चीनच्या अप्रकाशीत 2 बातम्या


भारताने संयुक्त राष्टसंघात मागणी केल्यामुळे ज्या देशाला संयुक्त राष्ट्रसंघाचे सदस्यत्व मिळाले. मात्र त्या देशाने या उपकाराची परतफेड भारताचा पाठीत खंजीर केली. अर्थात चीन (अधिकृत नाव पिपल्स रिपब्लिक आँफ चायना )च्या संदर्भात दोन बातम्या नुकत्याच मी  बिबिसी या वृत्तवाहिनीवर बघीतल्या. आपल्या भारतातील मुख्य धारेच्या प्रसार माध्यमांनी याकडे दुर्लक्ष केल्याने समर्थांच्या "जे जे आपणासी ठाव, ते सकलांंसी सागावे, शहाणे करुन सोडावे सकल जना", या उक्तीनूसार याबाबत माहिती देण्यासाठी आजचे लेखन .
तर मित्रांनो, आपल्या झिनझीयांग आणि तिबेट या राज्यातील जनतेवर प्रचंड अत्याचार करणाऱ्या, ज्या देशाचा लोकशाही विचाराचे आंदोलने अत्यंत क्रुरपणे दडपण्याचा इतिहास आहे, अस्या चीन आणि ज्या देशातील सध्या अस्तिवात असणाऱ्या 4 पैकी 2 प्रांतात  उघडपणे केंद्र सरकारविरोधी भुमिका आहे. ज्या देशातील एका प्रांताने केंद्र सरकारमार्फत केलेल्या अत्याचाराला कंटाळून स्वतःचा वेगळा देश तयार केला, अस्या पाकिस्तानाला नुकतेच  सयुंक्त राष्ट्र संघाच्या जगभरातील  व्यक्तींचे मानवी हक्क कायम राहवेत, यासाठी कार्यरत असणाऱ्या कार्यक्रमात  सदस्य म्हणून निवडण्यात आले आहे. जे देश आपल्या देशातील नागरीकांचे मानवी हक्क नाकरण्यासाठी कुप्रसिद्ध आहेत, ते देश जगातील इतर लोकांचे मानवी हक्क अबाधीत रहावेत म्हणून काम करणार आहेत. आहे की नाही गंमत 
एका बाजूला चीन पाकिस्तान ही भारत विरोधी आघाडी मानवी हक्कासाठी भांडणार असताना बांगलादेश नंतर  श्रीलंका भारताच्या चीनविरोधी आघाडीत समाविष्ट झाला आहे. श्रीलंका त्यांचे कोलंबो बंदरातील एक भाग भारताच्या मदतीने विकसीत करणार आहे.  श्रीलंकेने  हम्मनटोटा बंदराच्या विकासात चीनकडून प्रचंड प्रमाणात मार खाल्याने श्रीलंका भारताच्या बाजूने आला. बांगलादेशाची चीन विरोधी आणि भारताच्या बाजूची भुमिका या बाबत मी या आधीच सांगितले आहे. जिज्ञासू या बाबत माझी भारताचे शेजारी या टँगखाली असणारी बांगलादेशाबाबतची पोस्ट बघू शकतात. 

ही एक बातमी झाली  आता बघूया दुसरी बातमी.
दुसरी बातमी चीन  दुरसंचार क्षेत्रातील तंत्रज्ञानानाबाबत करत असणाऱ्या प्रयोगाबाबत आहे. चीनने नुकतीच अंतराळात 6जी तंत्रज्ञान वापरण्याबाबत उपग्रह सोडला आहे. भारतात आता आता 4जी तंत्रज्ञान वापरले जात आहे. त्याचा पुढची पायरी म्हणजे 5जी आहे, आणि या 5जीच्या पुढची पायरी म्हणजे 6जी आहे. त्यातला त्यात भारतासाठी समाधानाची बाब म्हणजे भारताचा मित्र असणारा जपान देश 6जी तंत्रज्ञानाच्या संशोधनाबाबत बराच पुढे आहे. जपान बरोबर आपले मित्रत्वाचे सबंध असले कारणाने आपणास जपानकडून हे तंत्रज्ञान मिळू शकते.
सध्या भारताच्या शेजारील देशात अनेक  वेगवान घडामोडी घडत आहे. त्या वेळोवेळी आपणापर्यत पोहचवण्याचा माझा प्रयत्न असेल, तुर्तास इतकेच ,नमस्कार.
 





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?