हवामान बदल आणि आपण

       

  दिनांक 24 सप्टेंबर रोजी टिव्हीवर सर्फिंग करत असताना सिंगापूर येथून प्रक्षेपित होणाऱ्या "चँनेल न्युज एशिया" या वृत्तवाहिनीवर  इनसाईट या मालिकेत एक चांगला कार्यक्रम बघण्यात आला . त्याचे नाव "Climate change India's Disaster" असे होते . भारतीय वृत्तवाहिनीवर या प्रकारचे कार्यक्रम का  होत नाही?  हा प्रश्न सोडुन देवूया .मला तूमचे लक्ष वेधून घेयचे आहे, ते त्यात सांगितलेल्या माहितीकडे .
                एक तासाच्या या कार्यक्रमात सांगण्यात आलेल्या आकडेवारीनुसार जगात बदलत्या हवामानाच्या ज्या अनिष्ट घटना घडत आहेत , त्यापैकी 10%, घटना भारतात घडत आहेत. या घटनांमुळे "बदलत्या हवामानामुळे प्रभावित होवून गरीब झालेले लोक असा स्वतंत्र्य लोकसमुह भारतात आगामी काळात अस्तिवात येवू शकतो . भारतात सध्या होणाऱ्या बदलत्या हवामानाचा सर्वाधिक फटका गरीब जनतेला बसणार आहे . भागाचा विचार करता सर्वाधिक लोकसंख्येचा बिहार,  मुंबई अस्या प्रदेशांना तो जास्त बसणार आहे . यासाठी दिवसोंदिवस लहरी होत जाणारे हवामान , तसेच प्रशासनाचे अपुरे, अयोग्य पद्धतीने नियोजन यासाठी जवाबदार असल्याचे यात सांगितले आहे. या कार्यक्रमात काही लोकांच्या मुलाखती देखील दाखवण्यात आल्या ज्यामध्ये हवामान बदलाचा वेग दिवसोंदिवस वाढत आहे, असे सांगितले गेले . यामध्ये हवामान बदलामुळे सध्या अडचणीचा सामाना करत असणाऱ्या व्यक्तींबरोबर, केंद्रीय मंत्रीमंडळातील पर्यावरण बदलासी सबंधीत मंत्रालयातील वरीष्ठ अधिकारी , तसेच या क्षेत्रातील अभ्यासतांचा अस्या जवळपास 10जणांचा मुलाखती दाखवण्यात आला . सर्वांचा मुलाखतीचा सर्वसाधरण सुर भारताचे हवामान बदलाला सामोरे जाण्याचे प्रयत्न अपुरे असल्याचे सांगणारा होता . 
                 जगात सर्वाधिक लोकसंख्येचा विचार करता भारताची लोकसंख्या जगात दुसऱ्या क्रमांकाची आहे, हे आपण जाणतातच .त्यामुळे हा मुद्दा आपल्याकडे खुप मोठ्या प्रमाणावर चर्चिला जायला हवा .मात्र भारतीय वृत्तवाहिन्या कोणत्या विषयावर चर्चाचर्वण करतात, हे आपण जाणतातच . फ्रान्स , जर्मनी आदी देशात तेथील निवडणूका बदलते हवामान या विषयावर लढवल्या जातात . मात्र बदलत्या हवामानाचा सर्वात जास्त फटका बसणाऱ्या आपल्या भारतात याबाबत काय स्थिती आहे, आपण जाणतातच . राजस्थान सारख्या अत्यंत कमी पावसाच्या प्रदेशात देखील गेल्या काही काळात पुर आल्याचे आपणास माहिती असेलच . भारतातील 28 राज्यापैकी 11 सर्वाधिक लोकसंख्येचा राज्यात 2020 या वर्षात विविध तिव्रतेचे पुर आलेले आहेत . या बदलत्या हवामानाचा फटका शेतकरी आणि कोळी बांधवांना मोठ्या प्रमाणात बसणार आहे ,तरी आपल्याकडे आनंदी आनंद आहे, हे आपण जाणतातच .या चित्रात बदल होणे अत्यावश्यक आहे, जर या चित्रात सकारात्मक बदल झाला तर आणि तरच भारत जगात महासत्ता बनू शकतो. 
                भारतात आजही 2020 साली सर्वाधिक रोजगार शेती आणि शेतीसी निगडीत व्यवसायातून होतो, हे आपण येथे लक्षात घेतले पाहिजे .( जरी एकुण जिडिपीमध्ये शेतीचा वाटा दिवसोंदिवस कमी होत असला तरी {31आँगस्ट 2020 मध्ये प्रकाशीत झालेली आकडेवारी अत्यंत अपवादात्मक आहे. ती सोडून गेल्या काही वर्षातील आकडेवारी बघता शेतीचा जिडिपीतील वाटा कमी होत आहे .}) त्यामुळे आपण भारतीयांनी याकडे अधिक सजगतेने बघणे गरजेचे आहे . मात्र आतापर्यत आपण याकडे हवे तितके लक्ष दिलेले नाही , ही वस्तूस्थिती आहे . भविष्यात तरी आपण ही चूक सुधारु असी आशा व्यक्त करुन सध्यापुरते थांबतो, नमस्कार .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?