मराठीचे त्रांगडे

       
मला दोन एक दिवसापुर्वी जो मुळात मराठी भाषिक आहे, मात्र जो आता मराठीमध्ये न लिहता इंग्रजी भाषेत विज्ञान, भारताचे परराष्ट्र धोरण आदी विषयावर लेखन करतो,  अशी व्वक्ती भेटली. मला तो ज्या विषयावर लेखन करतो , त्या विषयावर मराठीत फारच कमी लेखन दिसत असल्याने आणि तो मुळात मराठी भाषिक असल्याने मी त्यास मराठीत या विषयावर का लेखन करीत नाहीस ? मराठीत लेखन केल्यास सर्वसामान्य, ग्रामीण जनतेस समजेल असे विचारल्यावर त्याने उपस्थित केलेले मुद्दे आपणापर्यत पोहचवण्यासाठी आजचे लेखन .त्याने दोन मुद्द्याला स्पर्श केला, पहिला प्रमाण मराठी आणि दुसरा मराठीतील शुद्धलेखनाचा अतिरेक .
              त्याचा अनुभवानुसार  मराठी या विषयावर जास्त लेखन  न येण्यामागे एक महत्त्वाचे कारण म्हणजे, एका ठराविक प्रदेशातील काही ठराविक व्यक्ती समुहात बोलल्या जाणाऱ्या भाषेला  प्रमाण भाषा म्हणून दिलेली मान्यता. सगळ्या मराठी भाषिक जनतेचा विचार करता ही संख्या अत्यंत तूटपुंजी आहे .मात्र त्यांची भाषा ही प्रमाणभाषा म्हणून इतरांवर लादण्यात आल्याने मराठी ही ज्ञानभाषा बनण्यापासून कोसोदुर जात आहे. त्याचामते इंग्रजी भाषेत अमेरीकन इंग्रजी, ब्रिटीश इंग्रजी असे विविध प्रवाह आहेत, आणि त्यांच्यात उच्चनिच्चता या प्रकारचा भेद नाहीये. त्याचप्रमाणे मराठीत प्रवाह निर्माण होणे आवश्यक आहे. प्रमाण भाषेला अवास्तव महत्त्व दिल्याने ती जाणणारा एकवर्ग आणि ती न जाणणारी दुसरावर्ग  असी दुफळी मराठी भाषिकांमध्ये होत असल्याने मराठीमध्ये अन्य भाषेचा तूलनेत कमी ज्ञान उपल्बध होते. परीणामी मराठी /ज्ञानभाषा बनण्यापासून कोसोमैल दुर जाते. 
                         त्याचप्रमाणे मराठीमध्ये र्हस्व दीर्घ यांचे प्रचंड स्तोम माजवले गेले आहे. याविषयी बोलताना तो म्हणाला की , मी मराठी भाषिक तज्ज्ञ  नाही, तर विज्ञान आणि परराष्ट्र धोरणविषयक तज्ज्ञ आहे, मात्र आपल्या

ज्ञानाचा मराठी भाषिक व्यक्तींना फायदा व्हावा, या उद्देशाने आपले लेखन पुण्यातील एका प्रकाशकाकडे दाखवले असता, त्या प्रकाशकाने त्याचा ज्ञानाची खोली न बघता, त्याचा शुद्धलेखनातील चुकाच काढल्याने अश्या मराठी भाषिकांसाठी न लिहलेलेच बरे असे त्याला वाटले
                    मित्रांनो,त्याचा बोलण्याचा गोषवारा सांगायचा झाल्यास भाषा  हे व्यक्त होण्याचे साधन आहे, साध्य नाही, हे समजणे आवश्यक आहे. मात्र या साधनालाच साध्य समजल्यामुळे भाषेच्या व्यक्त होण्याचा मुळ उद्देश्यालाच हरताळ फासला जातोय, परीणामी नाकापेक्षा मोती जड या म्हणीनुसार मराठीमध्ये लेखन करणे ही मुठभरांची मक्तेदारी होते. जनसामान्य त्यापासून दूर जातात. आंतीमतः  ते मुठभर जे ज्ञाननिर्मिती करतात .त्यावरच मराठी ज्ञानभाषा करण्याचे इमले रचले जातात. मुठभरांनीच लिहले असल्याने जनसामान्यांना असणारे ज्ञान मराठीमध्ये येतच नाही, परीणामी मराठी ज्ञानभाषा बनत नाही .प्रत्येक विषयाला विविध कांगोरे असतात,आणि एकाच वेळी ते सर्व समोर येणे शक्य नाही .मला भेटलेल्या व्यक्तीचे अनुभवविश्व  पुरेपुर असेल असाही माझा दावा नाही .  मी फक्त त्याचे अनुभवविश्व माझ्या शद्बात मांडले आहे, इतकेच माझा कोणाच्याही भावना दुखवायचा विचार नाही ,जर या लेखामुळे कोणाच्या भावना दुखवल्या असल्यास क्षमस्व  





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?