भारतीय अर्थव्यवस्था तळापासून तिसऱ्या स्थानी


                                 मित्रांनो, सध्या भारतात जीवनावश्यक नसणाऱ्या अनेक मुद्यांवर गरमागरम चर्चा रंगली असताना आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMG) चा एक अहवाल प्रसिद्ध झाला आहे . ज्यामध्ये भारताची अर्थव्यवस्था जगात इटली ,स्पेन या देशानंतर जगातील तिसरी अत्यंत वाईट अर्थव्यवस्था असल्याचे सांगितले आहे. पुढील कालावधीत जगाचा एकुण अर्थव्यवस्थेचा वाढीचा  दर सुमारे 4% टक्के घसरेल मात्र भारताची अर्थव्यवस्था 10.4% टक्याने घसरेल अशी भिती व्यक्त करण्यात आली आहे . दोन अंकी घसरण असणाऱ्या मोजक्या देशांच्या यादीत  भारताचा समावेश असेल, असे या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. आणि हे सांगितले आहे आय एम एफ च्या मुख्य अर्थशास्त्रज्ञ असणाऱ्या मुळच्या भारतीय वंशाच्या अमेरीकी नागरीक  गीता गोपीनाथ  यांनी 
                        भारतीय अर्थव्यवस्था अत्यंत खडतर अवस्थेमधून जात आहे. अमेरीका आदी पाश्चात्य देशातील नागरीकांचे दरदोई उत्पन, त्यातील सार्वजनिक सेवेचा दर्जा, ते वापरणाऱ्या व्यक्तींचे प्रमाण, आणि या मुद्दयांवर असणारी भारतीयांची स्थिती या बाबींचा विचार करता आपली स्थिती अत्यंत बिकट असल्याचे दिसून येत आहे. कित्येक युरोपिय देशांच्या एकूण लोकसंख्येपेक्षा आपल्या येथील बेरोजगारांची संख्या अधिक आहे. हेही आपण लक्षात घेतले पाहिजे .करोनामुळे ही स्थिती वाईट झाल्याचे सांगण्यात येत असले तरी ते तितकेसे खरे नाही.गेल्या दिड वर्षांपासून दर दोन महिन्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेचे आकडे प्रसिद्ध होतात त्याचा मागोवा घेतल्यास आपणस भारतीय अर्थव्यवस्था अडचणीत असल्याचे दिसतच होते . करोनमुळे ती अधिकच अडचणीत आली इतकेच या अहवालात  पर कॅपिटा जीडीपीचा विचार करता भारतापेक्षा बांगलादेशाची स्थिती येत्या काही दिवसात उत्तम होणार असल्याचेही सांगण्यात आले आहे .
                       जगभरातील  महत्त्वाच्या अर्थव्यवस्थेत समाविष्ट होणाऱ्या अर्थव्यवस्थांच्या विचार करता भारताची अर्थव्यवस्था अत्यंत वाईट असल्याचे देखील या अहवालात नमूद करण्यात आले आहे हा अहवाल भारतासाठी अत्यंत सूचक इशारा आहे.  आपण आय एम एफ च्या इशाऱ्यावर दुर्लक्ष केल्यास त्याचे गंभीर परिणाम होतील हे सांगायला कोण्या ज्योतिष्याची गरज नाही. याबाबत आवश्यक ती पाऊले संबधित यंत्रणा उचलतील अशी अशा व्यक्त करून सध्यापुरते थांबतो , नमस्कार . 




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?