सिहांवलोकन भारतीय रेल्वे 2020 (भाग 1 )

     

 या
 
 2020   वर्षी करोना हा सगळ्यांचा आयुष्याशी निगडित प्रमुख  विषय असला तरी,  .भारतीय रेल्वेत देखील मोठ्या प्रमाणात बदल झाले . ते आपणापर्यंत पोहोचण्यासाठी आजचे लेखन . या वर्षात रेल्वे संदर्भात खूप गोष्टी घडल्याने या आढावा दोन भागात घेतला जाईल . पहिल्या भागात  जुलै ते 31 डिसेंबर  या दिवसाचा आढावा घेण्यात येईल नंतर आधीच्या वर्षाचा आढावा घेण्यात येईल , तर बघूया या वर्षात भारतीय रेल्वेत काय काय बदल झाले 
तर मित्रानो , आपली  भारतीय रेल्वे सध्या डायरेक्ट करंट (डिसी) ट्रँक्शन मोटरवर चालणाऱ्या रेल्वे इंजिनाचे उत्पादन करणे बंद करत आहे. त्याच मालिकेत WAP4 या इंजिनाचे उत्पादन बंद करण्यात आले भारतीय 
                          रेल्वेची   एक महत्त्वाची उपकंपनी म्हणजे रेल्वे विकास निगम लिमिटेड होय. RVNL  ही  उपकंपनी रेल्वे संरचनेची क्षमता तयार करणे आणि वाढविणे. बहुपक्षीय / द्विपक्षीय निधी संस्थांच्या माध्यमातून आणि प्रकल्पांच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी घरगुती मार्केटद्वारे संसाधने एकत्रित करणे, यासाठी 2003 साली स्थापन करण्यात आली .  सन 2020 नोव्हेंबर पर्यत   या उपकंपनीत केंद्र सरकारचे 100% भांडवल होते. मात्र रेल्वेसाठी भांडवल उभारण्याचे कारण देत या उपकंपनीतील 15%भांडवल सर्वसामान्य लोकांतर्फे उभारण्याचे सरकारने ठरवले आहे. आता या उपकंपनीत केंद्र सरकारचे 85% भांडवल असेल 
           प्रदूषण कमी व्हावे या हेतूने भारतीय रेल्वे आपल्या सर्व मार्गाचे वेगाने विद्युतीकरण करत आहे . हे आपणास माहिती आहेच . त्याच  कार्यक्रमातर्गत चालवलेल्या  उपक्रमामुळे रेल्वेचा पश्चिम मध रेल्वे हा विभाग पूर्णतः विद्यतीकरण झालेला पहिला विभाग झालेला आहे , तर उत्तर पश्चिम विभागात असणाऱ्या राजस्थानातील दिल्ली ते जयपूर आणि जयपूर ते अजमेर या दोन महत्त्वाच्या  मार्गाचे विद्युतीकरण नुकतेच पूर्ण केले आहे . त्याचबरोबर पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागांतर्गत येणाऱ्या मीटरगेजचे  रूपांतर ब्रॉडगेजमध्ये करण्यासाठी अतिरिक्त निधी मंजूर केला आहे ज्यामुळे ऊत्तर भारतातून दक्षण भारतात जाण्यासाठी जवळचा मार्ग उपलब्ध होणार हाये . ज्यामुळे सुमारे 180 किमी वाचतील .

