मानवाची शंभरी भरण्याकडे वाटचाल

           
     सध्या समस्त जग करोनाच्या धास्तीत जगत असताना करोनाचे संकट कस्पटासमान वाटावे, असी घटना मार्चपासून रशियाचा जवळपास 77%भाग असणाऱ्या(जगाचा विचार करता 9%) सैबेरीया या भागात घडत आहे .या घटनेचे परीणाम सध्या दिसत नसल्याने माध्यमांद्वारे या घटनेकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे, मात्र येणाऱ्या पिढीचे कधीही भरुन न निघणारे नुकसान यामुळे होणार आहे. तर ती घटना आहे, वर्षातील जवळपास दहा महिने शुन्याचा खाली तापमान असणाऱ्या सैबेरीयात लागलेला वणवा
 . त्याचप्रमाणे ज्या भागात वर्षातील दहा महिने शुन्याचा खाली तापमान असते, तर उन्हाळ्याचा दोन महिन्यात ते तापमान सरासरी 20ते 28 सेल्सिअस  असते . त्या भागात नोंंदले गेलेले 38 सेल्सीयस तापमान ही होय .जे मानवाच्या ज्ञात इतिहासातील या भागात नोंदले गेलेले सर्वाधिक तापमान आहे.
                    या वणव्याचा विस्तार ही पोस्ट लिहताना ग्रीस या देशाचा एकुण क्षेत्रफळाएव्हढ्या भागात झालेला आहे .ज्या भागात हा वणवा लागलेला आहे, तो भाग वर्षातील बहुसंख्य काळ बर्फाच्छादीत असल्याने त्या भागात काही रासायनिक प्रकिया होवून त्या भागातील जमिनीत सहजतेने जळणारे सेंद्रीय पदार्थ मोठ्या प्रमाणात  साठलेले आहेत . दुर्देवाने या वणव्यामुळे तेथील झाडेच जळत नसून हे पदार्थ देखील जळत आहे.(थोडक्यात तेथील जमिन काही प्रमाणात नापिक होत आहे) परीणामी त्या भागात दाट जंगले निर्माण होण्याची शक्यता धूसर बनत आहे . 
              हे संकट एव्हढ्यावरच थांबले असते तर एकवेळ चालले असते . मात्र या वणव्याचा वेळी निर्माण होणाऱ्या अग्नीकणांमुळे  पृथ्वीच्या वातावरणातील ग्रीन हाउस गँसेसचे प्रमाण वाढणार आहे ज्याचे आंतिम परीणाम स्वरुप पृथ्वीचे  तापमान प्रचंड प्रमाणात वाढणार आहे. ग्लोबल वार्मिंग या क्षेत्रात जागतिक स्तरावर काम करणाऱ्या ग्रीन पिस या संघटनेमार्फत केलेल्या एका अभ्यासानुसार उत्तर ध्रुवीय क्षेत्रातील तापमान इतर
पृथ्वीपेक्षा दुप्पट वेगाने  वाढत आहे. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास इतर भागातील तापमान वर्षाभरात एक अंश सेल्सीयसने वाढत असल्यास उत्तर ध्रुवीय क्षेत्रातील तापमान वर्षाभरात दोन अंश सेल्सीयसने वाढत आहे . जगातील एकुण बर्फापैकी मोठा बर्फ या प्रदेशात आहे .जो  वेगाने वितळण्याचा धोका या तापमानवाढीमुळे निर्माण होतो. ज्यामुळे समुद्र काठावरील शहरे नष्ट होण्याचा धोका निर्माण होईल .आपल्या जगातील मुंबई, सिंगापूर, कराची, न्युर्याक सारखी  महत्तवाची शहरे ही समुद्र काठावरच आहेत, हेही लक्षात घेणे आवश्यक आहे.
                     सैबेरीयात लागलेल्या या वणव्याचा काही  भाग ध्रुवीय प्रदेशात येतो. ज्यामुळे या अग्नी प्रलयाकडे जागतिक संकट म्हणूनच बघायला हवे . काही दिवसापुर्वी आँस्ट्रोलिया या देशात लागलेला तसेच त्या आधी अँमेझाँनच्या जंगलात वणवा आणि त्यामुळे झालेले नुकसान आपणास माहिती असेलच  हे जागतिक संकट लवकरात लवकर संपो, अशी या श्रावण महिन्यात इश्वरचरणी प्रार्थना करुन सध्यापुरते थांबतो, नमस्कार 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?