलेल्या असतात . 
तर मित्रानो आवडली ना / आपली भारतीय रेल्वे . जाताजाता तुम्हा सर्वानापुन्हा एकदा  भारतीय रेल्वेच्या 167 वर्धापन दिनाच्या शुभेच्या 


 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?