              नव्यानेच मॅनेजिंग डायरेक्टर नियुक्त झालेल्यारवींद कुमार जैन या   यांनी  पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले की , चालू आर्थिक वर्षाचा अखेर पर्यंत म्हणजेच 31 मार्च 2021 पर्यंत सध्या ळक्म सुरु असणाऱ्या वेस्टन  डेडीकडेड फ्रेड कॉरिडोर  आणि इस्टन डेडीकडेड फ्रेड कॉरिडोर यांच्यातील  40% भाग मालवाहतुकीसाठी सुरु करण्यात आली आहे . ज्यामुळे कानपुर दिल्ली या भागातून गुजरातच्या बंदरावर सहजतेने जात येऊ शकते . पूर्वी ज्या प्रवाश्याला 40 तास लागायचे त्यासाठी आता फक्त 14 ते 16 तास लागतील 
             कपूरथाला येथील रेल्वे कोच फँक्टरीमध्ये रेल्वेच्या रिसर्च डेव्हलपमेंट अँड स्टँडडायझेशन  आँरगानयेसन (RDSO या नावाने विख्यात)या विभागामार्फत  आधूनिक प्रकारचे कुशन्स असणाऱ्या LHB प्रकारातील डब्बल डेकर प्रवासी डब्यांची निर्मिती केल्याची बातमी समोर आली. हे डब्बे 160 किमीच्या वेगाने पळण्यास सक्षम आहेत. याद्वारे एका डब्याद्वारे प्रवासी वाहून नेण्याचा क्षमतेत दिडपटीने वाढ होईल. अनेकदा कित्येक दिवस आधी आरक्षण करुन देखील वेटींग लिस्टचा अनुभव येत असतो, त्याला यामुळे काही प्रमाणात आळा बसू शकेल.तसेच एकाचवेळी जास्त प्रवाशी वाहुन नेल्यामुळे रेल्वेच्या वाहतूक खर्चात देखील घट झाल्याने हे डब्बे रेल्वेला काही  प्रमाणात अधिकचा नफा देखील देवू शकतात .अर्थात हे डब्बे प्रवाशी आणि रेल्वे दोघांसाठी फायद्याचे ठरतील मात्र हे डब्बे प्रायोगिक तत्वावर तयार केलेले आहेत. त्यामुळे रेल्वेच्या मार्फत सुरक्षेच्या विविध चाचण्या घेतल्यानंतर हे डब्बे सामान्य जनतेसाठी उपलब्ध होतील.
             IRCTC ( Indian Railway catering and Tourist Cooperation ) या कंपनी मधील सध्याचा आपला  आतापर्यंत असणारा 87.5%  वाटा हा 75% वर आणण्याची तयारी सरकारने सुरु केली आहे , काही महिन्यापूर्वीच 100% असणारा आपला IRCTC मधील   वाटा आय पी ओ मार्फत  87.5 केला होता जो आता सेबीच्या नॅशनल स्टॉक एक्झेज यामध्ये लिस्टेड असणाऱ्या कंपन्यांमध्ये ज्यांचे  10%जास्त भागभांडवल असणाऱ्या शेअरधारकांसाठी जलद निधी उप्लब्धतेअसाठी असणाऱ्या  ऑफर फॉर सेल या तरतुदीचा आधार घेत पुन्हा 12.5% टक्याने कमी करत 75% करण्याचे ठरवले आहे 

