भारतीय रेल्वे वेगाने बदलाच्या वाटेवर


              प्रवाश्याना प्रवास करताना सोईचे व्हावे या हेतूने विविध प्रकारच्या 8 आसनव्यवस्था असणारे डब्बे  (फर्स्ट एसी, एक्झिक्यूटीव्ह चेअर कार, स्लीपर, वगैरे )  पुरवणारी आपली भारतीय रेल्वेसेवा सध्याच्या करोना काळात  विक्रमी वेगाने बदलत आहे. गेल्या पंधरवड्यात भारतीय रेल्वेत तीन महत्त्वपूर्ण बदल झाले . माझे आजचे लेखन त्या विषयी माहिती देण्यासाठी या तीन बदलातील दोन बदल प्रत्यक्ष प्रवाश्यांच्या सेवेशी सबंधित आहेत , तर एक बदल रेल्वे कर्मचाऱ्यांशी सबंधित आहे . 
            तर मित्रानो, भारतीय रेल्वेमार्फत  प्रवाश्याना अधिक आरामदायी सेवा देता यावी, यासाठी भारतीय रेल्वेच्या स्लीपर आणि जनरल या डब्यात एसी बसवता येतील एका याबाबत चाचपणी करण्यात येत आहे . एका अंदाजानुसार सध्या रेल्वेच्या थ्री टायर एसी डब्यासारखी याची रचना असेल .ज्यामुळे थ्री टायर डब्यांचे भाडे काही प्रमाणात कमी होऊ शकते . यासाठी मात्र यासठी सध्या असणाऱ्या डब्याच्या खिडकीच्या रचनेत बदल करावे लागतील तसेच  डब्यातील समोरासमोर असणाऱ्या आसनातील अंतरे कमी करावी लागतील असेया क्षेत्रातील काही माहितगाराचे म्हणणे आहे 

           त्याच प्रमाणे प्रवाश्याना अधिक वेगवान सेवा देता यावी या हेतूने लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांचे काही अनावश्यक थांबे करून त्या रेल्वेगाड्यांचा या स्टेशनवर थांबल्याने जाणारा अनावश्यक वेळ कमी करण्याबरोबर ती रेल्वेगाडी स्टेशनवर थांबल्याने त्या मागून येणाऱ्या रेल्वेवर होणारा अनुचित परिणाम देखील थांबवण्यात रेल्वेला यश मिळू शकते . देशभरात असे  10,000 थांबे कमी करण्यात येणार आहेत . त्याच प्रमाणे ज्या गाड्यामध्ये गेल्या वर्षभरात 50 % जागा रिकाम्या राहिल्या अश्या अप मार्गावरील 250 आणि त्याची जोडी असणाऱ्या डाऊन मार्गावरील 250 रेल्वे अश्या प्रकारे एकूण 500 रेल्वे गाड्या रेल्वेकडून कायमस्वरूपी रद्द करण्यात आल्या  आहेत . ज्यामुळे रेल्वेरूळांवरील अनावश्यक गर्दी कमी होऊन त्याचा फायदा मालगाड्या आणि प्रवाशी  गाड्यांमचा वेग वाढण्यात होईल . परिणामी प्रवाश्यांचा प्रवाशाचा वेग वाढून त्यांना कमी वेळात आपल्या इच्छित स्थळी जाता येईल .त्यासाठी हा करोना साथीचा काळ संपल्यावर जेव्हा रेल्वेसेवा पूर्ववत सुरु होईल , तेव्हा झिरो बेस्ड टाईमटेबल या पध्द्तीचा अवलंब  करत रेल्वेसेवा पूर्ववत करण्याचा रेल्वे प्रशासनाचा विचार आहे 
        रेल्वे प्रवाश्याना देणाऱ्या या सुविधे बरोबर  मालवाहतुकीची सेवा मनुष्याच्या चुकीमुळे खंडित होऊ नये, यासाठी अमेरिका आदी विकसित देशात ज्या प्रमाणे मालवाहतुकीच्या गाडयांना शेवटी गार्डऐवजी  END OF TRIAN TRIMINALS  (जे EOTT या नावाने परिचित आहे ) नावाचे उपकरण असते, त्या प्रकारचे  उपकरण प्रायोगिक तत्त्वावर 250 रेल्वेगाडयांना लावण्यास नुकतीच  लावण्यास मंजुरी दिली आहे . ज्यामुळे रेल्वेतील मालवाहतुकीच्या गार्डची नोकरी करणाऱ्या लोकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड येईल अशी शंका काही व्यक्तींकडून व्यक्त करण्यात येते . जी काहीशी अयोग्य आहे ,असे म्हणता येऊ शकते , कारण ज्यांना रेल्वे गार्डच्या नोकरीतील बढती कशी होते ? हे माहिती आहे त्यांना हेही माहिती असेल की रेल्वे गार्डच्या नोकरीची सुरवातच मुळात मालगाड्याच्या गार्डमधून होते . मात्र भविष्यात  या टप्याला बगल देऊन गार्डला नोकरीच्या सुरवातीलाच प्रवाशी गाड्यावर नेमले जाते का ?  हे बघणे इछुकतेचे ठरेल . 

 भारतीय रेल्वे प्रचंड वेगाने कात टाकत असल्याचे आपणास गेल्या सहा ते सात महिन्यातील बातम्यांकडे नजर टाकली तर सहजतेने लक्षात  येते. माझा हे बदल आपणापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न असेलच , मात्र तूर्तास इतकेच , नमस्कार . 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?