चिंगीची गोष्ट


                               काही दिवसांपूर्वीची  गोष्ट आहे . फेसबुकवर सहज फेरफटका मारत असताना एका   मित्राने एक आठवण शेअर केलेली मला आढळली . मित्राबरोबर केलेल्या एका कॅम्पचा फोटो मित्रानो शेअर केलेला होता .   आहे आमच्या कॅम्प खूपच उत्साहात झाला . माझे आमच्या कॅम्प ज्या गावात होता त्या गावात वैयक्तिकरित्या माझे नंतर दोन तीनदा जाणे झाले . या जाण्यात मला एका हृदयादवक घटना समजली होती . मित्राने फोटो शेअर केल्यापासून ती आठवण ब्लाँगच्या माध्यमातून शेअर करावी, असे माझ्या एका मनाला वाटत असे त्याच वेळी दुसरे मन हा विषय ब्लॉगवर घ्यावा का? म्हणून घाबरत असे माञ ही पोस्ट लिहण्याचा ३ एक तास अगोदर माझ्या दुसऱ्या एका  मिञाच्या फेसबुकवरील  स्वामी विवेकानंदाचा पोस्टवर प्रतीक्रियेवर कमेंटस म्हणून  निर्भयतेवर आधारीत त्यांचा एक  विचार पोस्ट केला  तेव्हा विचार आला आता सध्या फारसे काही घडत नाहीये  निर्भयता दाखवूया आणि  मी ती घटना तुम्हासमोर मांडण्याचे  .ठरवले 
                                ही गोष्ट आहे चिंगी नावाच्या एका अभागी मुलीची तिचे  हे नाव काही खरे नाव असेलच
 असे नाही किंबहुना ते नसावेच असे मला तिची गोष्ट सांगताना वाटत आहे  ती मला पहिल्यांदा भेटली ती त्या कँम्पच्या सुरवातीलाच त्यावेळी आम्हाला कँम्पचा एक भाग म्हणून आमच्या कँम्प होता त्या गावात   वेळी आम्ही मिञ गावात  श्रमदान करायचे होते . तर सांगायचामुद्दा असा की श्रमदान करत असताना जरा दमलो म्हणून शेजारच्या घरातून पाणी मागितले तेव्हा एक १७ अठरा वर्षे वयाची जरा उंच वाटणारी एक मुलगी आम्हाला पाणी घेवून आली तीच ही चिंगी म्हणजे माझ्या एका मिञाने तिचे नाव चिंगी आहे असे जाहीर केले आम्ही मिञांनी पण ते मान्य केले 
                          कँम्प च्या नंतरचा चार पाच दिवसात तीला नंतर ३/४वेळा गावात बघितले आमचा तो  चार पाच दिवसाचा कँम्प संपला नंतर ३/४ वेळा एका दिवसासाठी त्या गावात जाणे झाले असेच एकदा गेलो असता समजले की ती गेली 
            एके दिवशी पाणी भरायला पाणवठ्यावर गेली असता पाय घसरून पडली व बुडून मेली तो पाणवठा ४/५ फुट खोल व ४/५ फुट लांबी रुंदिचा तलाव होता त्याठीकाणी उंच समजता येईल अशीव्यक्ती जी त्या गावात बऱ्याच वर्षापासून रहात आहे ती व्यक्ति तिथे  कशी काय बुडू शकते ? तेव्हापासून मलासमजलेले नाहि की तो खरच अपघात होता का? की अन्य काही होते ? जर अन्य काही असेल तर अश्या कितीतरी गोष्टी अपघात म्हणून खपवत असतील ते अभागी जिव न्याय प्राप्त करण्यास योग्य असताना तो मिळत नाही  काय हे दुर्दैव ! असे दुर्देव देव करो, अन अन्य कोणाच्या वाटेला न येवो .हीच सदिच्छा व्यक्त करून थांबतो , नमस्कार (लेखातील फोटो प्रातिनिधिक  आहेत ,  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?