वाचावीच अशी कांदबरी : महाश्वेता

          कोड........  मिलॅलीन  नामक एका अंतस्रावाच्या कमतरतेमुळे होणारी व्याधी . शरीराच्या त्वचेच्या रंग या मध्ये बदलतो . या खेरीज माणसामध्ये कोणतेही बदल या मध्ये होत नाही . मात्र हे झाले व्यक्तीच्या शारीरिक बदलांविषयी . मात्र आपल्या भारतासारख्या रुढीप्रिय देशामध्ये संबंधित देशामध्ये त्या व्यक्तीचे मनोविश्व या मध्ये अक्षरशः ढवळून निघते . सध्या सन 2020 मध्ये या मध्ये काहीसा बदल झालेला असला तरी सन 1960 च्या सुमारास हे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात होते . आणि  जर व्यक्ती जर महिला असेल तर विचारयलाच नको ,   लग्न झालेल्या महिलांना तर याचीच झळ मोठ्या प्रमाणत बसते 
.     कोडंच निमित्त करून संबंधित महिलेचा काहीही अपराध नसताना तिला कायमस्वरूपी माहेरी पाठवणारी मंडळी अश्या  महिलेचे जीवन अक्षरश नकोसे करतात . अश्याच एका अभागी स्त्रीची कथा म्हणजे व्यवसायाने डॉक्टर असलेल्या सुमती क्षेत्रमाडे यांनी पन्नासच्या दशकात लिहलेली मात्र आजच्या सन 2020मध्ये सुद्धा काही लागू असणारी कादंबरी अर्थात महाश्वेता .                                                               सुमारे 300 पानांमधून उलगडणारी ही कांदबरी मी नुकतीच वाचली .तीस प्रकराणातून सुधा या स्त्रीची उलगडणारी कथा प्रत्येकाने किमान एकदा तरी वाचावीच ही कांदबरी .    कांदबरीच्या सुरवातीला प्रास्ताविकेत कोड या व्याधीविषयी काही चर्चा केलेली आहे .  याज्यामुळे आपणास कोड या विषयीची शास्त्रीय माहिती मिळते . सुमारे पंधरा पाने ही चर्चा करण्यात आली आहे .
                                            सदर कादंबरीची सुरवात होते कोल्हापूर येथील एका पिढीजात  काहीं गावांची  इमानदारी असलेल्या देशपांडे या घराण्याच्या सुखी संसंसारापासून .
वृत्तीने बंडखोर असलेल्या आणि घराण्याचा पारंपरिक बडेजावपासून स्वतःला दूर ठेवू इच्छिणारा माधव हा या कांदबरीचा नायक . आणि त्यांची पत्नी म्हणजे सुधा जीला लग्नानंतर दोन वर्षाने कोडाची सुरवात होते . आणि आपल्या कांदबरीची सुरवात होते . पारंपरिक धार्मिक वृत्तीच्या देशपांडे घराण्यात यामुळे प्रचंड वादळ उठते . परिणामी आपली वेगळी वाट चोखाळू इच्छिणारा माधव आपल्या प्रिय पत्नीचा त्याग करतो . तो परत आपल्या पत्नीचा स्वीकार करतो का हे   बघण्यासाठी महाश्वेता ही कादंबरी वाचावयासच हवी . मग वाचता ना ही कांदबरी ?

   

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?