ऑनलाईन शिक्षणाच्या कथा

 
             सध्याच्या करोनाच्या पार्श्वभूमीवर पुढच्या वर्षी शिक्षण कोणत्या प्रकारे सुरु करता येईल ,  बाबाबत विविध  मतमतांतरे सध्या समाजमाध्यमांद्वारे मांडली  जात आहेत   काही व्यक्ती ऑनलाईन पद्धतीने शिक्षण द्यावे अशी मागणी करत आहेत . तर काही जण  ऑनलाईन शिक्षण मुलांना देणे  धोक्याचे आहे , त्याच प्रमाणे ऑनलाईन शिक्षणासाठी लागणारी संसाधने सांगण्याकडे आहेत का ? असा मुद्दा मांडता त्यास विरोध करत आहे .मात्र या संदर्भात मी आतापर्यत विविध   प्रसारमाध्यमांकडून  ऐकलेल्या/ वाचलेल्या  चर्चेत एक मुद्दा काहीसा दुर्लक्षिला जात आहे असे  मला वाटतं  असल्याने तो मुदा मांडण्यासाठी आजचे लेखन .
                                        तर पुण्यातील प्रभात रोड येथे पूर्वी कार्यरत  असणाऱ्या  आणि सध्या बंद पडलेल्या बालचित्रवाणी या संस्थेने ही संस्था कार्यरत असताना विद्यार्थ्यंना अध्यायनात  साह्य करतील असे
सुमारे  प्रत्येकी अर्धा तासाचे कित्येक व्हिडीओ तयार केले आहेत . सध्या मात्र  ते व्हिडीओ बालचित्रवाणीच्या बंद पडलेल्या इमारतीत धूळ खात पडले आहेत . माझ्या मते विध्यार्थ्यांच्या ऑनलाईन शिक्षणात हे व्हिडीओ अत्यंत मोलाची भूमिका बजावू शकतात . पूर्वी दूरदर्शनच्या सह्रयाद्री वाहिनीवर त्याचे प्रक्षेपण देखील होत असे . सध्याच्या काळात ते प्रक्षेपण पुन्हा सुरु करता येईल . अत्यंत सोप्या भाषेतील हे व्हिडीओ आहेत . .तसेच हे व्हिडीओ विद्यार्थ्यांना  शिकवताना चित्रित केलेलं असल्याने ते एकसुरी देखील नाहीत . यामध्ये शिकणारे विद्यार्थी आणि शिक्षक यांचा संवाद होत असल्याने ते पहात  प्रत्यक्षात शिकत असल्याचा अनुभव   देखील येतो . तसेच हे सर्व आजमितीस तयार उपलब्ध असल्याने लगेच प्रक्षेपित करता येऊ शकतात त्यामुळे . ते तयार करा आणि मग प्रक्षेपित करा यासाठी लागणारा वेळ सुद्धा वाचणार आहे .  आणि हे प्रक्षेपण करण्यासाठी मोबाईल , इंटरनेट  कोणत्याही माध्यमाची गरज लागणार
नाही . आजकाल टीव्ही महाराष्ट्रात तरी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे . सह्याद्री बरोबर काही खासगी वाहिन्यांची सुद्धा हे कार्यक्रम प्रक्षेपणात मदत  घेतली जाऊ शकते  .
          तरी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान थांबवण्यासाठी शासनाला आणि प्रशासकीय यंत्रणेला ते वापरण्याची इच्छा होवो , अशी ईश्वरचरणी प्रार्थना करून  सध्यापुरते  थांबतो , नमस्कार . 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?