अवयवदान श्रेष्ठ दान

                 

  सध्या आपल्या भारतात मृत्युमुखी पडणाऱ्या अनेक लोकांच्या मृत्यूचे कारण एखाद्या अवयवाचे काम करेनासे होणे हे असते. जर दुसऱ्या व्यक्तींचे ते अवयव जर ते अवयव निकामी झालेल्या व्यक्तीला मिळाले तर  आजारी व्यक्तीचे प्राण आपण वाचावू शकतो. क्राँंग्रेसचे मोठे नेते विलासराव देशमुख यांची प्राणज्योत मालवण्यासाठी देखील त्यांना योग्य वेळेत यकृत न मिळणे, हे कारण असल्याचे आपणास स्मरत असेलच. असे दुर्देवी मृत्यू टाळावे यासाठी नागरीकांमध्ये अवयव दानाबाबत जनजागृती होणे आवश्यक आहे. हीच बाब हेरुन 27 नोव्हेंबर हा दिवस आपल्या भारतात अवयव दान जागृती म्हणून साजरा करण्यात येतो.
                  ज्या व्यक्तीचा मृत्यू एखाद्या साथीच्या आजारात, अथवा एडस्, कावीळ, मधूमेह या प्रकाराच्या आजारामुळे झालेला नाही, असी व्यक्ती अवयवदानाबाबत पात्र ठरते.जर भूतकाळी करोना सारखा साथीचा आजार झालेला असून  त्यातून बरे झालेल्या व्यक्ती  त्यानंतर सहा ते नउ महिन्यानंतर मृत झाल्यास त्या व्यक्ती देखिल अवयवदानास प्राप्त ठरतात .मात्र या काळाच्या आधी व्यक्ती मृत झाल्यास अस्या व्यक्ती अवयवदानास अपात्र ठरतात .
आपल्या शरीराचे काही अवयव जिवंतपणी दान करता येतात, तर काही अवयव दान करण्यासाठी व्यक्ती मृत असणे भारतीय कायद्यान्वये आवश्यक आहे.अवयवदानासाठि ब्रेन डेड व्यक्तीसुद्धा मृत समजली जाते. 
जर आपणास आपल्या मृत्यूपश्चात आपले अवयवदानासाठी देयचे असतील तर आपणास अवयवदानाची सोय असणाऱ्या रुग्णालयात अर्ज भरुन देणे आवश्यक असते . त्या अर्जानूसार आपल्या मृत्यपश्चात आपल्या नातेवाईकांनी संबधीत रुग्णालयात कळवल्यावर व्यक्तीचे शरीर दान करता येते. मृत शरीरातील कोणता अवयव किती वेळापर्यंत वापरता येतो , याचे नियम ठरलेले आहेत. त्यामुळे अवयवदान करु इच्छिणाऱ्या व्यक्तींचा नातेवाईकांनी लवकरात लवकर संपर्क साधणे आवश्यक असते.

              आपल्याकडे दानाचे विशेष महत्त्व आहे. दान केल्याने मनुष्याचे पुण्य वाढते. या वाढलेल्या पुण्यांमुळे मनुष्याला त्याचा मृत्यूनंतर स्वर्गप्राप्ती होते .असी मान्यता आहे. सध्या जिवंत असताना ज्या अवयवाचे दान केले तो अवयव पुढच्या जन्मात निकामी होतो, ही अंधश्रद्धा आहे. मात्र आपल्या अवयवामुळे दुसऱ्या व्यक्तीचे आयुष्य सुधारते, त्याचा जीवनात आनंद पेरला जातो, हे 100 टक्के खरे आहे. 
आपल्याकडे जून्या कृष्णधवल काळातील हिंदी चित्रपटातील एक गाणे आहे, " किस्कीको मुस्कराहटों पे हो निसान, किसीका दर्द मिल शके तो लेले उधार , जिना इसिका नाम है !" तर मग दुसऱ्याचे दुःख कमी करण्यासाठी भराल ना मृत्यूपश्चात अवयवदानाचा अर्ज !
याविषयी मी आंतरराष्ट्रीय अवयव दानाचे (13 आँगस्ट) निमित्य साधत 2019 आँगस्ट 6 रोजी लिहलेला लेखाची लिंक 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?