आपली एसटी त्यांची एसटी

 
                            मला  लॉकडाउनच्या आधी दोनदा महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस सोडून गुजरात  अणि कर्नाटक राज्य परिवहन महमंडळाच्या बसने प्रवास  करावा लागला. प्रवास सोईस्कर व्हावा म्हणून आरक्षण करण्याच्या हेतूने  जेव्हा  संबंधित  परिवहन महामंडळाच्या संकेतस्थळावर भेट दिली असता, आपल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचा विचार करता मला जाणवलेले  बदल सांगण्यासाठी आजचे लेखन
                                  सर्वप्रथम कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाच्या विचार करूया . कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाचा विचार करता त्यांचा  संकेतस्थळावर  फार पूर्वीपासून  फक्त  व्होल्वो प्रकारच्या गाड्यांचेच आरक्षण हेते . सर्वसाधारण प्रकारच्या गाड्यांचे आरक्षण होत नाही . गुजरात राज्य परिवहन महामंडळाचा विचार करता पूर्वी त्यांच्या संकेतस्थळावर सर्व प्रकारच्या गाड्यांचे आरक्षण होत  असें .  सध्या
 मात्र फक्त व्होल्वो प्रकारच्या गाड्यांचेच आरक्षण हेते . महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचा विचार करता , पूर्वीपासून हा लेख लिहण्यापर्यंत सर्व प्रकारच्या गाड्यांचे आरक्षण होते . नोटबंदीच्या काळात मी भीमाशंकर ते  पुणे असा आरक्षण करून सध्या गाडीने प्रवास केला होता , त्यावेळी माझा सहप्रवासी हा उत्तर भारतीय होता . प्रवासादरम्यान बोलताना माझ्या सध्या गाडीचे आरक्षण  बघून  आश्चर्यचकित झाला असल्याचे मला लक्षात आले . आपल्या महामंडळाचे या बाबत कौतुक करावेच लागेल .
                                मी मध्यंतरी सुरतला तीनदा तर  बडोदा या शहरात एकदा गेलो ,होतो  या चारही वेळेस तेथील बसस्थानकामध्ये मला  एकही खासगी बस  चालक प्रवाशी पळवताना पळवताना दिसला नाही या बाबत मला पुण्यात फारच विदारक अनुभव आलेला आहे . रिक्षातून उतरू ही ना देता मला तीन खासगी चालकांनी कुठे जायचे हा प्रश्न विचारून भंडावून सोडले होते . या बाबत आपल्या महामंडळाने  आवश्यक ती पाऊले उचलणे अत्यावश्यक आहे . अन्यथा गुणवत्तापूर्णसेवा देऊनही आपल्या महामंडळाची सेवा  तोट्यात जाऊ शकते .
                               ज्या  कायदान्वये महाराष्ट्र राज्य वगळता अन्य राज्यात परिवहन सेवा स्थापन झाली त्या 1956च्या सार्वजनिक मोटार वाहन कायदा तयार होण्याचा 8  वर्षे आधी सन 1948साली आपल्या महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे . आपल्या  भारतातील पहिले राज्य परिवहन महामंडळ म्हणून आपल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडे बघितले जाते.   आपल्या भारतातात  आरामदायी सेवा सर्वप्रथम पुरवण्याचा मान  देखील आपल्या महामंडळाकडे आहे . अस्या हे महामंडळ तोट्यात जाणे  कोणालाच  परवडणारे नाही ,   तरी याबाबत महामंडळ आवश्यक ती पाऊले  लवकरच उचलेल अशी आशा  व्यक्त करून सध्यापुरते थांबतो , नमस्कार .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?