नोबेल आणि भारतीय

           

नुकतेच विविध क्षेत्रातील नोबेल पुरस्कार जाहिर झाले . त्यामध्ये अपवाद वगळता जे नेहमी होते, तसेच झाले , भारताची झोळी रिकामीच राहिली .जगातील सर्वाधिक मोठी लोकशाही, लोकसंख्येचा बाबतीत दुसऱ्या क्रमांकाच्या देशाला हे निश्चितच भुषणावह नाही. तसेच आतापर्यंत जे जे नोबेल पुरस्कार भारताला मिळाले आहेत त्यापैकी सी व्ही रामन यांच्या अपवाद वगळता अन्य सर्व पुरस्कार हे सामाजिक शास्त्रे या प्रकारातील आहेत . नैसर्गिक शास्त्रे म्हणून जी शास्त्रे ओळखली जातात . त्या भौतिकशास्त्र,   रसायनशास्त्र, जीवशास्त्र आदी प्रकारातील नोबेल आपणास जेव्हा मिळतील, तेव्हा आणि तेव्हाच आपण महासत्ता म्हणून घेण्यास लायक ठरू असे मला वाटते . 
      काही जण नोबेल पुरस्कार हे प्रामाणिक नाहीत त्यामुळे भारतीयांना नोबेल पुरस्कार नाही असा दावा करतील . मात्र माझ्या मते हे पूर्णतः अयोग्य आहे .आपल्या मनाची समजूत करण्यासाठी आपणच तयार केलेल्या गोष्टी म्हणूनच याकडे बघावे लागेल.मला भारताचे नागरीकत्व असणारे लोकच यासाठी अपेक्षीत आहेत. थोर भौतिकशास्त्र शास्त्रज्ञ सि व्ही रामन यांचे भाचे डाँ . चंद्रशेखर हे जन्माने भारतीय असले तरी जेव्हा त्यांना नोबेल पुरस्काराने सम्मानित करण्यात आले तेव्हा ते अमेरीकेचे नागरीक झाले होते. त्यामुळे त्यांचा सारख्या व्यक्तींचा विचार भारतीय म्हणून करणे अशक्य आहे.
एकेकाळी समस्त जगाला विज्ञानात क्रांतीकारक ठरतील असे योगदान देणारा आपला देश आजमितीस मात्र या क्षेत्रात अत्यंत मागे पडलेला आहे, हे सत्य आपण जितके लवकर स्विकारु, तितके चांगले हे आपण मान्य करायलाच हवे. भारतावर आक्रमण केलेल्या आक्रमकांनी ते नष्ट केले ही बाब स्विकार्ह्य नाही, आक्रमक कितीही शक्तीशाली असला तरी तो परदेशात असल्याने येथील लोकांच्या संख्येने तूलनेने कमीच असणार.  तरीही त्यांनी आपल्यावर मात केली कारण आपण सुरवातीच्या काळात विज्ञानाकडे लक्ष्य दिल्यावर विज्ञानाकडे केलेले दुर्लक्ष होय .
ही ऐताहासिक चूक आपण सुधारुन यापुढे विज्ञानाला अधिक महत्व देवू तेव्हा आणि तेव्हाच खऱ्या अर्थाने महासत्ता बनू हे सुर्यप्रकाशईतके स्वच्छ आहे. ही जाण आपणास लवकरात लवकर येवो , जेणेकरुन आपल जलद गतीने महासत्तापदाला पोहचू, अशी आशा व्यक्त करुन सध्यापुरते थांबतो, नमस्कार.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?