मंगळ मानवाच्या कक्षेत ?

             सध्या समस्त मराठी  वृत्तवाहिन्या जगभरातील करोनाच्या बातम्या आपल्या बातमीपत्रात सांगत असताना , जगात फक्त करोनाविषयक घडामोडी घडत आहे असा अनेकांचा ग्रह होऊ शकतो . मात्र वस्तुस्थिती तशी नाहीये . करोनाबरोबर खगोल विज्ञानाचा क्षेत्रात सुद्धा अनेक विषयक घडामोडीं आपणास ज्ञात होण्यासाठी आजचा लेखन
         तर मित्रानो , येत्या महिन्याभरात जगातील तीन अवकाश संशोधन संस्था , ज्याची लग्नाचा बाजारात प्रचंड दहशत आहे , किंवा प्राचीन ग्रीक देवतेमध्ये ज्याची युद्धाची गणना होते , अश्या मंगळ  ग्रहावर तीन मोहीमा राबवणार आहेत .युनाटेड अरब  अमिरात देशाची   स्पेस एजन्सी, चीनची अंतराळ संशोधन संस्था, नासा या त्या तीन  अवकाश संशोधन संस्था आहेत . युनाटेड अरब अमिरात मार्फत  14 जुलैला मोहिमेची सुरवात
होणार आहे . तर चीन या देशाची स्पेस एजन्सी मार्फ़त 23 जुलैला मोहिमेची सुरवात होणार आहे आणि नासा या अवकाश संस्थेमार्फत जुलै महिन्याच्या अखेरच्या आठवड्यांत किंवा ऑगस्टच्या पहिल्या पंधरवड्यात मोहिमेला सुरवात होणार आहे  .
           युनाटेड अरब अमिरातीमार्फत राबवण्यात येणाऱ्या या मोहिमेत इस्रो ने देखील मोठी भुमिका बजावली आहे . इस्लामी विश्वातील देशांपैकी कोणत्याही देशांनी या आधी असी मोहिम राबवली नाहीये.किंबहूना अधिक सखोल सांगायचे झाल्यास  आखाती देश (पश्चिम आशिया आणि उत्तर आफ्रिकी इस्लाम हा प्रमुख धर्म असणाऱ्या देशांचा समुह)यातील ही पहिलीच मोहिम आहे. या मंगळमोहिमेद्वारे मंगळाच्या दोन उपग्रहांपैकी मोठ्या असणाऱ्या फोबाँस या उपग्रहाच्या अभ्यास करणार आहे . फोबाँस या उपग्रहांची विविध  या
मोहिमेद्वारे टिपले जातील . उड्डाण केल्यावर सुमारे 9 महिन्यांनी  हे अंतराळयान मंगळाच्या कक्षेत पोहचेल, आणि प्रत्यक्ष कार्याला सुरवात करेल. 
         या मोहिमेच्या अंतराळ यानाने उड्डाण केल्यावर 9दिवसांनी चीनची मंगळमोहिम सुरु होईल. ही मोहिमसुद्धा मंगळाच्या फोबाँस या उपग्रहाभोवती केंद्रीत असेल . युनाटेड अरब अमिरातच्या मंगळ मोहिमेच्या ऐवजी जगाला या मोहिमेतून अधिक अपेक्षा आहेत . आतापर्यत ज्या चार अवकाश संशोधन संस्थांनी मंगळाला यशस्वी गवसणी घातली आहे ,त्यामध्ये चीनचा समावेश होतो.(अन्य तीन म्हणजे आपला भारताची इस्रो , युरोपिय युनियनची अवकाश संशोधन संस्था, आणि नासा होय ) या अंतराळ संस्थेचा अंतराळ यानात दोन उपकरणे असणार आहेत .ज्याद्वारे फोबाँस या उपग्रहाची अधिक माहिती मिळेल. मंगळ या ग्रहाच्या फोबाँस या उपग्रहाची रचना  मंगळ आणि गुरु दरम्यान असणाऱ्या लघूग्रहांंसारखी आहे, (सर्व लघुग्रह खनिज संपत्तीचे भांडार आहेत, हे लक्षात घेणे अत्यावश्यक आहे) त्याचे अंतर देखील पृथ्वीपासून  फार लांब नाही, आणि भविष्यात मंगळावर मानवाची कायमस्वरुपी सृष्टी करण्याचे ठरवले तर यामध्ये फोबाँसची भूमिका महत्तवाची आहे . 
           मात्र या तिन्ही मोहिमेमधील सर्वात चित्तथरारक मोहिम असेल ती नासाची . नासाच्या अवकाश मोहिमेच्या उड्डाणाची तारीख अद्याप ठरलेली नाही . मात्र जूलैच्या अखेरच्या आठवड्यात अथवा पंधरा आँगस्टपर्यत त्याचे उड्डाण अपेक्षीत आहे . हे यान मंगळाचा भुमीवर उतरणार आहे .या यानात एक ड्रोन असल्याने मंगळाचा अधिक सखोल अभ्यास करता येणार आहे .नासाच्या या मोहिमेद्वारे मंगळावर कधीकाळी खरोखर जीवसृष्टी होती का ? याचा आढावा घेण्यात येणार आहे 
.           सध्या मंगळाच्या सभोवताली  कार्यरत असणाऱ्या मानवी यानामध्ये सप्टेंबर 2014मध्ये मंगळाच्या कक्षेत प्रवेश केलेले  आणि अजूनही कार्यरत असणारे भारताचे मंगलयान याचा समावेस करावाच लागेल. ही नक्कीच आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे .सध्याचे तंत्रज्ञान बघता पृथ्वी वगळता मानव राहु शकेल असा सुर्यमालिकेतील ग्रह म्हणजे मंगळ होय, त्यामुळेच जगभरातील संशोधक मंगळाचा अभ्यास करत आहेत, त्याच्या अभ्यासाला यश लाभो , असी अमळनेर आणि नाशिक सोडून खचितच  अन्यत्र मंदिर असणाऱ्या मंगळदेवाला मंगलमयी प्रार्थना करुन सध्यापुरते थांबतो, नमस्कार.








टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?