जगात हेबी घडतंय

     
               सध्या कोणतेही प्रसारमाध्यम बघीतले तर आपणास सर्वत्र कोरोनामुळे समाजातील विविध घटकांचे होणारे हाल, त्याचा अर्थव्यवस्थेवर पडणारा ताण अश्या प्रकारच्या बातम्याच दिसतात . कोरोना भयंकर आहेच.याबाबत शंकाच नाही, मात्र काळ्याकुट्ट अंधारात एखादी मिणमीणती पणतीसुद्धा आशेचा किरण मनात तेवत ठेवते, त्याप्रमाणे एक सकारात्मक बाब सध्या जगाच्या क्रिडा विश्वात घडत आहे,माझे आजचे लेखन त्या बाबीवर आपले लक्ष वेधण्यासाठी . जगात सकारात्मक तरंग निर्माण करणारा तो खेळ आहे , बुद्धीबळ .आपल्या भारतीय भुमीवर निर्माण झालेला हा खेळ .                               तर मित्रांनो या बुद्धीबळाच्या विश्वातील मानाची समजली जाणारी नेशन कप ही स्पर्धा 5मे ते 10मे या कालावधीत पार पाडली .  फिडे अर्थात फेडरेशन इंटरनँशनल डिईचेस या बुद्धीबळ या खेळाच्या
आंतरराष्ट्रीय संघटनेमार्फत आणि चेस डाँट काँम या संकेतस्थळाच्या सहकार्याने ही स्पर्धा इतिहासात पहिल्यांदाच आँनलाईन पद्धतीने पार पडली.(दरवर्षी होणारी ही स्पर्धा ईतरवेळी आँफलाईन पद्धतीने होते)मित्रांनो जरी बुद्धिबळ हा वैयक्तिक खेळ असला तरी ही स्पर्धामात्र गटाच्या माध्यमातून झाली प्रत्येक गटात मुख्य 4खेळाडु आणि दोन राखीव खेळाडू असे गटाचे स्वरुप होते .जे चार मुख्य खेळाडू खेळणार आहेत त्यामध्ये एक महिला असणे अत्यावश्यक होते .तसेच राखीव खेळाडुमध्ये सुद्धा एक महिला असणे बंधनकारक होते.
                         या स्पर्धेत सहा संघांनी भाग घेतला होता , भारत, चीन, रशिया, युनाटेड किग्डम ,यूएसए, आणि शेष विश्व हे ते सहा संघ . दुर्देवाने भारताच्या संघाची कामगिरी या स्पर्धेत म्हणावी असी झाली नाही,असो   यामध्ये  प्रत्येक संघ राहिलेल्या 5 संघांबरोबर दोनदा खेळणार होता , जे खेळ 5ते9मे दरम्यान झाले आणि 10 मे रोजी चीन आणि यूएसए यामध्ये सुपर फायनल झाली . मी सदर पोस्ट  लिहीत असताना आपल्या भारतात सुपर फायनलचा वार उजडला आहे, मात्र सुपर फायनल अजून सुरु झाली नाही, त्यामुळे या स्पर्धेचा विजेता कोण होणार हे सांगू शकणार नाही. मात्र चेस डाँट काँम आणि फिडेच्या संकेतस्थळावरुन मी या स्पर्धैचे जे आँनलाईन प्रक्षेपण बघीतले ते खरोखरीच मन गुंतून ठेवणारे होते.
              बुद्धीबळ हा खेळच तसाच आहे म्हणा, ईतर खेळात प्रेक्षकाला खेळात सहभागी होण्यास काहीच वाव
नसतो, मात्र बुद्धीबळ हा जगातील अशा एकमेव खेळ आहे, ज्यामध्ये खेळाडु काय चाली करू शकतो ?याचे आपल्या मनात आखाडे बांधून खेळाडूंच्या बरोबर अप्रत्यक्षरित्या का होईना सहभागी होवून आनंद.लूटू शकतो . माझे लेखन अनेक स्पर्धा परीक्षा करणारे वाचतात, त्यांना माझे आग्राहाचे सांगणे आहे,स्पर्धा परीक्षेत असणाऱ्या मेंटल अँबेलिटीच्या प्रश्नासाठी बुद्धीबळ या खेळाचा खूप फायदा होतो.आणि हा खेळ आँनलाईन स्वरूपात देखील खेळता येत असल्याने सध्याचा लाँकडाउनच्या काळात देखील सहजतेने खेळाता येऊ  शकतो   मग खेळणार ना हा खेळ ?

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?