भारत पाकिस्तान खेळी नव्या वळणावर

               
     दिनांक14 आँगस्टच्या बातम्या टिव्हीवर बघत असताना माझे लक्ष एका बातमीने वेधून  घेतले . तूर्कस्थान या  (ज्याला टर्की असेही म्हणतात ) देशामार्फत भारतात अशांतता निर्माण व्हावी यासाठी प्रयत्न सुरु असल्याची माहिती गुप्तचर विभागाला मिळाल्याची ती बातमी होती . या घटनेमागे दोन प्रमुख कारणे आहेत . त्यातील एक कारण तात्कालीक असून एका कारणाला 1963पासूनचा इतिहास आहे . हे तात्ककालीक कारण आँरगायझेशन आँफ इस्लामिक कंट्रीझ या संघटनेतील अंतर्गत राजकारण असून ,आँरगयाझेन आँफ इस्लामिक कंट्रीझ या संघटनेतील अंतर्गगत  राजकारणाविषयी मी या आधी लिहलेले आहे, ज्याची लिंक मी या लेखाच्या शेवटी दिली आहे,जिज्ञांसू ते बघू शकतात.मी हा लेख 1963पासून सुरु असणाऱ्या वादाची माहिती देण्यासाठी लिहीत आहे .
                 तर मित्रांनो तूर्कस्थान या देशाचे सायप्रस या  भुमध्य समुद्रातील बेटस्वरुपातील  असणाऱ्या देशाबरोबर असणाऱ्या  वादात भारताने सायप्रस या देशाच्या बाजूने आपले मतप्रदर्शन केल्यामुळे तूर्कस्थान भारतावर काहीसा नाराज आहे.  हा विवाद सायप्रस या देशातील इस्लामधर्मिय बांधवांची बहुसंख्येने वस्ती असणारा प्रदेश आणि ख्रिस्ती धर्मीय बांधवांची वस्ती असणारा प्रदेश या दोन भागांवरुन सुरू आहे इस्लामधर्मीय बांधव बहुसंख्य  असणाऱ्या प्रदेशामध्ये ज्यांचे तूर्कस्थान या देशातील मुळ आहे (,तूर्कस्थान हा इस्लामधर्मीय बहुसंख्य असणारा देश आहे ,हे लक्षात घेणे अत्यावश्यक आहे) लोकांची काही ऐताहासिक कारणामुळे वस्ती मोठ्या प्रमाणात आहे. तर ख्रिस्ती धर्मिय बांधव बहुसंख्य असणाऱ्या प्रदेशांत राहणाऱ्या  लोकांचे मुळ ग्रीस हा देश आहे . सन.1960मध्ये यूनाटेड किंग्डम या देशापासून स्वातंत्र्य मिळालेल्या या देशामध्ये सन 1963मध्ये काही कारणाने दोन धर्मियांमध्ये वादाची ठिणगी पडली. त्याचाच फायदा घेत तूर्कस्थानने सायप्रसवर आक्रमण करत इस्लामधर्मिय बहुसंख्य असणाऱ्या प्रदेशाला स्वतंत्र देश म्हणून घोषित केले .भारताचे  सुरवातीपासूनचे धोरण आक्रमणाच्या विरोधात असल्याने भारताने त्याचा विरोध करत , या स्वतंत्र देशाला मान्यता दिली नाही .परीणामी तूर्कस्थान भारताच्या विरोधात गेला .त्याचा परीणाम म्हणून तूर्कस्थान सातत्याने काश्मिर प्रश्नावर पाकिस्तानची पाठराखण करत आला आहे . 
                            सध्या आँरगयानझेशन आँफ इस्लामिक कंट्रीझ या संघटनेतील अंतर्गत राजकारण बघता तूर्कस्थान आणि पाकिस्तान हे अधिक जवळ आले आहेत .(ज्याची माहिती मी पाकिस्तानमुळे इस्लामी जगात फुट या शिर्षकाखाली लिहलेल्या लेखात दिलेली आहे. ज्याची लिंक या लेखाच्या शेवटी दिलेली आहे) ज्याचीच फलनिश्चिती म्हणून भारतीय गुप्तचर खात्याला मिळालेली माहिती आहे . अर्थात यावर योग्य ती पावले अर्थातच उचलली जातील या विषयी माझ्या मनात शंका नाही. 
                              हा लेख लिहीत असताना याच टर्की या देशाचा अजून एक विवाद समोर आला आहे . ज्यामध्ये ग्रीस आणि फ्रान्स हे युरोपीय देश एका बाजूला असून टर्की हा आशियाई देश  तसेच लिबिया हा आफ्रिकी देश यांचा एक गट आहे . त्यामुळे भुमध्य सागरातील संघर्ष कोणते वळण घेतो, हे बघणे उत्सुकतेचे ठरेल . याबाबत घडणाऱ्या घडामोडी तूम्हांला सांगण्याचा माझा प्रयत्न असेलच , मात्र तूर्तास इतकेच, नमस्कार 
(सदर लेखासाठी द हिंदू या वृत्तपत्राबरोबर केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी उपयुक्त ठरेल असे साहित्य प्रकाशीत करणाऱ्या स्टडी आय क्यु या युट्युब चँनेलची मदत घेण्यात आली आहे,)
माझ्या आँरगनायझेशन आँफ इस्लामिक कंट्रिझ या संघटनेविषयीच्या लेखाची लिंक 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?