                        नैऋत्य(साउथ वेस्ट रेल्वे) रेल्वेच्या अंतर्गत येणाऱ्या हुबळी जंक्शन (कर्नाटक उच्चार हुबळू जंक्शन) या रेल्वे स्टेशनवर 1505 मीटर लांबीचा प्लँटफाँम उभारण्याचे ठरवले आहे . जानेवारी2021पर्यत हे काम पुर्ण होईल. हे काम जानेवारी 2020रोजी सुरु झाले. मुळ नियोजनानुसार हे काम जून 2020 पर्यत पुर्ण होणे अपेक्षीत होते. मात्र करोनामुळे काम रखडले हे काम पुर्ण झाल्यावर जगातील सर्वाधीक लांबीच्या रेल्वे प्लँटफाँम म्हणून याची नोंद होईल. सध्या जगातील लांबीच्या दृष्टीने पहिल्या 3 क्रमांकाचे रेल्वे प्लँटफाँम भारतातच आहेत.ते आहेत उत्तरप्रदेशच्या गोरखपूरचा 1336 मीटरचा प्लँटफाँम, 1180 मीटरचा केरळच्या कोलमचा प्लँटफाँम, आणि पश्चिम बंगालचा खडगपूर येथील 1072 मीटरचा प्लँटफाँम .
               आपल्या प्रवासात आपली तहानभूक मिटवणारा रेल्वेडब्बा म्हणजे पँट्री कार बंद करणार असल्याचे संकेत रेल्वेने दिले आहेत. भारतीय रेल्वेच्या तिन्ही कोच फँक्टरीमध्ये (इंट्रीग्रेड कोच फँक्टरी चेन्नई, रेल कोच फँक्टरी रायबरेली, आणि रेल कोच फँक्टरी कपूरथाळा या तिन ठिकाणी भारतीय रेल्वेच्या प्रवाशी डब्याची निर्मिती होते)   या प्रकारचे डब्बे बऱ्याचा काळापासून बनत नसल्याचे दिसून आल्याने ही बाब उघडकीस आली. सध्या प्रवाशी सहजतेने आँनलाईन पद्धतीचा अवलंब करत प्रवाश्यात अन्न मागावू शकतो, आणि या प्रकारच्या डब्यांमार्फत पुरवण्यात येणाऱ्या अन्नांचा दर्जाबाबत अनेक तक्रारी रेल्वेकडे सातत्याने येत असतात. ही सेवा खासगी कत्रांटादरांकडून पुरवण्यात येत असते. यामध्ये रेल्वेची काहीही भुमिका नसते. मात्र रेल्वे नाहक बदनाम होते, ही कारणे यासाठी रेल्वेकडून देण्यात आली आहेत. या ठिकाणी अधिकचा स्लिपर दर्जाचा डब्बा बसवून प्रवाश्यांना अधिक सेवा देता येवू शकते, असेही रेल्वेकडून सांगण्यात आले आहे.
                राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या सर्व सरकारी खर्चाचे लेखापरीक्षण (Audit ) करणाऱ्या  CAG या  आपल्या संविधानात नमूद केलेल्या संस्थेमार्फत आर्थिक वर्ष 2018-2019 साठी लेखापरीक्षण करताना रेल्वेबाबत अत्यंत प्रतिकूल अहवाल तयार करण्यात आला आहे . हा अहवाल दिनांक 2020 सप्टेंबर 23 रोजी संसदेसमोर मांडण्यात आला आहे . 

             या अहवालात काय आहे ? हे समजण्यासाठी आपणास एक  बाब माहिती असणे आवश्यक आहे . ती म्हणजे ऑपरेशन रेशो . एखाद्या संस्थेला 100 रुपये मिळवण्यासाठी किती रुपये खर्च करावे लागतात म्हणजेत्या संस्थेचा ऑपरेशन रेशो  जर 85 रुपये खर्च करावे लागले तर त्या संस्थेचा ऑपरेशन रेशो .85 , जर दुसऱ्या संस्थेला 90 रुपये खर्च करावे लागले तर संबंधित संस्थेचा ऑपरेशन रेशो  90 . जर एखाद्या संस्थेचा ऑपरेशन रेशो  100 पेक्षा जास्त असेल तर ती संस्था तोट्यात असते. सर्वसाधारण खासगी संस्थेचा  ऑपरेशन रेशो 60 ते 65 आणि सार्वजनिक उद्योगांचा ऑपरेशन रेशो जास्तीत जास्त 90 ते 92 असावा असा संकेत आहे  रेल्वे मार खाते ती इथेच . आर्थिक वर्ष 2018-19 साठी रेल्वेचे उद्दिष्ट होते ऑपरेशन रेशो 92.8  ठेवण्याचे . मात्र रेल्वे ते उद्दिष्ट साध्य करण्यात अपयशी ठरली . रेल्वेचा त्या आर्थिक वर्षात  प्रत्यक्षत ऑपरेशन रेशो झाला 97.29.   तो देखील प्रत्यक्ष त्या आर्थिक वर्षात न मिळालेल्या , मात्र भविष्यात मिळणाऱ्या NTPC आणि CONCOR या सरकारी कंपन्यांकडून मिळणाऱ्या  रक्कमेच्या मिळालेल्या रक्कमेत समावेश करून जर रेल्वेच्या मिळकतीतून या रक्कमा बाजूला काढल्या तर रेल्वेचा ऑपरेशन रेशो 100 च्या वरती जातो . 

