भारत ऐतिहासिक विजयाचा उंबरठ्यावर

 

29 ऑगस्ट  2020 रोजी भारतात राष्ट्रीय क्रीडादिन साजरा करण्यात येत असताना समस्त भारतीय क्रीडाविश्व आनंदाने न्हाऊन जावे अशी बातमी भारतात  येवून धडकली. ती होती , बुद्धीबळाच्या आँल्मपियाडमध्ये  भारतीय संघ पहिल्यांदाच आंतीम फेरीत पोहचण्याची , आणि या संघाचे  नेर्तुत्व करत आहे, एक महाराष्ट्रीयन खेळाडू,  नाशिकचा युवा गँंडमास्टर विदीत गुजराथी . 
मित्रांनो, सध्याच्या करोनाचा काहीस्या नैराश्याचा वातावरणात चैतन्य आणण्याचा या स्पर्धेची सुरवात झाली .ती 24जूलै रोजी .40 संघाच्या समावेश असणारी ही स्पर्धा करोनाच्या भितीमुळे पहिल्यांदाच आँनलाईन पद्धतीने खेळवण्यात आली . ज्यामध्ये भारताने सुरवातीच्या खेळ्यांमध्ये धडाकेबाज खेळ करत 27आँगस्ट पासून सुरू झालेल्या बाद फोटो य त   (नाँक आउट )मध्ये प्रवेश केला. उप उपांत्य फेरीत (क्याटर फायनल) भारताच्या संघाने अर्मेनियाचा पराभव केला आणि  उपांत्य फेरीत (सेमी फायनल )मध्ये  पोलंडचा  पराभव करत आंतिम फेरीत प्रवेश केला आहे . आंंतीम फेरी जागतिक प्रमाण वेळेनुसार 30आँगस्ट रोजी सायंकाळी चार वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्रीचे साडेअकरा )रोजी होणार आहे . ज्यामध्ये रशिया आणि  अमेरीका या दोन देशातील विजेत्यासी त्याची गाठ पडेल . हा मजकूर लिहीत असताना (29आँगस्ट रात्रीचे साडेअकरा ) रशिया आणि अमेरिका या दोन संघात आंतिम फेरी गाठण्यासाठी स्पर्धा सुरु आहे .

या आधी सन मध्ये  2014भारताने कांस्य (ब्राँझ) पदक मिळवले.होते . 1924पासून सुरु होवून विविध अडथळे अनियमितता यावर मात करत 1950साली झालेल्या 9व्या बुद्धिबळ आँल्मपियाडनंतर दर दोन वर्षांनी या बुद्धिबळ आँल्मपियाडमधील ही त्या वेळची सर्वोत्तम कामगिरी होती . त्यानंतर सहा वर्षांनी त्याही पेक्षा सरस कामगिरी आता भारतीय संघाकडून होत आहे .
मित्रांनो, या स्पर्धेत आंतीम पदापर्यत वाटचाल करताना भारताला अनेक अडथळांवर मात करावी लागली आहे. ज्यामध्ये अर्मेनियाच्या विरुद्ध आँनलाईन खेळताना वीजपुरवढा खंडीत होवून चार डावाच्या मालिकेत एक डाव गमावून सुद्धा , अर्मेनियाचा विरुद्ध विजयी आघाडी घेत पुढे वाटचाल सुरु ठेवण्याचा उल्लेख करावाच लागेल .
सध्या सुरु असलेले 44वे बुद्धिबळ आँल्मपियाड अनेक अर्थाने वेगळे आहे . आँनलाईन होण्याबरोबरच या आँल्मपियाडमध्ये पहिल्यांदाच बाद फेरीचा अवलंब करण्यात आला आहे. यापुढील आँल्मपियाड 1आँगस्ट 2022 रोजी सुरु होणार आहे, असो .


भारतीयांनी भारतात शोधलेल्या (कारण ब्रिटिशांनी भारतात 4 खेळ शोधले आहेत.) या खेळामध्ये रशिया सुरवातीपासून आघाडीवर आहे . या खेळाच्या आंतररष्ट्रीय संघटनेचे मुख्यालय पँरीस मध्ये आहे . मात्र हा इतिहास लवकरच बदलला जावून , भारत बुद्धिबळातील महासत्ता बनू शकतो, याची साक्ष आताचा भारताचे बुद्धिबळातील प्रतिनिधीत्व  करणारा संघ देतोय, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही . मी या आँल्मपियाडची काही माहिती या आधीच्या लेखात दिली आहे. लेखाची लिंक मी या लेखाच्या शेवटी देत आहे . जिज्ञासू ती बघू शकतात . तरी पुन्हा एकदा भारतीय बुद्धिबळ आँल्मपियाड संघाला शुभेच्छा देवून सध्या पुरते थांबतो , नमस्कार 
(या लेखासाठी नाशिकचे फिडे मान्यता प्राप्त पंच तसेच प्रशिक्षक श्री मंगेश गंभीरे आणि बुद्धिबळासाठी आशिया खंडातील पहिले  संकेतस्थळ तयार करणारे नाशिकचे नामवंत बुद्धिबळ खेळाडू श्री विनायक वार्डिले यांचे सहकार्य लाभले .त्याबद्दल त्यांचे आभार)
माझ्या बुद्धिबळ आँल्मपियाड विषयीच्या आधीच्या लेखाची लिंक 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?