भारतीय रेल्वेची गगनभरारी

सध्या सर्वत्र करोनाची दहशत असताना काही मनाला प्रसन्न करणाऱ्या घटना देखील घडत आहेत . ज्यामध्ये भारतीय रेल्वेने घेतलेली  गगनभरारी  ही एक प्रमुख घटना आहे.  भारतीय रेल्वेने दिनांक 25 एप्रिल 2020 रोजी आपल्या आधीच्या WAG 9H या इंजिनात अनेक बदल करत तयार केलेल्या WAG 9HH या नव्या इंजिनाची यशस्वी छाननी करून एक मैलाचा दगड सैर केला . आता काही प्रशासकीय पातळीवरच्या पूर्तता केल्यावर हे इंजिन भारतीय रेल्वेत दाखल करण्यात येईल . ज्यामुळे भारतातील रेल्वेमार्फत करण्यात येणारी मालवाहतूक अधिक जलद गतीने म्हणजाईच 100किलोमीटर प्रति तास या वेगाने करणे सहजशक्य होईल . सध्या भारतीय रेल्वेमार्फ़त ज्या वेगाने मालवाहतुक केली जाते तो वेग आहे फक्त 20 ते 25 किमी प्रति तास . म्हणजेच या मुळे भारतीय रेल्वे यामुळे किती पुढे जाईल हे सहज लक्षात येते . भारतीय मालवाहतुकीसाठी क्रांती
म्हणून ज्या DEDICATED FRIDGE CORRIDGE  (DFC)कडे बघितले जाते . त्यासाठी या प्रकारची इंजिन येणे अत्यावश्यक होते . यामुळे भारतीय रेल्वेची गगनभरारी म्हणूनच याकडे बघणे अत्यावश्यक आहे .
                        भारतीय रेल्वेलासर्वाधिक महसूल हा मालवाहतुकीतून मिळतो . मात्र प्रवाशी गाड्यांच्या प्रचंड संख्येमुळे आणि त्यांना रेल्वेमार्गावर अधिक प्राधान्य देण्याचा प्रघातामुळे आपल्या भारतात मालवाहतुकीसाठी रेल्वे वापरणे हे वेळखाऊ बनले होते . त्यामुळे भारतीय रेल्वे टिकवण्यासाठी DFCअत्यंत आवश्यक आहे .  त्याला या नव्या रेल्वे इंजिनामुळे
अधिकची बळकटी येणार आहे . रेल्वे भारतासारख्या खंडप्राय देशात सर्वसामान्यांच्या देशांर्तगत प्रवाश्यासाठी असणे अत्यावश्यक आहे . रस्तेमार्गे प्रवास करणे आपल्या भारतासारख्या खंडप्राय देशात अत्यंत त्रासदायक आहे . या सर्व बाबींचा विचार करता आपणास  भारतासाठी या इंजिनाची चाचणी यशस्वी होणे किती महतवाचे आहे . हे समजते
                         WAG 9HHया इंजिनच्या तांत्रीक मुद्यांचा विचार करता यामध्ये प्रत्येकी 1000 हॉर्स पॉवरच्या 9 असतील . ज्या इंजिनापासून हे नवीन इंजिन तयार करण्यात आली आहे त्या WAG 9H या इंजिनापेक्षा ट्रॅक्शन मोटार ,ट्रॅक्शन कन्व्हटर , बोगी , आदी गोष्टीमध्ये बदल करण्यात आला आहे
                     भारतीय रेल्वेने गाठलेल्या या मैलाचा दगडांमुळे भारतीय मालवाहतुकीसाठी अनेक संधी निर्माण झालेल्या आहे . त्याबद्दल या निर्मिती प्रक्रियेत गुंतलेल्या सर्वांचे अभिनंदन . त्यांनी भविष्यात असेच अनेक शिखरे पादाक्रांत करावी अशी सदिच्छा व्यक्त करून सध्यापुरते थांबतो . 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?