अस्थिर आशिया

           
            सध्या आपण भारतीय व्यक्ती विविध नैसर्गिक संकटांनी हतबल झालेलो असताना, जगाचे वातावरण देखील अत्यंत तापलेले आहे . आपण  भारतीय  राहतो ,त्या आशिया खंडातील 3 देशात विविध कारणावरून राजकीय आंदोलने अक्षरशः पेटलेली आहेत . तर आपल्या आशिया खंडातील दोन देशांचे आपसात छोटे युद्ध देखील झाले .  ज्या देशात सध्या विविध कारणांनी आंदोलने चालू आहेत . ते देश आहे थायलंड , कझाकिस्तान , आणि पाकिस्तान . तर ज्या देशात युद्ध झाले ते देश आहेत आर्मेनिया आणि अझरबेकिस्तान  मित्रानो आता या घडामोडी सविस्तर बघूया सर्वप्रथम युद्ध ज्या देशात झाले ते बघूया . 
तर सन 1990 पर्यत सेव्हियत सोशालिस्ट रशियाचे भाग असणारे आणि सेव्हियत सोशालिस्ट रशियाचे विभाजन झाल्यानंतर स्वतंत्र्य झालेल्या अर्मेनिया आणि अझरबैझान दोन देशांचे युद्ध नुकतेच झाले . त्यातील अर्मेनिया हा देश खिस्ती धर्मीयांची अधिक वस्ती असणारा देश आहे, तर अझरबैझान हा देश मुस्लिम धर्मियांची प्रामुख्याने वस्ती असणारा देश आहे . हे देश सेव्हीयत युनियनचा भाग असताना आखलेल्या सिमा हद्दीवरुन  या दोन्ही देशांचे त्यांचा स्वातंत्र्यापासूनच वाद आहेत . त्यावरुन सातत्याने त्यांचात नेहमी चकमकी होत असतात . मात्र यावेळी झालेली चकमक ही छोट्या युद्धासारखी होती .हा मजकूर लिहीत असताना (20 ऑक्टोबर 2020 रोजी) सुमारे पंधरा दिवस चाललेली  ही युद्धससदृश्य चकमक थांबली आहे . सुरवातीला कोणीही माघार घेण्यास तयार नव्हता, मात्र रशिया आणि तूर्कस्थान या देशांच्या मध्यस्थीनंतर ही चकमक थांबली आहे . या चकमकीच्या वेळी भारताने अर्मेनियाची बाजू घेतली होती , तर पाकिस्तानने अझरबैझानची बाजू घेतली होती . या यु़्ध्दात अर्मेनियाचे अझरबैझानच्या तूलनेत थोडे अधिक नुकसान झाले .

आता वळूया राजकीय आंदोलनांकडे सर्वप्रथम बघूया कझाकिस्तानच्या आंदोलनाकडे . अझरबैझान आणि अर्मेनियासारखाच सेव्हीयत युनियनचे विघटन झाल्यावर स्वतंत्र्य झालेला कझाकिस्तान या क्षेत्रफळाच्या बाबतीत आठव्या क्रमांकावर (सातव्या क्रमांकावर आपला भारत)असणाऱ्या देशात केंद्रीय विधीमंडळाची निवडणूक 4ऑक्टोबरला  झाल्यावर आलेल्या निकालानुसार तेथील सत्ताधिकारी पक्षाने परत सत्ता मिळवली .मात्र त्या  विरोधात राजधानीत मोठ्या प्रमाणात आंदोलने सुरु आहेत , निकालात गैर प्रकार झाल्याचा विरोधकांचा आरोप आहे हा लेख लिहीत असताना (20 ऑक्टोबर 2020 रोजी) तेथील राष्ट्राध्यक्ष Sooronbay Jeenbeko यांनी राजीनामा दिला  असून सध्या काळजीवाहू राष्ट्रध्यक्ष म्हणून Sadyr  Japanov  हे काम पाहत असून त्यांनी जानेवारी  2021   पर्यंत नव्यने राष्ट्राध्यक्ष आणि केंद्रीय विधिमंडळासाठी नव्यने  निवडणूका  घेण्याचे जाहीर केले आहे 
या झाल्या नुकत्याच झालेल्या घडामोडी .आता वळूया हा लेख लिहीत असताना ज्या घडामोडींना वेग येत आहे, त्या घडामोडींकडे  . तर सध्या जगाचे लक्ष आशिया खंडातील दोन देशांकडे लागलेले आहे, ते म्हणजे  थायलंड आणि पाकिस्तान.

थायलंडमध्ये सन 1932 पासून सुरू असलेली घटनादत्त राजेशाही संपुष्टात येवून तेथील राष्ट्रप्रमुख हा लोकशाही मार्गाने निवडण्यात यावा, यासाठी देशाच्या घटनेत योग्य ते बदल करावेत यासाठी गेल्या आठवड्यापासून थायलंडच्या  राजधनीत अर्थात बँकाँकमध्ये तरुणाई आंदोलन करत रस्त्यावर उतरली आहे . आंदोलनकर्त्यांचा मते सध्याचे राजे वर्षभरातील बराच काळ देशाबाहेर युरोपात घालवतात. त्यामुळे देशातील महत्त्वाच्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष होते. या आंदोलनाला हाँंगकाँनमधील तरुणाईचा देखील पाठिंबा असल्याचे वृत्त व्हिआँन न्युज या वृत्तवाहिनीने दिले आहे .

      पाकिस्तानमध्ये सध्या विरोधी पक्षांनी एकत्र येत सर्व विरोधी पक्षांची एक  आघाडी तयार केली आहे . या आघाडीमार्फत देशभरात विविध ठिकाणी आंदोलने केली जात आहेत .सत्ताधिकारी पक्षातर्फे सध्याचा सरकारने विरोधी पक्षांच्या भष्ट्राचाराविरुद्ध कडक कारवाई केल्याने त्या़नी आंदोलनाची तयारी केल्याचे जाहिर करण्यात आले असून , सध्याचे केंद्रीय सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरल्याने आंदोलन करत असल्याचे विरोधी पक्षांचे म्हणणे आहे. नुकतेच त्यांचा तर्फे पाकिस्तानची  आर्थिक राजधानी जी त्यांची 1961 पर्यत राजधानी देखील होती, अस्या पाकिस्तानातील सर्वात मोठ्या शहरात अर्थात कराचीत आंदोलन करण्यात आले .या आदोंलनाच्या वेळी या आंदोलनातील महत्तवाचे नेते पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचे जावई जे या आदोंलनाचा महिलांचा चेहरा आहे,अस्या मियावल शरीफ यांचे पती, माजी लष्करी अधिकारी सरफराज अवन   यांना अटक करण्यात आली आहे . जेव्हा जेव्हा पाकिस्तान अस्थिर झाला , तेव्हा तेव्हा त्याचा परीणाम भारतावर झाला आहे . त्यामुळे या घटनेला विशेष महत्त्व आहे .
       जगात वेळोवेळी घडणाऱ्या घटना आपणापर्यत पोहचवण्याचा माझा नेहमीच प्रयत्न असेल मात्र तूर्तास इतकेच नमस्कार  


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?