बहिस्कार यशस्वी ठरेल ?

                           सध्या आपल्या भारतात सर्वत्र चीन विरोधी वातावरण आहे .चीनमध्ये उत्पादित झालेल्या वस्तू वापरु नयेत, यासाठी समाजमाध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणात मोहिम चालू आहे . मात्र या मोहिमेदरम्यान अनेक अर्थशास्त्रीय संकल्पना योग्य पद्धतीने समजून न घेताच विरोध केल्याचे आपणास सहजतेने दिसते . त्या बाबींकडे लक्ष वेधण्यासाठी आजचे लेखन .
                                              कोणत्याही दोन देशांमधील व्यापारातील महत्त्वाचे तत्व म्हणजे balance of tread अर्थात एखाद्या देशाला आपण किती निर्यात करतो, तसेच त्याच देशाकडून आपण आयात किती करतो, यातील फरक होय . चीन आणि भारताच्या बाबतीत या बाबत बोलायचे झाल्यास  द हिंदू या न्युजपेपरमध्ये आलेल्या बातमीनुसार सन2019मध्ये भारताने चीनला17.92मिलीयन डाँलरची निर्यात केली .तर चीनकडुन
74.72मिलीयन डाँलरची आयात केली . थोडक्यात भारताने  चीनला जेव्हढ्या वस्तू निर्यात केल्या , त्यापेक्षा चारपट वस्तू आपण चीन कडून आयात केल्या  .तसेच इंटरनेटवरुन मिळालेल्या माहितीनुसार चीन  जेव्हढी निर्यात भारताला करतो , त्याचे त्यांच्या एकुण निर्यातीसी असणारे प्रमाण अत्यंत नगण्य  म्हणजे 5%आहे . या उलट स्थिती भारताची आहे, जे सुमारे 17टक्यापर्यत आहे . टाळी एका हाताने वाजत नाही त्यामुळे आपण जसे त्यांचे उत्पादन घेणे बंद करतोय, तसे त्यांनी केले तर काय करायचे हा प्रश्न उरतोच .तसेच चीनचा उत्पादनाचा वेग(ते कामगारांबाबतचे कायदे पाळतात का ,हा प्रश्न.सोडुन देवूया ) आणि भारतीय उत्पादकांच्या उत्पादनाचा वेग , तसेच आपल्या भारतीयांची गरज या तिन्ही गोष्टींची सांगड घालता भारतीय उत्पादक ती गरज पुर्ण करु शकतील का ?हा ही प्रश्न आहेच .
                मुळात सध्या भारतीय व्यापारांकडे असणाऱ्या चीनी मालाचे काय करायचे ?हाही प्रश्न आहेच .त्या मालाचे पैसै चीनला मिळाले आहेत . अश्या  परिस्थितीत जर आपण त्या व्यापारांकडील माल न घेतल्यास भारतीय व्यापारांचेच नुकसान होणार आहे .   
            या स्थितीत चीनला टक्कर देयची असल्यास  "अँटक इज द बेस्ट  डिफेन्स" या तत्वानुसार  ज्या प्रमाणे  चीनने  जागतिक व्यापारात आपला दबदबा निर्माण केला आहे.त्याच धर्तीवर चीनपेक्षा अधिक व्यापक प्रमाणात जागतिक बाजारपेठ काबिज करणे हा उपाय योजणे आवश्यक आहे . 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?