रेल्वे प्रकाशाच्या गतीने बदलाकडे

     
            आपली भारतीय रेल्वे मार्गाच्या विस्ताराचा बाबतीत जगात चौथ्या क्रमांकावर आहे . तर रोजगारनिर्मितीचा विचार करता जगातील पहिल्या क्रमांकाचा सार्वजनिक उपक्रम आहे, हे आपण जाणतातच . तथापी जगाचा विचार करता तंत्रज्ञानाचा बाबतीत  भारतीय रेल्वे खूपच मागास आहे . मात्र सध्याचे केंद्र सरकारने  रेल्वेवरील हा कलंक पुसण्याचा चंग बांधला असल्याचे त्यांच्या रेल्वेबाबतचे धोरण बघता वाटते आहे . भारतीय रेल्वेत रोज  नवनवीन बदल घडत आहेत . गेल्या पंधरवड्यात रेल्वेत या संदर्भात तीन घटना घडल्या  माझे आजचे लेखन या तीन बाबींची माहिती करून देण्यासाठी . 
       तर मित्रानो,  या तीन घटनांपैकी दोन घटना या महाराष्ट्रात घडलेल्या आहेत . तर एका घटना राष्ट्रीय स्वरूपाची आहे . महाराष्ट्रात घडलेल्या दोन घटनांपैकी एक घटना पूर्णतः महाराष्ट्राशी संबंधित आहे , तर एक घटना अंशतः महाराष्टाशी संबंधित आहे . क्रमाक्रमाने या घटना बघूया . सुरवात पूर्णतः महाराष्टाशी संबंधित घटनेने . 
         भारतीय रेल्वेमार्फत सध्या अस्तित्वात असणाऱ्या मीटरगेज आणि नॅनोगेजचे रूपांतरण ब्रॉडगेज मध्ये
करण्याचे काम युध्दपातळीवर सुरु आहे . त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्रातील एका  मीटरगेज मार्गाचे नुकतेच ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्यात आले . दक्षिण मध्य रेल्वेच्या  नांदेड डिव्हिजनमध्ये येणारा  अकोला ते अकोट या दोन स्टेशनदरम्यान  असणाऱ्या या  मार्गाचे काम  जुलै 2017 मध्ये  प्रत्यक्ष सुरु करण्यात आले असले तरी  जानेवारी 2017 पासून हा मार्ग बंद करण्यात आला होता . त्याचे काम आता पूर्ण करण्यात आले आहे . रेल्वेच्या तांत्रिक सुरक्षा विभागाने या मार्गावर सुरक्षा चाचणी घेतली असून  त्यांनी या बाबत सकारात्मक अहवाल रेल्वेला दिला आहे . आता काही कागदपत्रांची पूर्तता झाल्यावर हा मार्ग प्रवाशी वाहतुकीसाठी मोकळा करण्यात येईल . 
           आता महाराष्ट्राशी अंशतः संबंधित असणाऱ्या गोष्टी विषयी बोलूया . 
          मध्य रेल्वेच्या पुणे डिव्हिजनतर्फे रेल्वे कर्मचाऱ्यांना प्रक्षिक्षण देणे सोईचे व्हावे यासाठी नुकतीच एका संकेत स्थळाची निर्मिती करण्यात आलेली आहे . या संकेतस्थळावर व्हिडीओ  आणि  पीडीएफच्या मार्फत रेल्वे कर्मचाऱ्यांना प्रक्षिक्षण देण्यात येणार आहे .ऑनलाईन पद्धतीने होणारे हे प्रक्षिक्षण   www. irot.in या संकेतस्थळामार्फत होणार असून भविष्याची झलक म्हणून याकडे बघता येऊ शकते आपण या खाली दिलेल्या छायाचित्रात या संकेतस्थळाचा इंटरफेस कशा आहे ? ते बघू शकता . आता दुसऱ्याने शिकवायचे दिवस गेलेले असून खासगी क्षेत्राप्रमाणे सरकारी क्षेत्रातही बदलत्या काळातील तंत्रज्ञानाशी स्वतःलाच  जुळवून घ्यावे लागणार असल्याचे या संकेत स्थळावरून स्पष्ट होत आहे . 
आता समस्त भारतावर परिणाम करणाऱ्या घटनेकडे बघूया 
तर दिड वर्षांपूर्वी आपल्या भारतीयांची मन असलेल्या ट्रेन 18 अर्थात वंदे भारत एक्स्प्रेसच्या धावण्याचा मार्गात वाढ करण्याची घोषणा नुकतीच रेल्वे मंत्रायलायकडून करण्यात आली आहे सध्या वंदे भारत रेल्वे  2  मार्गावर धावते रत्यामध्ये अजून 44 मार्गाची भर भारतीय रेल्वेमार्फत करण्यात येणार आहे . मध्यंतरी या विशेष प्रकारच्या रेल्वेच्या निर्मिती संदर्भात कंपन्यांना कामे देतात हितसंबधाचा विचार करण्यात आल्याचा  संशय बळकावला होता परिणामी या प्रकारच्या रेल्वेची निर्मिती प्रक्रिया थांबवण्यात आली होती . मात्र  आता हे ढग दूर झाले असून . पूर्वी फक्त चेन्नईच्या इंट्रीग्रेट कोच फॅक्टरी (ICF) येथे निर्माण होणारी ही रेल्वे आता रेल्वे कोच फॅक्टरी रायबरेली आणि रेल्वे कोच फॅक्टरी कपूरथला येथेही होणार आहे . तसेच या आधी या प्रकारच्या रेल्वेत पूर्वी  वापरण्यात आलेली सुमारे 20% भाग विदेशी बनावटीची होती .जे प्रमाण आता फक्त 5%असणार आहे . जे आपल्या भारतीयांसाठी अभिमानाचे ठरणार आहे . 
         वर सांगण्यात आलेले मुद्दे विचारता घेता आतापर्यत  हिंदी चित्रपटात ज्या प्रकारची रेल्वे दाखवण्यात आली ती रेल्वे यापुढे आपणास फक्त चित्रपटातच बघायला मिळणार हे त्रिवार सत्य आहे . चित्रपटाच्या माध्यमातून का होईना हा वारसा जतन होईल हीच काही समाधानाची 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?