डावखुरेपणा एका शपित कलाकाराची निशाणी

       
अमेरीकेचे 44वे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा, मध्ययुगातील प्रख्यात चित्रकार डा विंची , ब्रिटीश सिने अभिनेता टाँम अल्टर , माजी क्रिकेटपटू सौरभ गांगुली, ब्रिटिश राज घरण्यातील.प्रिन्स चाल्स ही विविध एकमेकांच्या अर्था अर्थी काहीही सबंध नसणारी माणसे .मात्र या सर्वांचा मध्ये एक समान धागा आपणास दिसतो तो म्हणजे ही सर्व माणसे डावखुरी होती .

                  व्यक्तीच्या मेंदूचे उभे दोन भाग केल्यावर उजव्या भाग ज्यांचा अधिक शक्तीशाली आहे ,अश्या जगातील सात ते दहा टक्यांमध्ये मोडणाऱ्या व्यक्तीसमुहांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या या व्यक्ती होत्या . जगात सुमारे 10% असणाऱ्या या व्यक्तींना त्यांचा वेगळेपणामुळे कोणकोणत्या अडीअडचणींना सामोरे जावे लागते ? याबाबत जनजागृती होण्यासाठी , जगभरात दरवर्षी एक दिवस साजरा करण्यात येतो , तो म्हणजे 13आँगस्ट (13आँगस्ट हा दिवस जागतिक अवयवदानदिन म्हणून देखील साजरा करण्यात येतो, त्याविषयी मी लिहलेल्या पोस्टची लिंक या खाली देत आहे, जिज्ञांसू ती बघू शकतात)जो 1997पासून नियमित पणे साजरा करण्यात येतो . हा दिन पहिल्यांदा साजरा करण्यात आला तो 1976साली , तो दिन Dean R. Campbell यांनी साजरा केला. 
                                  एका संशोधनानुसार डावखुऱ्या व्यक्तींना विविध मानसिक व्याधी होण्याचे प्रमाण अधिक असतो . मात्र ते असले तरी या व्यक्तींना विविध कलेत चांगली गती असते, हे सुद्धा नाकारुन चालणार नाही . डावखुरी व्यक्तींचे प्रमाण आपल्या समाजात कमी असल्याने अनेक गोष्टी या बहुसंख्य असणाऱ्या उजव्या हाताचा वापर करणाऱ्या व्यक्तींना सोइस्कर होईल अश्या पद्धतीने तयार केल्या जातात , ज्यामुळे डावखुऱ्या लोकांना अनेक ठिकाणी अडचनींना सामोरे जावे लागते. मात्र पुर्वी ज्या प्रकारे डावखुरेपणा एक शाप समजला जात असे ,डावखुरेपणा असणाऱ्या व्यक्तींना सामाजिक बहिस्काराला सामोरे जावे लागत असे, ते प्रमाण आता  जवळपास शुन्यावर आले आहे ., हेही नसे थोडके . डावखुरेपणा व्यक्ती आईच्या गर्भात असताना आईकडून शरीराला हानी पोहचू शकते अस्या क्रिया झाल्याने होतो, असी माहिती मला इंटरनेटवर डावखुरेपणाबात सर्च करताना  सापडली . मात्र हा कोणताही जनुकीय बदलामुळे होणारी व्याधी नाही  हे आपण लक्षात घेण्यासारखे आहे .
डावूखुऱ्या व्यक्तींंना पुन्हा एकदा जागतिक डावखुऱ्या दिनाच्या मनापासून शुभेच्छा देवून सध्यापुरती आपली रजा घेतो ,नमस्कार .
माझ्या अवयवदानाच्या लेखाची लिंक 





  
 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?