अजून एक पाउल रेल्वेचा खासगीकरणाकडे

             आपण सर्व मराठी भाषिक अध्यत्माचा रंगात न्हाउन जात असताना किंवा  करोना विषयक बातम्या माहिती करुन घेत असताना 1जूलै 2020 रोजी भारतीय रेल्वेने एक परीपत्रक प्रसिद्ध केले . ज्या विषयी मराठी भाषिक माध्यमांमध्ये फारच कमी माहिती प्रसारीत करण्यात आली .द हिंदू या भारतातील महत्त्वाच्या इंग्रजी दैनिकात मात्र याविषयी सविस्तर छापून आले आहे .
                या परीपत्रकाद्वारे भारतीय रेल्वेचे खासगीकरणाचा दृष्टीने पाउल पुढे गेल्याचे स्पष्ट दिसत आहे .या परीपत्रकाद्वारे रेल्वेने 109 रेल्वेस्थानकादरम्यान खासगी रेल्वे चालवण्यासाठी खासगी रेल्वे चालकांना त्यांची तयारी सिद्व करण्याचे आदेश दिले आहेत . या 109रेल्वे स्थानकांची 12 विभागात विभागणी केली आहे . या रेल्वे चालवतांना रेल्वेचेच कर्मचारी वापरण्यात येणार असल्याचे, आणि यामुळे भारतीय रेल्वे प्रगतशील होण्यात हातभार लागणार असल्याचे रेल्वेचा प्रसिद्धीपत्रकात नमुद करण्यात आले आहे. मात्र ही सर्व रेल्वेचे खासगीकरण करण्याची पद्धत असल्याचे स्पष्ट दिसत आहे .
                                             जरी म्हणायला या रेल्वे गाड्या रेल्वेचे कर्मचारीच चालवणार असले तरी सध्या ज्याप्रमाणे राजधानी, शताद्बी आदी प्रकारच्या गाड्याना अधिक प्राधान्य मिळते, आणि सर्वसाधरण पँसेंजर,एक्सप्रेस स्लायडिंगला  ताटकळत बसतात , त्याप्रमाणे भविष्यात या गाड्यांना प्राधान्य मिळून भारतीय रेल्वेचा गाड्या स्लायडिंगला ठेवल्या गेल्या तर आश्चर्य वाटायला नको. भारतीय रेल्वेच्या गाड्यांना अधिक वेळ लागत असल्याने प्रवाशी या खासगी गाड्यांकडे वळायला लागण्याचा धोका यामुळे निर्माण होवू शकतो .परीणामी भारतीय रेल्वे प्रचंड तोट्यात येवू शकते .रेल्वेमार्फत या 109 ठिकाणांची यादी पाहिली असता, ते रेल्वेला प्रवासी वाहतूकीतून सर्वाधिक महसुल  देणाऱ्या मार्गातील असल्याचे दिसते 
          भारतीय रेल्वे , जगात विस्ताराचा बाबतीत चवथ्या क्रमांकावर आणि सर्वाधिक रोजगार देणारा सार्वजनिक उपक्रम असला तरी आधुनिकीकरणबाबत जगातील अन्य देशांच्या तूलनेत बरीच मागे आहे.  आणि तीला पुढे आणणे काळाची गरज असल्याचे मान्य केले तरीसुद्धा त्यासाठी सध्या केल्या जाणाऱ्या उपाययोजना अयोग्य आहेत ,असे माझे मत आहे . त्यासाठी काही प्रमाणात खासगी उद्योजकांची मदत घेयला हरकत नाही, पण ती रेल्वेरुळांची निर्मिती, रेल्वे इंजिन आणि डब्यांची निर्मिती,रेल्वेचे गेज परीवर्तन,इलेक्टीफिकेशन या क्षेत्रात घ्यायला हवी ,नकी त्यांना रेल्वे चालवायला देवून . हे म्हणजे एअर इंडिया आणि इंडियन एअरलाइन्स या नामांकित विमान कंपन्यांचा पायावर पाउल ठेवून वाटचाल करणे झाले . जे अयोग्य आहे . विमान वाहतूक आणि रेल्वेची तूलना होवूच शकत नाही .विमान वाहतूकशी सर्वसामन्यांचा अत्यंत माफक सबंध येतो, तसे रेल्वेचे नाही . रेल्वे अनेक गोरगरीब एसटीपेक्षा स्वस्त म्हणून वापरतात. ती गोरगरीबांचा आवाक्यातच राहो, अशी इश्वरचरणी प्रार्थना करुन सध्यापुरते थांबतो, नमस्कार .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?