पाकिस्तानमुळे इस्लामी जगतात फुट ?

         
सध्या भारतीय माध्ममांमध्ये सुशांतसिंग राजपुत यांच्या दुर्देवी मृत्यू, पावसाने नाशिक सारख्या काही भागात दिलेली ओढ , तर  काही भागात केलेली दैना याप्रकारच्या बातम्यांनी हौदोस घातला असताना जगभरात एक नाट्य रंगत आहे, ज्याचा आपल्या भारताशी देखील सबंध असल्या कारणाने त्याची माहिती देण्याकरता आजचे लेखन.
                        तर जगभरातील सुमारे 25% देशांची संघटना (अचूकपणे सांगायचे झाल्यास 59) असणाऱ्या आँरगनायझेशन आँफ इस्लामिक कंट्रीझ् (जी OIC या नावाने प्रसिद्ध आहे) या संघटनेमध्ये पाकिस्तान या देशाने घेतलेल्या एका भुमिकेमुळे फुट पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.पाकिस्तानने उपस्थित केलेल्या काश्मीर प्रश्नावर संघटनेची भुमिका काय असावी? यावर संघटनेच्या सदस्य देशांमध्ये मतभेद असल्या कारणाने सन1968मध्ये इस्लाम हा प्रमुख धर्म असणाऱ्या देशांची संघटना म्हणून स्थापन झालेली OIC संघटना फुटीच्या उंबरठ्यावर उभी आहे .पुढील नकाश्यात जो हिरवा रंग दिसतोय ती सदस्य राष्ट्रे आहेत आणि जिथे जांभळा रंग दिसतोय तो निरीक्षक सदस्य(Observatory Member) राष्टांचा आहे 
पा                           किस्तानच्या या अंगाबरोबर OIC च्या मतभेदाचे अजून एक कारण आहे , ते म्हणजे सौदी अरेबिया आणि तूर्कस्थान (ज्याला तूर्की आणि टर्की असेही  म्हणतात) या दोन देशात असलेले शत्रूत्व, तसेच OIC या संघटनेवर सौदी अरेबिया या देशाच्या असलेला वरचष्मा .जो तूर्किला अक्षरशः डोळ्यात खुपत असल्याने त्यांंनी आपले वर्चस्व स्थापित करण्यासाठी चालवलेले प्रयत्न होय.
                       टर्की या देशाचा सायप्रस या देशाबरोबर विवाद आहे . सायप्रस या देशाबरोबर असल्याचे भारताने जाहिर केलेले असल्याने तूर्कस्थान आणि पाकिस्तान ही एक प्रकारची युती झालेली आहे. ज्यामुळे पाकिस्तानने आपण OIC सारखी दुसरी संघटना उभारी असे नूकतेच जाहिर केले आहे .तर तूर्कस्थानने आपण या षंघटनेतील सौदीचे वर्चस्व मानत नसून आपण देखील तितकेच तूल्यबल असल्याचे जाहिर केले आहे. (हे लिहीत असताना अद्याप दुसरी संघटना तयार झालेली नाही , हे लक्षात घेणे आवश्यक आहे) 
                   पाकिस्तानने घेतलेली भुमिका सौदी अरेबिया या देशाला अमान्य असल्याने  सौदीने पाकिस्तानला इंधनाची निर्यात करताना निर्यातीचे पैसे देण्यासाठी दिलेली खास सवलत काढून घेतली आहे .परीणामी पाकिस्तानची अर्थव्यवस्था अडचणीत येण्याची शक्यता आहे, (सदर मजकुर लिहीत असताना या धक्यातून सावरण्यासाठी चीनने पाकिस्तानला काही प्रमाणात अर्थसाह्य केले आहे)  त्यामुळे पाकिस्तान खरच OIC मधून बाहेर पडुन वेगळी चूल मांडतो का, हे बघणे आवश्यक आहे .
                  जर नवी संघटना अस्तित्वात आली तर त्यामध्ये , पाकिस्तान, तुर्कस्तान, आदींबरोबर मलेशिया असण्याची शक्यता या क्षेत्रातील जाणकार व्यक्त करत आहेत. जर खरोखरीच असी संघटना निर्माण झाली तर जगातील 205 देशांपैकी 59देशांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या  संघटनेतील फुट जगाच्या राजकरणावर प्रचंड प्रभाव टाकणार हे नक्की .
                     भारताच्या संदर्भात विचार करायचा झाल्यास सौदीसारखे जगातील मुख्य तेल उत्पादक देश मुळ संघटनेबरोबर कायम असल्यामुळे फारसा  नकारात्मक फरक पडणार नाही .उलट ज्याची भारत सातत्याने मागणी करतोय मात्र पाकिस्तान संघटनेत असल्याने जे भारताला मिळण्यास विलंब होत आहे, असे OICचे निरीक्षक सदस्य(Observatory Member) म्हणून मानत्या  मिळण्या संदर्भात सकारात्मक पाउले पडु शकतात . मात्र खरोखरीच OIC दुभंगली तरच हे शक्य आहे. ती दुभंगते का? हे बघणे खरोखरीच उत्सुकतेचे असेल . बघूया भविष्याचा पेटाऱ्यात काय आहे ते ?
(या लेखातील माहिती द,हिंदु इंडियन एक्सप्रेस, डेक्कन क्रोनीकल , आदी माध्यमातून घेतलेली आहे)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?