नवीन भाषा , जुने शब्द

 
   आज सकाळचीच गोष्ट आहे , सध्याच्या जीवनाचा काहिसा  अविभाज्य  भाग बनलेल्या  व्हाट्सअप वरील एका गृपवरील मेसेज बघत होतो, गृपवर एका व्यक्तीने केलेल्या स्व कलालकृतीवर विविध लोकांनी प्रतिक्रिया दिल्या होत्या . अर्थात या सर्व प्रतिक्रिया म्हणजे  दोन इमोजी होत्या . त्या दोन इमोजीच सर्वांनी आलपालटुन वापरल्या होत्या . त्यावेळी माझ्या मनात एक विचार चमकून गेला ." या इमोजीने आपल्या भाषेवर किती आक्रमण केले आहे . या इमोजी जर नसत्या तर लोक किती विविध प्रकारे अभिव्यक्त झाले असते
             आपल्या मराठीत या साठी कितीतरी शब्द आहेत , जसे अफलातून,  छान, मस्त , झक्कास, एक नंबर , कडक, लई भारी , फक्कड, आणि मराठीत एक सुप्रसिद्ध गायक श्री . अवधूत गुप्ते यांनी आपल्या गाण्याच्या स्पर्धात्मक कार्यक्रमातून काहीसा  रूढ केलेला शब्द अर्थात चाबूक . मात्र आता या सर्वांची जागा कोणी घेतली तर दोन
चिन्हांनी . या सुमारे सात  आठ शब्दांतून विविध प्रकारे व्यक्त होणारी माणसे आता व्यक्त होणार  फक्त दोन ते  तीन प्रकारे . एका अर्थाने हा भाषेचा   संकोच म्हणावा नाही का ?
मला मान्य आहे की ? कोणतीही भाषा ही प्रवाही असते. भाषेत त्या वेळच्या समाजजीवनानुसार नविन शद्ब येतात , आणि वापरात नसणारे शद्ब मागे पडतात .छत्रपती शिवाजी महाराज, संत ज्ञानेश्वर यांच्या काळी वापरात असणारी मराठी भाषा आपण आता वापरत नाही. त्या भाषेमध्ये खुप मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे. मात्र पुर्वी झालेले बदल हे शद्बाला पर्याय म्हणून दुसरा शद्ब असे होते . आता मात्र शद्बांची जागा ईमोजी घेत आहे, आणि हे शद्ब मुख्यतः भावभावनासी संबधित आहे. मानवी भावभावनांची शद्बांद्वांरे होणारी विविधता त्यामुळे कमी होत आहे,असे मला वाटते .
कडक, चाबुक,  झक्कास आदि शद्बातून होणारे कौतूक हे वेगवेगळे असते,त्याला एक दोन इमोजीतून व्यक्त करणे अवघड आहे, असे मला वाटते. आपणाला काय वाटते? 
आपली मराठी शद्बांची अक्षरशः.खाण आहे, त्यातील कित्येक शद्ब काळाचा उदरात गडप झाले असतील . मात्र सध्या त्याचा वेग जास्त असल्याचे  मला वाटते . या नष्ट होणाऱ्या शब्दांची जागा नविन शब्द न घेता काही यांत्रिक चिन्हे घेत आहेत , हे योग्य की अयोग्य हे येणारा काळच ठरवेल.असो
       मानवी भावभावना या विविध प्रकारच्या असतात, त्याला चिन्हात बांधणे अवघड गोष्ट आहे, मात्र सध्या तो प्रकार झपाट्याने वाढतोय. आपल्या मराठीत या सर्व भावनांसाठी समर्पक शद्ब आहेत . ते ठराविक मोजक्या  चिन्हांद्वारे व्यक्त होणे अशक्य आहे, त्यामुळे काळाची गती परत मागे फिरवणे अशक्य असले तरी हे शद्बवैभव टिकावे, अशी इश्वरचरणी प्रार्थना करुन सध्यापुरते थांबतो.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?