              देशातील मालवाहतुकीची अधिक वेगाने विनाअडथळा वाहतूक व्हावी या हेतूने उभारण्यात येणाऱ्या डेडिक्रेडीटेड फ्रेड कॉरिडार च्या नव्या मार्गासाठी करावयाची कार्ये रेल्वेकडून सुरु करण्यात आली आहेत . त्या अंतर्गत विजयवाडा ते इटारशी(975किमी ), विजयवाडा ते खडकपूर (1115किमी  ) आणि भुसावळ ते कोलकत्ता (1673 किमी )रेल्वेमार्ग बांधण्यात येणार आहेत . हे तिन्ही रेल्वेमार्ग मिळून 4000 किमी असणार आहे ज्यामुळे खनिज संपत्तीने समृद्ध मात्र औद्योगिकदृष्ट्या शा ओडिशा या राज्याच्या देशातील औद्योगिक दृष्ट्या प्रगत असणाऱ्या भागाशी जोडला जाईल 

           आपली विविध रेल्वेस्थानके प्रवाश्यांच्या गर्दीने सतत ओसंडून वाहत असतात मात्र ती प्रवाश्याना आवश्यक ती सोयीसुविधा देण्यामध्ये जागतिक दर्जाचा विचार करता खूपच मागे आहेत याचा विचार करून रेल्वेमार्फत 50 रेल्वेस्थानकाचा विमानतळाच्या धर्तीवर विकास करण्याचे ठरवले आहे . त्याच्याच एक भाग म्हणून काही दिवसापूर्वी 5 स्थानकाची नवे रेल्वेने जाहीर केली असल्याचे आपणास माहिती असेलच . त्याचाच एक भाग म्हणून पूर्व मध्य रेल्वेच्या अंतर्गत येणाऱ्या बिहारमधील 5 स्थानकाची नावे  रेल्वेने  दोन तीन दिवसापूर्वी केली आहे .ज्यामध्ये राजेंदनगर टर्मिनल, मुज्जफरनगर, गया जंक्शन, बेगुसऱ्य , सिंगरोली यांच्या समावेश होतो . यासासाठी रेल्वेमार्फत स्वतंत्र प्राधिकरण स्थापन केलेले असून स्टेशनचे आधुनिकीकरण करण्यासाठी जमिनीचे अधिग्रहण करण्याचे काम सध्या सुरु आहे.  तसेच मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई चे सुशोभीकरण कसे करायचे याचा अहवाल जाहीर करण्यात आला आहे . छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई याचे नूतनीकरण करण्यासाठी रेल्वेने 1642 कोटी रुपयाची तरतूद केली आहे 
               आपल्या महाराष्ट्रातील नाग विदर्भ ( विदर्भातील नागपूर विभागीय आयुक्ता  लयच्या अंतर्गत येणाऱ्या प्रदेशाला नाग विदर्भ म्हणतात . तर अमरावती आयुक्तालयच्या अंतर्गत येणाऱ्या प्रदेशाला वऱ्हाड म्हणतात ) प्रदेशातील गोंदिया -छिनवाडा आणि नागपूर -  जबलपूर या  दोन मार्गाचे नॅरोगेजचे रूपांतरण ब्रॉडगेजमध्ये रूपांतरण करण्यासह या मार्गाचे विद्यतीकरण पूर्ण करण्यात आले आहे .
           एका बाजूला देशाच्या मध्य भागात हे बदल घडत असताना देशाचा दक्षिण भागात देखील खूप सकारत्मक बदल घडत आहे . दक्षिण रेल्वेच्या पल्लकड या डिव्हिजनमधील टोकुर ते सोन्नुर या दोन रेल्वेस्टेशन दरम्यान रेल्वेच्या  कंटनेर वाहतुकीसाठी  वापरण्यात येणाऱ्या  वॅगनमार्फत ट्रकची  वाहतूक करण्याचा  प्रयोगाची यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे . याला रोल अँड रॉल असे म्हणताता .  ही सेवा रअँड रो या नावाने विशेष प्रसिद्ध आहे . आपल्या भारतात या आधी ही सेवा कोकण रेल्वेत विशेष प्रचलित होती .त्या ठिकाणी मिळालेल्या यशामुळे भारतीय रेल्वे या प्रकारची सेवा भारतात अन्यत्र सुरु करण्याचा विचार करत आहे . त्याचाच एक भाग म्हणून ही चाचणी घेण्यात आली ,

