हवामान बदल जीवघेणे ?

   

                 ब्लँक अँड व्हाइट चित्रपट असतानाच्या काळातील एक सुप्रसिद्ध गाणे आहे . "किसीका दर्द मिले तो लेले उधार, किसिकी मुस्कुराटो पर हो निगाह, जिना इसिका नाम है!" दुसऱ्यांंचा दुःखाला आपले दु्ःख मानावे, दुसऱ्याचा आनंदाला आपला आनंद मानाने, असा संदेश हे राजकपूर यांच्यावर चित्रीत हे गाणे देते. या गाण्यात सांगितलेली स्थिती आपल्या भारतीयांना अनुभवयास मिळावी असी दुर्देवी परिस्थीती फिलीपाईन्स या पँसिफिक महासागरातील बेटस्वरुपात असणाऱ्या देशावर सध्या आली आहे.
या देशाला गोनी या टायफूनने अक्षरशः भिकेला लावले आहे. तेथील रेड काँस या संघटनेच्या चेअरमन रिचर्ड गोर्डान  पत्रकार परीषदेत सांगितल्यानुसार या देशातील काही शहरात 80% घरांचे प्रचंड नुकसान झाले असून संपुर्ण देशात महापूर आलेला आहे. गोनी या टायफुनने आतापर्यतचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. पर्यटन आणि उसाच्या उत्पादनावर आधारीत त्यांची अर्थव्यवस्था या टायफूनमुळे शब्दशः  मोडकळीस आली आहे.या आधी दक्षीण कोरीया आणि जपानला विविध टायफूननी तडाखा दिल्याचे आपणास स्मरत असेलच.  आपल्या भारतात पश्चिम बंगाल या राज्याला प्रत्यक्षपणे आणि महाराष्ट्राला अप्रत्यक्षपणे  आलेल्या चक्रीवादळाने केलेले नुकसान आपण प्रत्यक्षपणे अनुभवलेच आहेच .अमेरीकेत हरीकेनने केलेले नुकसान आपण टिव्हीचा पडद्यावर बघीतले आहेच.

          मित्रांनो पुर्व आशियातील टायफून , अमेरीकेतील हरीकेन अथवा आपल्याकडील चक्रीवादळे , ही एकाच प्रकारच्या नैसर्गिक विध्वसांची प्रदेशानुसार देण्यात आलेली वेगवेगळी नावे आहेत, मुळात ही आहेत उन्हाळ्याचा काळात उत्तर आणि दक्षीण गोलार्धात उष्ण कटिबंधात होणारी आर्वत आहेत. (आर्वत  म्हणजे हवेत अचानक कमी दाबाचा प्रदेश तयार झाल्याने त्या प्रदेशाभोवतीची जास्त दाबाची हवा त्या कमी दाबाच्या प्रदेशात घुसणे .पृथ्वी सुर्याभोवती पश्चिमेकडून पुर्वेकडे फिरत असल्याने ही सभोवतालची जास्त दाबाची हवा कमी प्रदेशाच्या प्रदेशात उत्तर गोलार्धात ही हवा  घडाळ्याचा काट्याचा दिशेने फिरत आत शिरते  तर दक्षिण गोलार्धात ही हवा घडाळ्ययाचा काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरत आत शिरते.त्यास आर्वत {cyclone }म्हणतात. यामुळे मोठ्या प्रमाणााा पाउस पडतो ) विषवृत्तापासून दोन्ही गोलार्धात साडे तेवीस अंशापर्यत  उन्हाळ्यात असी स्थिती निर्माण होणे हे पुर्वीपासून होत आहे. त्यात अयोग्य असे काही नाही. मात्र गेल्या काही महिन्यांपासून त्यांची तीव्रता आणि वारंवारता अत्यंत वाढली आहे.त्यामुळे खुप मोठ्या लोकसंख्येला प्रचंड हालअपेष्टांना  सामोरे जावे लागत आहे . 
          आपला भारत अजून हवामान बदलामुळे होणाऱ्या अनिष्ठ परीणामाबाबत अजून सुपात आहे, जात्यात गेलेला नाही .मात्र जे देश आता जात्यात आहे, त्यांची अवस्था बघता आपली अवस्था अत्यंत वाईट होणार आहे, हे नक्की. आपल्याकडील शहरांमध्ये पावसाचे पाणी वाहुन नेण्यासाठीची यंत्रणा बऱ्याच ठिकाणी जूनी आहे, तसेच पावसाचे पाणी वाहून नेणाऱ्या नाल्यांची स्वच्छता यथातथाच असते. अस्यावेळी अत्यंत कमी वेळात प्रचंड पाउस पडल्यावर आपल्याकडे काय स्थिती उद्भवेल याची कल्पनाच केलेली बरी .फिलीपाईन्स, दक्षीण कोरीया, अमेरीका आदी देशात शब्दशः  ढगफुटी व्हावी इतका पाउस अत्यंत कमी वेळात झाला आहे. अजून आपल्याकडे तितकी वाईट स्थिती न झाल्याने आपणास हा वार्निंग काँल असे समजून आपण पाउले उचलली पाहिजे.

                      फिलीपाईन्स या देशाची लोकसंख्या अत्यंत कमी आहे. त्यामुळे जरी त्यांची स्थिती वाईट झाली तरी त्याचा परीणाम फारस्या लोकसंख्येवर होणार नाही, मात्र भारताची स्थिती तसी नाहीये. भारताची लोकसंख्या अतिप्रचंड असल्याने आपणास हे संकट कदापि परवडणारे नाही. तरी आपल्या धोरणकर्त्यांना आणि ते राबवणाऱ्या प्रशासनास याची जाण येवून त्यांनी आणि सर्व काही शासनावर सोडून हात धरुन बसण्यापेक्षा समाजाने स्वतःहून यासाठी पुढाकार घेण्यास ईश्वर त्यांना प्रवृत्त करो, अशी मनोकामना करत सध्यापुरते थांबतो, नमस्कार.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?