भारत मालदीव संबंध नव्या वळणावर

                       सध्या आपल्या भारताचे  शेजारी देशांशी असणारे संबंध मोठ्या प्रमाणात बदलत आहेत . हे बदल सकारात्मक तसेच नकारात्मक देखील आहेत . जसे नेपाळ आणि चीनबरोबर आपले संबंध काहिस्या तणावपूर्ण अवस्थेतून जात आहेत , तर इस्लाम हा प्रमुख धर्म असणाऱ्या किंबहुना ज्या देशाच्या नागरिकत्वाच्या कायद्यात मुस्लिम धर्मीय असल्याशिवाय नागरिकत्व  मिळणार नाही , अशी तरतूद आहे , त्या  मालदीव बरोबर आपले संबंध मोठ्या प्रमाणात सकारत्मक आहेत . आणि हे संबंध अजूनच सकारत्मक होऊ शकतात . अशी भूमिका मालदीव या देशाने नुकतीच एका आंतरराष्ट्रीय मंचावर घेतली .  सध्या समस्त  मराठी वृत्तवाहिन्या करोनाविषयी  बातम्या देत असल्याने , ही घटना त्यांच्याकडून अनावधाने  सुटली . जर सध्या करोना  नसता तर ही बातमी मोठ्या प्रमाणात गाजली असती यात शंका नाही . मात्र करोनामुळे  ही बातमी गाजली नाही . तरी
समर्थ रामदासस्वामी यांच्या , "जेजे आपणासी ठाव, ते सकलांसी सांगावे , शहाणे करुन सोडावे सकल जन " या उक्तीप्रमाणे त्याबाबतची माहिती आपणास देण्याकरता आजचा लेखन प्रपंच .
                 तर नुकत्याच आँनलाईन पद्धतीने झालेल्या "इस्लामिक आँरगनायझेशन काँपरेशन" या जगातील  इस्लाम हा मुख्य धर्म असणाऱ्या देशांच्या संघटनेच्या अधिवेशनात इस्लामोफोबिया या विषयावर चर्चा करताना , पाकिस्तानने भारताविरूद्धचा राग आळवला .त्यावर मालदिव या देशाने भारतातील मुस्लमान सुरक्षीत आहेत , त्यांना भारतात धोका नाही,असी भुमिका घेतली . मित्रांनो ही बाब खुप मोठी आहे. जगात 210 देश आहेत, त्यापैकी 57देश अर्थात जवळपास एक चतुर्थांश देश या संघटनेचे सदस्य आहेत. त्यामुळे आपला हा फार मोठा नैतिक विजय आहे, असेच म्हणावे लागेल .
               नुकतेच अमेरीकेने भारताला 2004 नंतर प्रथमच अल्पसंख्याकांवर अत्याचार होणाऱ्या देशांच्या यादीत स्थान दिले आहे, हा संदर्भ लक्षात घेता, ही किती मोठी गोष्ट आहे,हे लक्षात येते .उद्याचा जगाचे नेर्तृत्व करणाऱ्या देशांमध्ये भारताचा समावेश होणार याचीच ही नांदी आहे, असेच म्हणावे लागेल. या नांदीच्या आनंदातच मी आपली या लेखापुरती रजा घेतो, नमस्कार


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?