पश्चिम बंगालच्या संकटाने निर्माण केलेले काही अनुत्तरित प्रश्न

       
                  दिनांक 21मे 2020रोजी पश्चिम बंगाल आणि ओडिशा या राज्यात आलेल्या आम्फाम या अतितीव्र स्वरुपाच्या चक्रीवादळाने 72 निष्पाप अभागी जणांचा मृत्यू झाला आहे . या मृत्यूने  अनेक प्रश्नांंना जन्म दिला आहे  त्यातील अनेक प्रश्न बदलत्या हवामानाशी संबंधित आहेत . .आपण जगभरातली  गेल्या काही वर्षांतील हवामानाचा एक आढावा घेतल्यास आपणास सहज लक्षात येते की , जगभरातील सर्व प्रकारचे हवामान अतितीव्र बनत चाललेले दिसते . मागील 2019पर्यतचा हवामानाचा विचार करता सन 2000पासून पुढची सर्व वर्षे मागच्या पेक्षा अधिक उष्ण होती , तसेच गेल्या काही वर्षाचा विचार करता ऊत्तर अमेरिका खंडातील अटलांटिक समुद्रातील चक्रीवादळे असो (ज्याला हरिकेन म्हणतात ) अथवा मे महिन्यात होणारी बंगालच्या उपसागरात तयार चक्रीवादळे असो अथवा या प्रकारची सर्वच चक्रीवादळे असो , त्यांची तीव्रता वाढलेलीच आपणास दिसते .
          पश्चिम बंगालच्या चक्रीवादळाने निर्माण केलेल्या प्रश्नांमध्ये एक प्रमुख प्रश्न आहे की , या बदलत्या हवमानाशी मानवजात कश्या प्रकारे जुळवून घेणार ?  यातील उपप्रश्न असे  की , हे बदलते लहरी बनत चाललेले हवामान मानवास सुसह्य कधी बनणार ? की दिवसोंदिवस असेच लहरी बनत जाणार ? मी जेव्हढा या विषयाचा अभ्यास केला आहे , त्यानुसार या प्रश्नाचे उत्तर हेच आहे की , हवामान दिवसोंदिवस असेच लहरी बनत जाणार आहे .  ते कधीच आता परत मानवास सुसह्य होणार नाही . आता मानवाने या लहरी हवामानाबरोबर राहण्याची सवय केली पाहिजे . आता परत मूळ प्रशांकडे वळूया , तो म्हणजे या लहरी हवामानाशी कोणत्या प्रकारे जुळवून घेयचे
? माझ्या मते आर्थिक स्तराचा विचार करता यामध्ये गोरगरीब जनता अधिक भरडली जाऊ शकते व्यवसायाचा विचार करता ज्या व्यवसायांचा प्रत्यक्षपणे निसर्गाशी संबंध येतो , असे शेती सारखे व्यवसाय या मध्ये अधिक भरडले जाऊ शकतात . ते समाजघटक आणि समस्त या संकटाना कसे सामोरे जातात यावर आपल्या मनवजातीचे भवितव्य आधारित आहे .
                           शालेय , आणि महाविद्यालयीन विषयातली एक विषय म्हणून पर्यावरण-हवामान याकडे ना बघता आधी विशालतेने गंभीरतेने याकडे बघण्याची गरज आहे . मी आम्फाम या चक्रीवादळाच्या ज्या बातम्या टीव्हीवर बघितल्या त्या मध्ये सांगण्यात आलेल्या एका गोष्टीचा आपण सर्वांनी विचार केलाच पाहिजे . तो म्हणजे या  चक्रीवादळामुळे समुद्र किनाऱ्याजवळील काही उपजाऊ शेतजमीन समुद्राच्या लाटांमुळे आलेल्या पाण्यामुळे निकामी झाली आहे . या शेतजमिनीच्या जमीन मालकांवर आता शहरात  मजुरी करण्याची वेळ आली आहे . मित्रानो हि आता कुठे सुरवात झाली आहे . काही अभ्यासकांच्या मते अश्या बदलत्या हवामानामुळे भविष्यात अनेकांवर अशी वेळ येऊ शकते
                  मित्रानो , वेळ विचार करायला लावणारी आहे , मात्र सगळे संपले आहे असे नाही . आपल्या भारतीय पुराणांचा विचार करता आपल्याला दोन वेळेस या पृथीला वाचवल्याचे दिसून येते (पहिला प्रसंग भगवान महादेवांनी हालहाल पियुन श्रुष्टीला वाचल्याचा आणि दुसरा मनू या देवतेने बोटीतून श्रुष्टीला वाचवल्याचा प्रसंग )तसेच बायबल मधील नोवा ची गोष्ट सुद्धा आपणास हेच सांगते . मात्र तो येईल म्हणून आपण काहीचकरायचे नाही असे नाही . आपण अपनी पृथ्वी वाचवण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे. तोच करायला सगळ्यांना लवकरात लवकर सुबुद्धी येवो अशी मनोकामना करून सध्यापुरते थांबतो , नमस्कार .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?