रौप्य महोत्सव पृथ्वीवर न आलेल्या संकटाचा

   
        आपल्यापैकी अनेकांना आकाशदर्शनाची इच्छा असते. .अथांग विश्वातील विविध दिर्घीका, आपल्या आकाशगंगेतील विविध तारे, आपल्या सौरमालेतील ग्रह, त्यांचे उपग्रह, ग्रहांएव्हढे मोठे नसणारे मात्र स्वतंत्र्य अस्तिव असणारे लघुग्रह, बटूग्रह आणि सुर्यमालेला काही विशिष्ट कालावधीनंतर भेट देणारे आपल्या सुर्यमालिकेतील पाहुणे अर्थात धुमकेतू आदींचे निरीक्षण करताना खगोलप्रेमींची रात्र कशी सरुन जाते,हे त्यांचे त्यांनाही समजत नाही . या अथांंग पसरलेल्या विश्वातील सर्वात रहस्यमय गोष्ट कोणती असेल तर ती आहे, धुमकेतू .हे धुमकेतू कुठुन येतात, याचा बऱ्यापैकी अंदाज आता आपल्याला येत असला, तरी त्यामुळे आपल्या पृथ्वीला काहीही धोका नाही,असे मात्र खगोल शास्त्रज्ञ अजूनही सांगू शकलेले नाहीत.याला बरीच कारणे असली, तरी एक प्रमुख कारणे म्हणजे धुमकेतूचे पृथ्वीला धडकण्याची शक्यता
            येत्या जूलै महिन्यात अस्याच एका धडकेला 25वर्षे पुर्ण होत आहेत. शुमेकर आणि लेव्ही या दोन खगोलशास्त्रज्ञांंनी मार्च 1992मध्ये  एकत्रीतरीत्या  शोधलेल्या शुमेकर लेव्ही 9 या धुमकेतूची गुरु या ग्रहाशी झालेली धडक ही ती घटना . सुमारे दिड किलोमीटर लांब असणाऱ्या या धुमकेतूचे 9 तूकडे होवून 16 जूलै 1994 ते 23 जूलै 1994 या दरम्यान ते गुरु ग्रहावर आदळले होते . पृथ्वीवरील अनेक दुर्बिणीतून याची सुंदर छायाचित्रे टिपण्यात आली आहेत .याचा गुरु ग्रहावर फारसा परीणाम न झाल्याचे, त्यानंतर गुरु ग्रहाला भेट देणाऱ्या अवकाशयानांनी काढलेल्या छायाचित्रणातून आपणास समजले .मात्र ही धडक आपल्या पृथ्वीशी झाली असती तर आपली काही खैर नव्हती . मात्र या घटनेनंतर पृथ्वीला धोका असणाऱ्या विविध अवकाशीय गोष्टीबाबत माहिती करून घेण्यासाठी विशेष मोहिम राबवण्यात आली, ज्यातून त्यांची यादी करण्यात आली, जीचे कार्य अजूनही सुरु आहे. आणि त्या यादीनुसार नजिकच्या भविष्यकाळात आपल्याला या गोष्टीपासून काहीही धोका नाहीये . मात्र तो नसेलच असेही समजता येत नाही .
                    गुरु ग्रहाने आपल्या पृथ्वीचे अनेकदा संरक्षण केल्याचे खगोलशास्त्रज्ञांचे म्हणणे आहे . त्यातील सर्वात नजिकच्या काळात घडलेली घटना म्हणून याकडे बघता येवू शकते . पृथ्वीसोडुन इतर ग्रहाला सुद्धा उपग्रह आहेत ,मानवाला ज्या ग्रहाचे निरीक्षण करुन माहिती झाले, तो ग्रह म्हणजे गुरु .त्याचे आयो, युरोपा गँनमीड, कँलोस्टो हे चार उपग्रह हा मानवाचा आधुनिक विज्ञानातील पहिला शोध होता . जो थोर खगोल
शास्त्रज्ञ गौलिलिओ याने लावला होता . या चारही उपग्रहांना त्याचा नावे ओळखले जाते . डिसकव्हरी सायन्स या टीव्ही चॅनेलवरील  "हाऊ  युनिव्हर्स वर्क" या कार्यक्रमात एकदा गुरु ग्रहांमुळे आपल्या पृथ्वीवरील जीवनाला चालना मिळाल्याचे सांगितले होते . आपल्या भारतीय ज्योतिष  मान्यतेनुसार गुरु ग्रह शुभ मानण्यात आला आहे  . कुंभमेळ्याच्या आयोजनात गुरुचे आकाशातील स्थान महत्त्वाचे आहे . खगोलीय विश्वाच्या विचार करता 25वर्षे म्हणजे पापणी लावण्यास लागणाऱ्या वेळेपेक्षाही खूपच कमी काळ मात्र मानवी आयुष्यात 25 वर्षांना अन्यन्यसाधारण महत्व आहे .  म्हणून त्या घटनेची माहिती करून देण्याचा माझा हा छोटा प्रयत्न , तुम्हला आवडला असेल अशा विश्वास बाळगून सध्यापुरते थांबतो , नमस्कार . 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?