ईशान्य भारत आणि इतर भारताचा भाग यातील सेतू बांगलादेश


मित्रानो, सध्या आपल्या भारतीय वृत्तवाहिन्या एका अभिनेत्याच्या अकाली मृत्यूमुळे उठलेल्या वावटळाच्या बातम्यांत मग्न असताना भारताचा विचार केला असता काहीश्या बाजूला असणाऱ्या ईशान्य भारताचा भारताचा इतर भागाशी अधिक प्रमाणात संपर्क यावा , ज्यामुळे भारताची एकत्मकता अधिक प्रमाणत वाढीस लागेल या हेतूने अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत . ज्याचामध्ये भारताचा महत्तवाचा साथीदार म्हणून बांगलादेश महत्तवाची भुमिका बजावत आहे. माझे आजचे लेखन या बांगलादेशाच्या सहभागाविषयी माहिती करुन देण्यासाठी 
                     तर मित्रांनो,  गेल्या महिन्याभरात ईशान्य भारताशी जलद संपर्क व्हावा या हेतून बांगलादेशाबरोबर 2  कामांचा शुभारंभ करण्यात आला, आणि एका कामासंदर्भात  काही महत्व्वाचे करार करण्यात आले . ज्या कामाच्या शुभारंभ करण्यात आला ती कामे बांगलादेशाबरोबर जलवाहतुकीद्वारे संपर्क साधून त्याद्वारे ईशान्य भारतात विविध सामानाची नेआण करण्या संदर्भात आहे . ज्यामध्ये समुद्री मार्गाबरोबर बांगलादेशातील नद्यांचा वापर करत ईशान्य भारतापर्यंत पोहोचण्याचा उपाय योजनांचा समावेश आहे . ज्या कामासंदर्भात करार करण्यात आले त्यामध्ये भारतातून बांग्लादेशात जाणाऱ्या तीन नवीन रेल्वे मार्गाची निर्मिती हे प्रमुख काम आहे . आता प्रत्येक काम विस्ताराने बघूया . 

पहिले रेल्वेलाईन विषयी बोलूया तर मित्रानो भारत स्वतंत्र झाला त्यावेळी भारत आणि त्यावेळच्या पूर्व पाकिस्तान  या दरम्यान 7 रेल्वेलाईन होत्या . ज्या कालांतराने बंद करण्यात आल्या . बांगलादेशला पाकिस्तान  पासून स्वतंत्र मिळाल्यावर त्यातील 4 रेल्वेरूट पुन्हा सुरु करण्यात आले . जे आहेत गेंडे (भारत ) ते दर्शन (बांगलादेश ), पेट्रापोले (भारत )ते बेनपावलो (बांगलादेश ) सिंघबाड (भारत ) ते रोहनपूर आणि राधिकापूर (भारत )ते बर्नोल (बांगलादेश ) मात्र ईशान्य भारताशी चिकन नेक चा जेमतेम 65 किमी रुंद असणाऱ्या बांग्लादेश, नेपाळ  भूतान या तीन देशांनी वेढला गेलेल्या चीनच्या सीमारेषेपासून जवळ असणाऱ्या भागात दुर्दैवाने काही अडथळा आल्यास आपल्या भारताचा 2.5%  भूभाग असणाऱ्या ईशान्य भारताचा मूळ भूभागाशी असणारा संपर्क तुटू नये यासाठी बांगलादेशाची मदत घेण्याचे केंद्र सरकारने ठरवले आणि भारत बांगलादेश या दरम्यान .चार    रेल्वे लाईन नव्याने प्रस्तावित करण्यात आल्या ज्या आहेत हल्लिडाबरी (भारत ) ते छिल्लरी (बांगलादेश ), शहाबाझार (भारत )  ते महिशासन (बांगलादेश ) आणि आगारतला  (भारत ) ते अखूरा (बांगलादेश ) तसेच कोलकाता   (भारत ) ते राजशाही  (बांगलादेश )  यातील आगारतला  (भारत ) ते अखूरा (बांगलादेश )  या रेल्वेलाइनचे काम गेल्या काही वर्षापसून सुरु आहे . मात्र या पंधरा किमीच्या अंतरातील बंगलादेशाच्या हद्दीतील दहा किमीसाठी बांगलादेशला जमीन अधिग्रहणात काही  काम थांबले होते  तर नव्या तीन  मार्गांना मंजुरी देण्यात आली आहे . 


