सात वर्षे शरमेची

     
           सन 2020, आँगस्ट20 ही निव्वळ एक तारीख नाहीये . महाराष्ट्रातील विवेकाचा आवाज आपल्यातून निघून जाण्याला तब्बल 7वर्ष पुर्ण करणारा दिवस . आजच्याच दिवशी 7वर्षापुर्वी अर्थात सन2013 आँगस्ट 20रोजी पुण्यातील ओकांरेश्वर पुलाजवर सकाळी सव्वासातच्या सुमारास डाँ. नरेद्र दाभोळकर यांचा खुन करण्यात आला , आणि महाराष्ट्रातील विवेकाचा आवाज आपल्यातून कायमस्वरुपी निघून गेला   या सात वर्षात डॉक्टर नरेंद दाभोळकर यांच्या खून करणाऱ्या व्यक्तीला त्याच्या कृत्याची शिक्षा मिळणे दूरच त्यांच्या खून करणाऱ्या व्यक्ती नक्की कोण आहेत ? याचा पण उलगडा सरकारला करण्यात आलेला नाही . काही जणांना संशयित म्हणून अटक करून चौकशी करण्यात आली . मात्र त्यांच्याविरुद्ध पुण्याचा प्राथमिक न्यायालयात सुद्धा खटला दाखल होऊ शकला नाही . आपली भारतीय न्यायव्यवस्था ज्यांना माहिती आहे , त्यांना हेही माहिती असेल की , प्राथमिक न्यायालयाच्या निकालावर उच्च न्यायालय दाद मागता येते . उच्च न्यायालयाच्या निकालावर सर्वोच्च न्यायालयात अपील करता येते .  सर्वोच न्यायालयाच्या निकालावर राष्ट्रपतींकडे दया याचिका करता येते . आपल्या भारताच्या न्यायप्रणालीमध्ये याला किती वेळ लागेल याची काहीही मर्यादा निश्चित करण्यात आलेली नाही . त्यामुळे दाभोळकरांच्या खुन्याला शिक्षा कधी मिळणार ? हा मोठा प्रश्नच आहे . 
             आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये  51A या कलमा नुसार नागरिकांनी वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अवलंब करणे हे त्यांचे मूलभूत कर्तव्य आहे . मात्र याचा नागरिकांना विसर पडल्याने डॉक्टर नरेंद दाभोळकर यांच्या मारेकरी अद्याप मोकाट आहे . मी हा लेख लिहीत असताना देशासाठी  काहीही योगदान नसलेल्या एका अमिनेत्याचा मृत्यूबाबत चौकशी करण्यासाठी केंद्रीय अन्वेषण विभागाची (CBI) मदत घेतली जाणार असल्याची बातमी टिव्हीवर दाखवली जात आहे . एका सिने अभिनेत्याचा मृत्यूबाबत जी संवेदनशीलता सरकारकडून दाखवण्यात येते, त्याचा एक शतांश संवेदनशीलता देशातील राज्यघटनेत सांगितलेल्या मुलभुत कर्तव्यासाठी आपले जिवन वेचणाऱ्या व्यक्तीबाबत सरकारकडून दाखवण्यात येवू नये . 
                
             जून्या मराठी चित्रपटातील एक असामन्य सिनेमा म्हणजे सामना . त्यात सातत्याने सांगण्यात येते , मारुती कांबळेचे काय झाले? ही चित्रपटातील घटना पुण्यात सन 2013रोजी आँगस्ट महिन्यात 20 तारखेला घडली,आणि एक प्रश्न उपस्थित होत आहे, तो म्हणजे डाँ. नरेंद्र दाभोळकर यांचे काय झाले? 
अनेक पोलिसी प्रकरणांची फाईल कालांतराने कोणालाही काहीही शिक्षा न होता बंद होतात. दुर्देवाने डाँ. नरेद्र दाभोळकरांच्या हत्येबाबबत हेच घडताना दिसत आहे . ते मांडत असणारी भुमिका जरी योग्य असली तरी जनमताचा काहीसी विरोधी असल्याने याबाबत जनमताचा रेटा उभा रहाणे अशक्य आहे . त्यामुळे आपण एका महान विचारवंताला, समाजाला पुढे नेणाऱ्या समाजसुधारकाला न्याय देण्यात कमी पडलोय हे मात्र नक्की .
माझ्या या विषयावरील सन 2019 जूलै 26 रोजी लिहलेल्या पोस्टची लिंक



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?