भारतीय रेल्वे झपाट्याने कात टाकणारी रेल्वे


आपल्या अजस्त्र असणाऱ्या भारतीय रेल्वेत सध्या अनेक बदल होत आहेत. हे आपण जाणतातच त्यातील काही बदल सकारात्मक  स्वरुपाचे आहेत . तर काहींना काहीसी नकारात्मक छटा आहे. हेही आपणास ज्ञात असेलच . याच सकारात्मक आणि नकारात्मक बदलाच्या खेळात दोन महत्तपुर्ण बदल भारतीय रेल्वेत नुकतेच झाले. अन्य बातम्यांमध्ये मुख्य धारेतील माध्यमे गुंतून गेली असल्यामुळे त्याकडे काहीसे दुर्लक्ष झाले. मात्र हे बदल सगळ्यांना माहिती असणे आवश्यक असल्याने ते सांगण्यासाठी आजचे लेखन सर्व प्रथम नकारात्मक छटा असणारे लेखन बघूया .
तर मित्रांनो, भारतीय रेल्वेच्या 16 उपकंपन्या आहेत. (या उप कंपन्याची माहिती या आधी 2ब्लाँग पोस्टद्वारे शेअर केली आहेच. ज्यांना ती परत वाचायची त्यांचासाठी या लेखाच्या खाली त्याचा लिंक परत देत आहे.) त्यातील एक महत्त्वाची उपकंपनी म्हणजे रेल्वे विकास निगम लिमिटेड होय. RVNL  ही  उपकंपनी रेल्वे संरचनेची क्षमता तयार करणे आणि वाढविणे. बहुपक्षीय / द्विपक्षीय निधी संस्थांच्या माध्यमातून आणि प्रकल्पांच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी घरगुती मार्केटद्वारे संसाधने एकत्रित करणे, यासाठी 2003 साली स्थापन करण्यात आली .  हा मजकूर लिहीत असणेपर्यत या उपकंपनीत केंद्र सरकारचे 100% भांडवल होते. मात्र रेल्वेसाठी भांडवल उभारण्याचे कारण देत या उपकंपनीतील 15%भांडवल सर्वसामान्य लोकांतर्फे उभारण्याचे सरकारने ठरवले आहे. आता या उपकंपनीत केंद्र सरकारचे 85% भांडवल असेल. यापुर्वी रेल्वेच्या IRCTC या उपकंपनीत सुद्धा पहिल्यांदा केंद्र सरकारने आपला 15% वाटा विकला, कालांतराने अजून 15%  भाग भांडवल विकले.आता IRCTCत केंद्र सरकारचे 70% भांडवल आहे. केंद्र सरकारचे आतापर्यतचे धोरण बघता RVNLसुद्धा त्याच मार्गाने जावू शकते. एक प्रकारे हे मागच्या दाराने रेल्वेचे खासगीकरण म्हणता येवू शकते .


                                          आता बोलूया सकारात्मक बातमीविषयी . तर नैऋत्य(साउथ वेस्ट रेल्वे) रेल्वेच्या अंतर्गत येणाऱ्या हुबळी जंक्शन (कर्नाटक उच्चार हुबळू जंक्शन) या रेल्वे स्टेशनवर 1505 मीटर लांबीचा प्लँटफाँम उभारण्याचे ठरवले आहे . जानेवारी2021पर्यत हे काम पुर्ण होईल. हे काम जानेवारी 2020रोजी सुरु झाले. मुळ नियोजनानुसार हे काम जून 2020 पर्यत पुर्ण होणे अपेक्षीत होते. मात्र करोनामुळे काम रखडले हे काम पुर्ण झाल्यावर जगातील सर्वाधीक लांबीच्या रेल्वे प्लँटफाँम म्हणून याची नोंद होईल. सध्या जगातील लांबीच्या दृष्टीने पहिल्या 3 क्रमांकाचे रेल्वे प्लँटफाँम भारतातच आहेत.ते आहेत उत्तरप्रदेशच्या गोरखपूरचा 1336 मीटरचा प्लँटफाँम, 1180 मीटरचा केरळच्या कोलमचा प्लँटफाँम, आणि पश्चिम बंगालचा खडगपूर येथील 1072 मीटरचा प्लँटफाँम .
हुबळी येथील याप्लँटफाँमची निर्मिती आणि या निमित्ताने करण्यात येणाऱ्या सिग्नल आदी सुधारणा, तसेच स्टेशन बिल्डींगचे नुतनीकरण, नविन प्रवेशद्वार आदींसाठी 90 कोटी रुपयाचा खर्च अपेक्षीत आहे.
एकाच प्लँटफाँमवरुन दोन विरुद्ध दिशेला जाणाऱ्या प्रवासी गाड्या सोडणे. मालधक्का असला तरी आपतकालीन परिस्थितीत प्लँटफाँम वरुन मालाची चढ उतार करणे यासाठी या प्रकारच्या प्लँटफाँम चा वापर होतो.
भारतीय रेल्वे वेगाने बदलत आहे. इतर सार्वजनिक खात्यापेक्षा रेल्वेत प्रचंड वेगाने बदलत आहे. हे बदल वेळोवेळी सांगण्याचा माझा प्रयत्न असेलच, तूर्तास इतकेच, नमस्कार.
पहिल्या भागाची लिंक 

दुसऱ्या भागाची लिंक 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?