विश्वविक्रम करणारी आपली भारतीय रेल्वे

 


                      आपली भारतीय रेल्वे गेल्या काही दिवसापासून सातत्त्याने विश्वविक्रम करत आहे . हे सर्व विश्वविक्रम नवीन मार्ग उभारताना झाले आहेत . ज्यामध्ये नवीन मार्ग उभारताना उभारण्यात येणाऱ्या पुलांचा समावेश करावाच लागेल . गेल्या वर्षभरतील रेल्वेचा नवीन मार्ग उभारणीचा आढावा घेतल्यास जम्मू काश्मीर आणि आणि ईशान्य भारतात रेल्वेने अनेंकअर्थात  विश्वविक्रम करणारे पुलांची निर्मिती केल्याचे दिसते . अत्यंत प्रतिकूल भौगोलिक स्थितीवर मात करत रेल्वेने हे पूल बांधलेले आहेत . या प्रत्येक पुलाचे स्वतंत्र असे वैशिष्ट आहे . काही वेळेस ज्या  पूल ज्या समुद्रसपाटीवर उभारण्यात येत आहे त्यामुळे विश्वविक्रम होत आहे , कधी त्या  पुलासाठी वापरण्यात यणाऱ्या पद्दतीमुळे तर कधी , पुलाची उंचीमुळे हे पूल विश्वविक्रम करत आहे .  माझे आजचे लेखन त्या साठीच 
               मित्रानो , सध्या ईशान्य भारतातील राज्याच्या राजधान्या रेल्वेच्या नकाश्यावर आणण्याबरोबर जम्मू काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात रेल्वेमार्ग उभारण्याचे काम सुरु आहेत .त्याअंतर्गत हे पूल उभारले जात आहेत . ज्यामध्ये आसाम या राज्यातून मणिपूर या राज्याच्या राजधानी कोहिमा दरम्यान उभारण्यात येणार असणारा रेल्वेमार्ग आणि जम्मू  काश्मीर या केंद्रशासित प्रदेशात जम्मू ते बारामुल्ला तसेच  बक्कल आणि कावरी  या रेल्वेमार्गावर चिनाब या नदीवर उभारण्यात येणारे पूल अधिक महत्त्वाचे आहेत . अत्यंत दुर्गम ज्याठिकाणी बांधकाम साहित्य पोहोचवणे अवघड आहे .प्राकृतिक अडथळ्यांबरोबरच लहरी हवामानाचा सामना करत देशाच्या सीमावर्ती भागात हे पूल बांधण्यात येत आहेत त्यासाठी  केंद्र  कंपनी असणाऱ्या कोकण रेल्वेची मदत घेत आहे (कोकण रेल्वे भारतीय रेल्वे अंतर्गत कार्य करत नाही . केंद्र सरकारची स्वतंत्र कंपनी म्हणून कोकण रेल्वेचा कारभार बघितला जातो )

                    हे पुल नेहमी प्रमाणे  पुलाचे खांब उभारून बांधलेले पूल नसून (ज्याला अभियांत्रिकीच्या भाषेत  ग्रीडर ब्रिज म्हणतात )  या पुलांच्या बांधणीसाठी पारंपरिक तंत्राबरोबर केबल स्टील ब्रिज तसेच आर्क ब्रिज या तंत्रज्ञाचा सुद्धा वापर करण्यात येत आहे . त्यांची ,थोडक्यात माहिती  पुढील प्रमाणे . 

सर्वप्रथम ईशान्य भारत बघूया .तर ईशान्य भारतातील मणिपूर राज्याची राजधानी कोहिमा रेल्वेच्या नकाश्यावर येण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या 110 किलोमीटरच्या रेल्वेमार्गावर तब्ब्ल 149 पूल बांधण्यात येणार आहेत (त्यांना वेगळी नावे न देता त्यांच्या क्रमांकानुसार त्यांना ओळखले जाणार आहे ).ज्यामध्ये 42 क्रमांकाचा पूल जगातील सर्वात उंच पूल असणार आहे . हा पूल नेहमीच्या  खांब उभारून केला जाणार आहे या भागातील दुर्गम स्थिती बघता हा   मार्ग डिसेंबर 2021 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे . हा पूल बांधताना केलेल्या नियोजनानुसार हा मार्ग  या आधीच पूर्ण होणे अपेक्षित  होते मात्र पूल बांधताना आलेल्या अनपेक्षित समस्यांनीहा मार्ग पूर्ण होण्याची अप्रेक्षीत वेळ हुकली . या आधी या कामाला दोनदा मुदतवाढ मिळाली आहे . सध्या ईशान्य भारतातील आसाम , त्रिपुरा , आणि अरुणाचल प्रदेश या तीनच राज्यातील राजधान्या रेल्वेच्या नकाश्यात आहेत . त्यात या भागात सुरु असलेल्या रेल्वेमार्गाच्या कामामुळे भविष्यात बदल होणार हे नक्की . 

 

आता जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशामध्ये सुरु असणाऱ्या रेल्वे कामाबाबत बोलूया . या प्रदेशात दोन विश्वविक्रम करणारे पूल रेल्वेमार्फत उभारण्यात येत आहेत . हे दोन्ही पूल चिनाब या नदीवर उभारण्यात येत असून त्याला चिनाब ब्रिज आणि अंजु खाड  ब्रिज अशी नावे आहेत . प्रथमतः चिनाब ब्रिज विषयी बोलूया . हा पूल आर्क ब्रिज या प्रकारातील असून यांची लांबी 1315 मीटर असणार आहे याची उंची नदीच्या पातळीपासून 359 मीटर असणार असून हा मार्ग कटरा  या जमू भागातील कटरा  भागाला श्रीनगर भागातील गौरी या भागाला  जोडतो . या पूल निर्मितीचे कंत्राट  2004  मध्ये देण्यात आले होते . त्यानुसार2007 मध्ये हा पूल पूर्ण होणे अपेक्षित होते . मात्र काही पर्यावरणीय समस्या , जमिनीचे अधिग्रहण तसेच काही न्यायालयीन दाव्यामुळे हे काम लांबत गेले . जे आता बहुतेक पूर्ण झाले आहे .  अंजु खा ब्रिज विषयी बोलायचे झाल्यास हा पूल केबल स्टेड  ब्रिज या प्रकारातील आहे हा पूल कटरा आणि रेवाई विभागांना जोडतो हा पूल जम्मू बारामुल्ला या रेल्वेमार्गावर उभारण्यात आला आहे . आपल्या भारतात या आधी केबल स्टेड पूल उभारण्यात आले आहेत . मात्र हे रस्ते मार्गासाठी आहेत . रेल्वेसाठी या प्रकारचा हा  पहिला पूल आहे . या मध्ये एकच टॉवर असणार आहे . ज्याच 331 मीटर असणार आहे . यासाठी 473.5 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे   मित्रानो देशाच्या  सुरक्षेत  हे तिन्ही पूल मोठी भूमिका बजावणार हे नक्की . या पुलाचे बांधकाम  कोणत्याही प्रकारच्या अडथळ्याशिवाय निर्विघ्नपणे पार पडो अशी ईश्वर चरणी मनो कामना करून सध्यापुरते , थांबतो , नमस्कर

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?