महाराष्ट्राची एसटी @73

       
                    1जून 1948 रोजी आपल्या महराष्ट्रात पहिल्यांदा एसटी धावली.   येत्या सोमवारी या घटनेला 72  वर्षे  पूर्ण होणार आहे . त्यानिमित्याने समस्त एसटी कर्मचारी , हितचिंतक , प्रवाशी यांनां  मनःपूर्वक लक्ष लक्ष शुभेच्छा . मित्रानो आपल्या भारतातील पहिल्या राज्य परिवहन महामंडळाकडून अर्थात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून  रस्ता  तिथे एसटी ,  प्रवाशाच्या सेवेसाठी  ब्रिदवाक्याला जागत  आपली एसटी महाराष्टाच्या कानाकोपऱ्यासह , आपल्या महाराष्ट्राच्या शेजारील गुजरात , कर्नाटक , मध्यप्रदेश , तेलंगणा आणि गोवा या राज्यात  देखील आपली सेवा विविध प्रकारच्या बसेसमार्फत पुरवते , ज्यामध्ये परिवर्तन, हिरकणी (एशियाड ) शीतल , यशवंती , साधी शिवशाही , स्लीपर शिवशाही , अश्वमेध , शिवनेरी तसेच  स्लीपर आणि बैठक व्यवस्था एकत्रित असणारी बससेवा  हे प्रमुख प्रकार आहेत . सुमारे 350 आगारांमार्फत विविध प्रकारची सेवा पुरवणारी एसटी आपल्या भारतातील  सार्वजनिक क्षेत्रातील वाहतूक पुरवणारे महामंडळ आहे .
             आपल्या भारतातातील सर्व परिवहन महामंडळाची दिल्लीत ASRTU  नावाची शिखर संस्था आहे . त्यांनी आपल्या भारतातील सार्वजनिक बस वाहतुकीचे व्यवस्थापन सुलभतेने व्हावे या हेतूने काही मार्गदर्शक तत्वे सांगितली आहे ,इतर राज्यातील महामंडळे या तत्वांना सोईनुसार वाकवत असताना  या सर्व तत्वांची काटेकोरपणे अंमलबाजवणी करणारे राज्य परिवहन महामंडळ म्हणून आपले महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ ओळखले जाते . त्या परिवहन महामंडळाचा हा स्थापना दिवस .
       केंद्र सरकारने सन 1956साली भारतीय वाहतुकीचे नियमन व्हावे , राज्यांनी त्यांची सार्वजनिक व्यवस्था उभारावी या हेतूने भारतीय मोटार वाहन अधिनियम 1956 केला , त्या कायद्यान्वये अन्य राज्यांनी आपापल्या परिवहन सेवा उभारल्या , मात्र केंद्र सरकारच्या कायद्याची वाट न बघता व्यापक जनहित बघून आपला भारत देश स्वतंत्र झाल्यावर अवघ्या 10महिन्यात कायदा तयार होण्याच्या तब्ब्ल 8वर्षे आधी जे सार्वजनिक परिवहन महामंडळ स्थापन झाले ते आपले महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ .
                 सन 1983साली देशात जव्हा आशियाई खेळाचे आयोजन करण्यात आले , त्यावेळी देशात आलेल्या पदेशी पाहुण्यांना आरामदायी वाहनव्यवस्था पुरवणारे महामंडळ म्हणजे आपली एसटी .  त्याच प्रामणे आपल्या भारतात विजेवर चलणाऱ्या बसेसची सेवा दोन शहरांच्या मध्ये देणारे सार्वजनिक परिवहन सेवेतील महामंडळ म्हणून  सुध्दा   आपले महामंडळ ओळखले जाते मित्रानो आपली एसटी निवळ  दोन शहरांमध्येच सेवा  देते असे नाही . तर  शहरांतर्गत सेवासुद्धा देते  .  सांगली -मिरज ,   रत्नागिरी , औरंगाबाद , नाशिक , पनवेल  ही  त्याची काही प्रमुख  उदाहरणे .
         गुजरात सारखी काही राज्यांची परिवहन महामंडळे ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग  आदी समाजातील या  काहिस्या दुर्लक्षित घटकांना भाड्यात काहीही सवलत न देत असताना अश्या घटकांना   समाजसेवेच्या हेतूने   50%सूट देणारे महामंडळ , तसेच कर्नाटक सारखें फक्त आरामदायी सेवंचेचे आरक्षण  करण्याची सेवा प्रवाश्याना न देता , आपल्या सर्व गाड्यांचे आरक्षण प्रवाश्याना करू देणारे महामंडळ म्हणजे आपले महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ . सध्या आपल्या एसटीपुढे  आव्हाने आहेत , हे मान्य केले तरी हा  गौरवदायी इतिहास विसरता येणे अशक्य आहे . या अडचणींवर आपली एसटी महामंडळ नक्कीच यशस्वी मात करेल अशा विश्वास व्यक्त करून आणि  पुन्हा एकदा मनःपूर्वक शुभेच्छा देवून सध्यापुरते थांबतो , नमस्कार.



.  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?