गोष्ट पृथ्वीबाहेरच्या समुद्राची

       

               सध्या  खगोलविश्वात अनेक  क्रांतिकारी म्हणता येतील असे शोध लागत आहे . मात्र आपल्या भारताच्या वृत्तवाहिन्या एका हिंदी सिने अभिनेत्याच्या मृत्यूबाबत पोलीसांबरोबर  तपासात मग्न असल्याने त्या याविषयी माहिती देऊ शकत नाही . त्यांची ही कमतरता भरून काढण्यासाठी सदरचे लेखन
                                    तर मित्रानो युनाटेड स्टेस्ट ऑफ अमेरिका या देशाची अंतराळ संस्था असणाऱ्या नासा या संस्थेमार्फत नुकतेच त्यांनी लावलेले शोध जाहीर करण्यात आले . जे मंगळ आणि गुरु या ग्रहाच्या मध्ये असणाऱ्या लघुग्रहांच्या पट्यातील (ASTEROID BELT ) सेरेस या बटुग्रहावर  (DRAFT PLANT  ) प्रकाश टाकणारे आहेत . (सेरेस या बटूग्रहाचे इंग्रजी स्पेलिंग CERES असून त्याचे दोन ते तीन वेगवेगळे उच्चार करण्यात येतात . मात्र सेरेस हा उच्चार अधिक करण्यात येत असल्याने मी तो वापरत आहे )  नासाने सेरेस या बटुग्रहाची माहिती काढण्यासाठी DAWN नावाचे  यान सन 2007 रोजी यान सोडले होते जे 2015  वेळी पोहोचले . त्या यानाने 2018  पर्यंत या बटूग्रहाच्या अभ्यास केला आणि त्याची माहिती पृथ्वीवर पोहोचवली.   ज्याचे विश्लेषण करण्याचे काम सध्या सुरु आहे .ज्या अंतर्गत या बटुग्रहावर खऱ्या अथवा गोड्या पाण्याचा महासागर असल्याचे पुरावे नासाला मिळाले  आहेत . शास्त्रज्ञांचा मते मानवासारखी सजीव श्रुष्टि असण्यासाठी जे मूलभूत घटक आवश्यक आहे , त्यामध्ये पाण्याचा क्रमांक फारच वरचा आहे . त्यामुळे या शोधला विशेष महत्व आहे . भविष्याचे गुरु ग्रहाचा पलीकडे मानवी वस्ती करायची झाल्यास याचा अत्यंत उपयोग होईल . 

मित्रानो सेरेस , हा मंगळ आणि गुरु या ग्रहाच्या मध्ये असणाऱ्या लघुग्रहांच्या पट्यातील  (ASTEROID BELT )सर्वात मोठा घटक ( OBJECT) आहे. एका अंदाजानुसार लघुग्रहांच्या पट्यातील  (ASTEROID BELT ) असणाऱ्या वस्तुमानातील 25% वस्तुमान सेरेसवर आहे . याचा  शोध सन 1801मध्ये लागला . आणि त्यास सन  2006 मध्ये बटू ग्रहाच्या दर्जा मिळाला . आपल्या सौरमालेत असणाऱ्या  6 बटुग्रहआहेत  . या आपल्या सौरमालेतील प्रसिद्ध  बटू ग्रह म्हणजे प्लूटो , आणि प्लुटोच्या गुरुत्वमध्यावरून त्याच्याशी जोडला गेलेला बटुग्रह अनेकदा ज्याचा उलेख प्लुटोचा उपग्रह म्हणून उल्लेख होतो तो शेरॉन ( काही वेळेस शेरॉन चा उल्लेख चेरॉन असा देखील होतो )आणि लघुग्रह पट्यातील इरॉस , मॅकमेल ,आणि होमिया  हे सौरमालेतील इतर बटु ग्रह  आहेत .  या शिवाय हेगीय नावाच्या लघु ग्रहाला बाटु ग्रह म्हणून बढती द्यावी म्हणून खगोल शात्रज्ञांनमध्ये चर्चा सूर आहे . असो 

 बटू ग्रह अश्या वस्तूला म्हणतात ज्या सूर्याभोवती फिरतात . ज्यांचे वस्तुमान लघुग्रहांपेक्षा अधिक असते मात्र ग्रहांपेक्षा कमी असते . तसेच त्यांचा आकार गोलाकार नसतो  त्यांची सूर्याभोवती फिरण्याची कक्षा ही  लंब वर्तुळाकार नसते ( कोणत्याही वस्तूला ग्रह म्हणून मान्यता मिळण्यासाठी  ती वस्तू गोलाकार असणे आवश्यक आहे तसेच . त्यांची सूर्याभोवती फिरण्याची कक्षा ही  लंब वर्तुळाकार असणे अत्यावश्यक आहे ) आपल्या सौरमालेत आता बुध, शुक्र , पृथ्वी मंगळ , गुरु शनी युरेनस नेपच्युन हे ग्रह आहेत हे आपण जाणतातच 
                                         या शोधामुळे मानवाला भविष्यात जास्तीत जास्त फायदा होवो अशी बुद्धीची देवता ज्याचा उत्सव आपण साजरा करतोय त्या गणपती चरणी प्रार्थना करून सध्यापुरते थांबतो, नमस्कार 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?