ओळख एका डॉनच्या जडणघडणीची

                       दाऊद इब्राहिम कासकर ....... . मुंबईच्या पोलिस दलातील आचरणाने धार्मिक वृत्तीचा असलेल्या  कॉन्स्टेबल  इब्राहिम कासकर याचा मुलगा  अर्थात भारताला हवा असणारा डॉन दाऊद इब्राहिम . या दाऊदविषयी इंग्रजी भाषेत बरेच काही लिहून आलेले आहे . मात्र मराठी मुलखात जन्मलेल्या या डॉन विषयी मराठीत तसे कमीच लिहून आलेले आपणास दिसते .त्यातही मुळातील इंग्रजी भाषेतील  मजकुराचा मराठीत केलेला अनुवादाचं अधिक . याच अनुवादित मजकुराच्या मालिकेतील एक महत्त्वाचं पुस्तक म्हणजे ज्यावर आधारित बॉलीवूडमध्ये शूट आऊट लोखंडवाला हा चित्रपट तयार आला ते पुस्तक अर्थात डोंगरी ते दुबई . मेहता प्रकाशनाने प्रकाशित केलेले हे पुस्तक नुकतेच माझ्या वाचनात आले . ओघवती सहज सोप्या मराठीत अनुवादित झालेले हे पुस्तक  त्याच्या भाषाशैलीमुळे पाहिल्या बरोबरच मनाचा ठाव घेते
              अनुवादकाचे मनोगत , अनुवादित पुस्तक प्रकाशित करणाऱ्या प्रकाशकाचे हितगुज अशी इतर अनुवादित पुस्तकात दिसणारी आणि मूळच्या पुस्तकात नसणारी वाढीव पाने या पुस्तकामध्ये नाहीत हे या पुस्तकाचे वैशिष्टच म्हणता येईल . हे पुस्तक  दोन भागात विभागले असून दोन्ही भागात विविध प्रकरणाच्या माध्यमातून स्वातंत्र्योत्तर मुंबईत गुन्हेगारीची सुरवात कशी झाली हे सांगत दाऊद इब्राहिमच्या गुन्हेगारी विश्वाचा आढावा घेण्यात आला आहे .  ज्यामध्ये सदर पुस्तकाच्या एका प्रकरणात  या पुस्तकाच्या लेखकाने घेतलेली दाऊद इब्राहिमची मुलाखत समाविष्ट केलेली आहे . तसेच दाऊद इब्राहिम च्या गुन्हेगारी कारकिर्दीत त्याचे सहकारी अथवा प्रतिस्पर्धी असलेल्या छोटा राजन, अबू सालेम, अरुण गवळी   आदी गुन्हेगारीच्या कारकिर्दीवर  देखील प्रकाश टाकण्यात आला आहे. पुस्तकच्या सुरवातीला मुंबईतील टोळीयुद्ध कसे सुरु  झाले ? करीमलाला , वरदराजन , हाजी मस्तान आदींचा उदय  कसा  झाला त्याच बरोबर मुंबईतील टोळीयुधद यावर प्रकाश टाकण्यात आला आहे.
                       दाऊदच्या बाबतीत बोलायचे झाल्यास जो या पुस्तकाच्या मूळ विषय आहेया बाबत बोलायचे झाल्यास, दाऊदच्या उद्य कशा आणि कोणत्या प्रकारे झाला ? त्याचा पहिला गुन्हा कोणत्या प्रकारे झाला ?दाऊदला मुंबईतील एका पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी काट्याने काटा काढणे या म्हणीचा आधार घेत मुंबईतील संघटित गुन्हेगारी मोडण्यासाठी त्याचा कश्या प्रकारे वापर केला ? त्याचे पहिले अयशस्वी प्रेम आणि दुसऱ्या मुलीवरचे यशस्वी प्रेम याबाबरोबरच   दाऊदने कोणत्या स्थितीत मुंबईतून पहिल्यांदा दुबईला पलायन केले ? दुबईतून कराचीला कोणत्या स्थितीत गेला ? अमेरिकेवरील हल्ल्यानंतर , ओसामा बिन लादेनच्या मृत्यनंतर त्याने कराची कशी सोडली ? नंतर पुन्हा कराचीला कसा आला ?   पुस्तकाचा शेवटी सदर पुस्तक निर्मितीसाठी लागलेल्या संदर्भाचा उल्लेल्ख करण्यात आलेला आहे .
            एकंदरीत पुस्तक आपल्या गुन्हेगारी  विश्वाच्या ज्ञानात  मोठ्या प्रमाणात भर घालते . गुन्हेगारीच्या विश्वात जाण्यासाठी नव्हे तर त्यापासून कसे वाचावे ? याचे मार्गदर्शन होण्यासाठी हे पुस्तक वाचावेच . मित्रानो गुन्हेगारीचे  विश्व हे एकमार्गी आहे . यात फक्त जाण्याचा  मार्ग आहे . एकदा या विश्वात शिरल्यावर कितीही इच्छा असली तरी मागे फिरता येत नाही . मराठीत अनेक व्यक्तींची चरित्रे आहेत मात्र हि आयुष्यात कोणत्या प्रकारे चालावे हे सांगतात . मात्र आयुष्य कोणत्या प्रकारे नसावे ? हे सांगणारे हे पुस्तक प्रत्येकाने किमान एकदा तरी वाचावेच . 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?