भारत जपान आणि भारत बांगलादेश मैत्रीचे नवे सेतू

   

सध्या मराठी आणि हिंदी वृत्तवाहिन्या काहीश्या नकारात्मक वाटाव्यात अस्या बातम्या सातत्याने देत असताना मन प्रसन्न व्हावे अस्या घडामोडी देखील सभोवताली घडत आहेत. मात्र त्यांना अपेक्षीत असी प्रसिद्धी न मिळाल्याने त्या सांगण्यासाठी आजचे लेखन 
                           तर मित्रांनो चीनची माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील मक्तेदारी कमी व्हावी या हेतूने भारत आणि जपानमध्ये.नुकतेच काही करार करण्यात आले .ज्यामुळे भविष्याचे तंत्रज्ञान म्हणून ओळख असणाऱ्या 5जी चे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी भारत आणि जपान एकमेकांना साह्य करणार आहेत. 5 जी  तंत्रज्ञानामुळे  सध्या अशक्य वाटणारी अनेक कामे सहजतेने होतील ज्यामध्ये घरचा टीव्ही , रेफ्रिजेटर , आदी उपकरणे लांबवरून नियंत्रित करणे आदी अनेक कामाचा समावेश करता येईल . याबाबत भारतातर्फे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि जपानच्या परराष्ट्र मंत्री  यांनी करारावर स्वाक्षरी केली .  क्याड या संघटनेच्या जपानमधे आयोजित केलेल्या अधिवेशनासाठी    भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर जपानची राजधानी टोकियोत इथे गेले असताना हा  करार झाला भारत  आणि  जपान हे सयुंक्त राष्ट्र संघातील सुरक्षा परिषदेत कायम स्वरूपी सदस्यत्व मिलण्यासाठी जी 4   गटामार्फत प्रयत्न  करत आहेच  त्याचप्रमाणे भारतात विविध विकासकामे जपानच्या सहकार्याने होत आहेत . त्यामुळे निर्माण होणारे संबंध दृढ करणारे पाऊल म्हणून या कडे बघता येईल
                      . भूगोलाच्या दोन प्रमुख  शाखांपैकी  एक असणाऱ्या मानवी भूगोलाची एक महत्तवाची उपशाखा अस्नणाऱ्या राजकीय भूगोलात एक सिद्धांत आहे ज्याला स्ट्रिंग ऑफ प्लस असे म्हणतात . या सिध्दांतामध्ये असे सांगण्यात आले आहे की ,शेजारच्या देशाच्या शेजारील देश आपला मित्र असतो , या न्यायाने बघितल्यास आपणास या मागची दूरदृष्टी समजून येते . सध्याचे जग तंत्रज्ञानाचे आहे  , हे आपणास माहिती आहे . सध्या ज्याला तंत्रज्ञान वापरता येते , तोच जगात दादा बनू शकतो , हेही आपण यावेळी लक्षात घेयला हवे 

                       

                         त्याचप्रमाणे ईशान्य भारताचा विकासात महत्त्वाची भुमिका बजावणाऱ्या बांग्लादेशच्या नौदलाबरोबर भारतीय नौदलाने सयुक्त युद्ध सरावाचा कवायती केल्या . बोनगोसागर या नावाने झालेल्या  झालेल्या या सरावातर  सीमाक्षेत्र इव्हिओलूशन ., सर्फेस वॉ जहाज असते रफेस ड्रिल्स, तसेच हेलिकॉप्टर एक्शरसाईझ  या प्रकारचा युद्ध सराव करण्यात आला . बंगालचा उपसागराच्यादहा  उत्तर भागात झालेल्या या युद्ध सरावात   भारतातर्फे INS किल्डन आणि INS खुकरी  या नावाच्या  युद्ध करणाऱ्या  जहाजांनी सहभाग नोंदवला , तर   बांगलादेशातर्फे अबू बकर  आणि प्रोट्रॉय या नावाच्या  युद्ध करणाऱ्या  जहाजांनी सहभाग नोंदवला. भारतातर्फे सहभाग नोंदवलेल्या युद्ध जहाजांपैकी INSकिल्डन हे जहाज अँटी सबमरीन वॉर फेअर कॉरवेट या प्रकारातील होते (कॉरवेट  म्हणजे आकारणे अत्यंत लहान मात्र युद्द करण्यासाठीचे साहित्य असणारे परिपूर्ण असे जहाज असते . तर INS कुकरी भारताने स्वतः बांधलेली क्षेपणास्त्र डागू शकणारे कॉरवेट प्रकारचे जहाज होते . बांगलादेशाकडून सहभाग नोंदवलेल्या जहाजांपैकी अबू बकर हे जहाज फ्रिगेट प्रकारचे जहाज होते ( फ्रिगेटचा आकार कॉरवेट चा तुलनेने बऱ्यापैकी मोठा असतो . ) तर प्रोट्रॉय हे  सुद्धा कॉरवेट  प्रकारातील जहाज होते . 
              सध्या ईशान्य भारताचा विकास व्हावा आणि भारत बांग्लादेशाच्या व्यापारात वाढ व्हावी, तसेच हा  व्यापार अधिकाधीक जलमार्गाने व्हावा, या हेतूने अनेक करार करण्यात आले आहेत. तसेफ्रिगेट  भारत बांग्लादेशाचे सबंध अधिक दृढ व्हावे या हेतूने पाच नव्या रेल्वेमार्गाची (सध्या भारत आणि बांग्लादेशामध्ये 3 रेल्वेमार्ग प्रवासी आणि मालवाहतूकीसाठी वापरले जात आहेत)निर्मिती देखील सुरु आहे . तसेच भारताने बांग्लादेशाला WDM 3D या प्रकारची 10 रेल्वेइंजिने अत्यंत स्वस्तात दिली होती .त्या पार्श्वभुमीवर याकडे बघायला हवे  
       सध्या भारत जगत एक महत्वाची ताकद म्हणून उदयास येत आहे . वरील दोन्ही बाबी याच गोष्टीकडे निर्देश करतात . भविष्यात अश्या सारख्या अनेक गोष्टीत भारत सहभागी होणार हे निश्चित . माझा या गोष्टी आपणापर्यंत पोहोचवण्याचा नेहमीच प्रयत्न असेल . मात्र तूर्तास इतकेच , नमस्कार 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?