अबतक 531

   
     आज 28 मे 2020 अर्थात महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने  सर्वात मोठ्या असणाऱ्या अहमदनगर जिल्ह्याचे मुख्यालय असणाऱ्या अहमदनगर शहराचा 531वा वाढदिवस . सध्या प्राप्त असणाऱ्या इतिहासाच्या पुराव्यानुसार अहमदनगर शहराची स्थापना 28 मे 1490 साली झाली  त्या अर्थाने आजच्या दिवशी अहमदनगर शहर 531 वर्षाचे झाले . त्या निमित्याने समस्त अहमदनगरवासीयांचे अभिनंदन .
            अहमदनगर एकेकाळचे जगातील सर्वात उत्तम शहर . आताच्या काळात आपण जसे मुंबईचे शांघाय करू असे म्हणतो . त्याप्रमाणे जगातील राज्यकर्त्यांनी आम्ही आपल्या शहराचे अहमदनगर करू असे एकेकाळी  निवडणुकीत वचन द्यावे असे शहर .. आपल्या महाराष्ट्राची एसटी पहिल्यांदा ज्या दोन शहरादरम्यान धावली त्यापैकी एक शहर . जगातील मोजक्या अश्या शहरांचा स्थापनादिवस आपणस ज्ञात आहे  त्या  मोजक्या शहरांपैकी एक शहर म्हणजे अहमदनगर . आपल्या भारतात कोणत्याही प्रकारच्या नव्या वाहनांनाबाजारपेठेत येण्यासाठी . ज्या शहरातील चाचणीला सामोरे जावे लागते , ते शहर म्हणजे अहमदनगर .  आपल्या भारतातातील महत्तवाची वाहन कंपनी असणाऱ्या कायनेटिक कंपनीचे मुख्यालय असणारे अहमदनगर . लष्कराच्या रणगाड्याचे एक प्रमुख केंद्र म्हणजे अहमदनगर .
        अनेक ऐताहासीक वास्तूने भरलेले शहर म्हणजे अहमदनगर .ज्या गावाच्या नावात एकही काना मात्रा वेलांटी  उकार नाही तसेच महाराष्ट्रातील सर्वाधिक लांब नाव  असणारे जिल्ह्याचे ठिकाण (7अक्षरे ) या शहराचे नाव  इतके लांब आहे की , सर्वसामान्य जनता त्याचे अ.  नगर असे संक्षिप्त रूपांतर करते  असे  शहर . म्हणजे अहमदनगर . सीना नदीच्या काठावर वसलेले,  बहामनी सत्तेचे पाच तुकडे झाल्यावर त्यातील निजामशाही या भागाचे मुख्यालय असणारे शहर म्हणजे म्हणजे अहमदनगर. . भारतातील  मध्ययुगातील मोजक्या महिला  राज्यकर्त्यांपैकी एका असणाऱ्या चांदबिबीचे शहर म्हणजे अहमदनगर
                             या शहरात  सध्या पाणी ,रस्ते, ,मनपाचे थकलेले कर उत्पन्न, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था  आदी प्रश्न आहेत . त्याविषयी नंतर बोलेल . सध्या पुरते  इतकेच.  पुन्हा एकदा अहमगनगरच्या रहिवाश्याना अहमदनगरच्या वाढदिवश्याच्या मनापासून लक्ष लक्ष शुभेच्छा . 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?