आता बोलूया जलमार्गाविषयी .जलमार्गाविषयी बोलताना प्रथम बोलूया समुद्रातून जाणाऱ्या मार्गाविषयी 
तर बांगलादेश पाकिस्तानपासून स्वतंत्र झाल्यावर दुसऱ्याच वर्षी म्हणजेच 1972 त्या वेळच्या दोन्ही सरकारने दोन्ही देशाच्या विशिष्ट बंदरावरून विशिषष्ट मार्गाने जलवाहतूक सूर करण्याविषयी प्राथमिक बोलणी झाली होती  मात्र त्यावर पुढे काही कार्यवाही झाली नाही सन 2010 बांगलादेशने त्यांचे चित्तगाव आणि मंगलो या  दोन \बंदरासाठी   transit  agreement भारताबरोबर केले सन  2015 यासाठी MOU करण्यात आले यासाठीच करार 2018 केल्यावर काही बाबींची पूर्तता 2019 केल्यावर आता जुलै महिन्यात भारताकडून पहिल्यांदा यामार्गे ईशान्य भारतात माल पाठवण्यात आला 2020 च्या मी महिन्यात यामध्ये भारताकडून मूळ प्रस्तवात बदल करण्यात आला ज्यामुळे सध्या या मध्ये 10मार्ग आणि  11 बंदराचा समावेश करण्यात आला आहे . या पहिल्या मालवाहतुकीद्वारा  भारताच्या  कोलकाताच्या बंदरातून  बांगलादेशातील चित्तगाँव आणि मंगलो या बंदरात माल पाठवण्यता आला तिथून बांगलादेशातील अखूरा या शहरातून भारतातील आगारताला या शहारत तर तमाबाईल या बांगलादेश मधील गावामधून  भारतातील दावकी आणि सुतारमाला या भारतातील गावात शेईला या बांगलादेश मधील गावामधून आणि बांगलादेशमधील बिरबीरबझार या गावातून भारतातील श्रीमंतपूर या शहरात रेल्वे जलवाहतूक आणि रस्ते रस्ते मार्गे माल पोहोचवण्यात आला
आता बोलूया बांगलादेशच्या नद्यांतून होणाऱ्या मालवाहतुकीविषयी 
तर मे 2020 केलेल्या करारानुसार बांगलादेष्टील दौंडीकंडी या जिल्ह्यातून भारताच्या त्रिपुरा राज्यातील सोनमुरा या शहरापर्यंत गुमती या नदीमार्फत जलवाहतूक करता येणार आहे . 
मित्रानो  या नव्या रेल्वे आणि जल वाहतुकीच्या मार्गामुळे बांगलादेशातील वाहतूक व्यवस्थेचा  दर्जा सुधारणार आहे .ईशान्य भारताशी इतर भारताच्या संपर्क करण्याचे नवे मार्ग अस्तित्वात  येणार आहे तसेच यामुळे बांगलादेशला काही प्रमाणत धन संचय देखील करता येऊ शकतो . ज्यामुळे भारत आणि बांगलादेश या दोन्हीचा फायदा होईल . भारताच्या शेजारी एक मित्र देश तयार होईल त्यामुळे आपण या नव्य मार्गाचे स्वागतच करायला हवे . 
(यासाठी माहिती गोळा करताना मला गावांची नावे इंग्रजीत मिळाली , त्याचे मराठीत लेखन करताना काही प्रमाणात मूळ उच्चारात बदल होऊ शकतो . मी यासाठी माहिती गोळा करण्यासाठी  द हिंदू हे वर्तमानपत्राचा आधार घेतला आहे )
 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?