"उत्तमांची ते घ्यावे

       काही दिवसांपूर्वीची ही गोष्ट आहे . काही अपरिहार्य कारणास्तव मी गुजरात राज्य परिवहन महामंडळाच्या बसने प्रवास केला . या बस प्रवासादरम्यान मला आढळलेली एक प्रमुख गोष्ट म्हणजे त्यांच्या तिकिटावर देण्यात येणारी माहिती . मित्रानो त्या तिकिटावर मला मी प्रवास करत असणाऱ्या ठिकणादरम्यान किती किलोमीटर अंतर आहे , याची माहिती देण्यात आली होती . आपल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसच्या तिकिटांवर अशी माहिती देण्यात येत नाही . आपल्या महाराष्ट्र राज्य परिवहन बसेसच्या तिकिटांवर बसेसचे टप्पे देण्यात आलेले असतात . एका टप्यासाठी अमुक इतकें भाडे त्यामुळे त्यामुळे एकूण टप्पे गुणिले एका टप्याचे भाडे बरोबर इतके भाडे अशी
रचना असते . माझ्या मते आर्थिक सोयीसाठी आपली पद्धत अधिक सयुक्तिक असली तरी प्रवाश्यांच्या एकूण सोयीसाठी प्रवाश्याना आपण एकूण किती अंतर जाणार आहोत हे कळणे चांगले नाही का ? गाडयांची सरासरी गती लक्षात घेऊन आपणास किती वेळ लागणार आहे ? याची माहिती त्यामुळे सहजतेने लक्षात येते .
           समर्थ रामदास स्वामी  यांचे "उत्तमांची ते घ्यावे मिळमिळीत ते  टाकून द्यावे " असे एक वाचन सुप्रसिद्ध आहे . त्या वचनानुसार गुजरात राज्य परिवहन महामंडळाची ही पद्धत आपण घेयला काय हरकत आहे ?. माझ्या मते हि पद्धत ;अमलात आली तर प्रवाश्यांच्या सोयीसाठी हे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे ब्रीदवाक्य खऱ्या अर्थाने सार्थ होईल , आपणास काय वाटते ? यामुळे तिकीटाची लांबी वाढण्याची सुतराम शक्यता नाही . त्यामुळे यामुळे कागद जास्त लागून महामंडळाच्या खर्च वाढेल हि भीती  अनाठायीच म्हणावी लागेल . याला
साठी शाईपन  जास्त लागणार नाही . त्यामुळे किमान प्रायोगिक तत्वावर हि योजना अमलात आणण्यासाठी काहीच अडचण नाही . आणि जर काही अडचण असल्यास ती फक्त नवीन योजना राबवण्यासाठी लागणाऱ्या इच्छाशक्तीचा अभाव हीच असू शकते . आपणास काय वाटते ? आपल्या भारतीय रेल्वेच्या तिकिटावर देखील आपल्या प्रवासाच्या किलोमीटरची नोंद केलेली असते . या एका छोट्याशा गोष्टीमुळे महामंडळाचा काहीही तोटा होणार असल्याचे प्रथमदर्शनी तरी आढळत नाही . उलटपक्षी झालाच तर प्रवाश्यांचा फायदाच होणार आहे . तर ही छोटीसी सुरवात करायची सुबुद्धी महामंडळाला होवो अशी सदिच्छा व्यक्त करून सध्या पुरते थांबतो .


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?