रेल्वेतील बदलांची एक्सप्रेस सुसाट

मित्रांनो, सध्या आपण करोना, सुशांतसिंग राजपुत यांची आत्महत्या अश्या बातम्यांमध्ये गुरफुटुन गेलो असताना रेल्वेमध्ये अनेक दुरगामी परीणाम  करणाऱ्या घटना घडत आहेत .ज्याचा येणाऱ्या भविष्यकाळात मोठ्या प्रमाणात परीणाम झाल्याशिवाय राहणार नाही. तरी त्या विषयी माहिती करुन घेण्यासाठी आजचे लेखन . 
मित्रांनो या लेखात मी तूमच्याशी तीन गोष्टींबाबत बोलणार आहे . त्यातील एक गोष्ट प्रत्यक्ष रेल्वेप्रवाश्यांचा बाबत आहे, तर अन्य 2गोष्टी रेल्वे कर्मचाऱ्यांशी संबधीत आहे. त्यातही कर्मचाऱ्यांशी सबंधीत एक गोष्ट सकारात्मक आहे, तर एका गोष्टीला नकारत्मक छटा आहे .पहिले प्रवाश्यांचा बाबतीत असलेली गोष्ट बघूया.
तर करोना नंतरच्या काळात प्रवास करताना कमीत कमी मानवी संपर्क यावा या हेतूने रेल्वे आणि स्टेट बँक आँफ इंडिया या दोघांच्या सहकार्याने एक योजना सुरु करण्यात आलेली आहे, ज्या अंतर्गत स्टेट बँक आँफ इंडिया या बँकेचे रुपे कार्ड जर आरक्षणादरम्यान व्यवहार करताना वापरल्यास प्रवाशी भाड्यात 10% सुट देण्यात येणार आहे, आणि यावर आँनलाईन व्यवहारावर आकरण्यात येणारे 1% शुल्क देखील आकरण्यात येणार नाहीये. तसेच हे कार्ड वापरुन रेल्वे आरक्षण करणाऱ्या व्यक्तींना रेल्वेचा देशभरात असणाऱ्या सुटमधील सोइसुविधा तीन
महिन्यातून एकदा या पद्धतीने सवलतीच्या दरात वापरता येणार आहे, तसेच रेल्वे स्टेशन परीसरात असणाऱ्या काही दुकानातून स्वस्तात खरेदी करता येणार आहे . हा मजकुर लिहीत असताना ही सोय जरी फक्त स्टेट बँक आँफ इंडियाचा ग्राहकांसाठी असली तरी भविष्यात यामध्ये अन्य बँकांंचा समावेश करता येवू शकतो,असो .
आता कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी बघूया .तर पश्चिम मध्य रेल्वेच्या अजमेर डिव्हिजनतर्फे  आपल्या ड्युटीचा आठ ते दहा तासाच्या कालावधीत पाठीवर अवजड सामान रेल्वेमार्गातील सर्व अडथळ्यांवर मात करत पायी वाहून सुमारे 20किमी चा रेल्वेमार्ग सुरक्षीत आहे का ? याची चाचपणी करणाऱ्या गँगमनचे कार्य काहीसे सोपे व्हावे याहेतूने एका वाहनाची निर्मिती करण्यात आली आहे . सध्या या वाहनाला रेल्वेच्या सुरक्षा विभागाची मान्यता नसल्याने ते वापरता येत नाहीये , असो 
तर वळूया नकारात्मक बातमीकडे .
तर ब्रिटीशांच्या काळापासून रेल्वेत असणाऱ्या डाक मेसेंजर  या पदाला रद्द करण्याची प्रक्रीया रेल्वेने सुरू केली आहे .सध्याच्या तंत्रज्ञानाचा काळात या पदाची आवश्यकता नसल्याचे कारण यासाठी देण्यात येत आहे .अर्थात हे बदल काही ठिकाणी अनपेक्षीत नाहीत .कधीना कधी हे होणारच होते . तदापी हे बदल इतक्या लवकर होतील असे वाटले नव्हते, मात्र करोना काळात कमी झालेल्या कमी महसुलामुळे हे बदल अपेक्षीत वेळेपेक्षा लवकर झाले, इतकेच .
भारतीय रेल्वे आता विक्रमी वेगाने बदलत आहे, हेच वरील तिन्ही बदल सांगत आहेत . ही गती थांबवणे अशक्य आहे .मात्र हे बदल होताना तीने पुर्णतः व्यापारी दृष्टीने विचार नकरता देशातील गोर गरीब जनतेचा देखील विचार करावा, अशी इश्वरचरणी प्रार्थना करुन सध्यापुरते थांबतो,नमस्कार

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?