  . दक्षिण मध्य रेल्वेच्या  नांदेड डिव्हिजनमध्ये येणारा  अकोला ते अकोट या दोन स्टेशनदरम्यान  असणाऱ्या या  मार्गाचे काम  जुलै 2017 मध्ये  प्रत्यक्ष सुरु करण्यात आले असले तरी  जानेवारी 2017 पासून हा मार्ग बंद करण्यात आला होता . त्याचे काम आता पूर्ण करण्यात आले आहे . रेल्वेच्या तांत्रिक सुरक्षा विभागाने या मार्गावर सुरक्षा चाचणी घेतली 
        
          मध्य रेल्वेच्या पुणे डिव्हिजनतर्फे रेल्वे कर्मचाऱ्यांना प्रक्षिक्षण देणे सोईचे व्हावे यासाठी नुकतीच एका संकेत स्थळाची निर्मिती करण्यात आलेली आहे . या संकेतस्थळावर व्हिडीओ  आणि  पीडीएफच्या मार्फत रेल्वे कर्मचाऱ्यांना प्रक्षिक्षण देण्यात येणार आहे .ऑनलाईन पद्धतीने होणारे हे प्रक्षिक्षण   www. irot.in या संकेतस्थळामार्फत होणार असून भविष्याची झलक म्हणून याकडे बघता येऊ शकते आपण या खाली दिलेल्या छायाचित्रात या संकेतस्थळाचा इंटरफेस कशा आहे ? ते बघू शकता . आता दुसऱ्याने शिकवायचे दिवस गेलेले असून खासगी क्षेत्राप्रमाणे सरकारी क्षेत्रातही बदलत्या काळातील तंत्रज्ञानाशी स्वतःलाच  जुळवून घ्यावे लागणार असल्याचे या संकेत स्थळावरून स्पष्ट होत आहे . 
      आपल्या भारतीयांची मन असलेल्या ट्रेन 18 अर्थात वंदे भारत एक्स्प्रेसच्या धावण्याचा मार्गात वाढ करण्याची घोषणा रेल्वे मंत्रायलायकडून करण्यात आली आहे सध्या वंदे भारत रेल्वे  2  मार्गावर धावते त्यामध्ये अजून 44 मार्गाची भर भारतीय रेल्वेमार्फत करण्यात येणार आहे . मध्यंतरी या विशेष प्रकारच्या रेल्वेच्या निर्मिती संदर्भात कंपन्यांना कामे देतात हितसंबधाचा विचार करण्यात आल्याचा  संशय बळकावला होता परिणामी या प्रकारच्या रेल्वेची निर्मिती प्रक्रिया थांबवण्यात आली होती . मात्र  आता हे ढग दूर झाले असून . पूर्वी फक्त चेन्नईच्या इंट्रीग्रेट कोच फॅक्टरी (ICF) येथे निर्माण होणारी ही रेल्वे आता रेल्वे कोच फॅक्टरी रायबरेली आणि रेल्वे कोच फॅक्टरी कपूरथला येथेही होणार आहे . तसेच या आधी या प्रकारच्या रेल्वेत पूर्वी  वापरण्यात आलेली सुमारे 20% भाग विदेशी बनावटीची होती .जे प्रमाण आता फक्त 5%असणार आहे . जे आपल्या भारतीयांसाठी अभिमानाचे ठरणार आहे . 
प्रवास करताना कमीत कमी मानवी संपर्क यावा या हेतूने रेल्वे आणि स्टेट बँक आँफ इंडिया या दोघांच्या सहकार्याने एक योजना सुरु करण्यात आलेली आहे, ज्या अंतर्गत स्टेट बँक आँफ इंडिया या बँकेचे रुपे कार्ड जर आरक्षणादरम्यान व्यवहार करताना वापरल्यास प्रवाशी भाड्यात 10% सुट देण्यात येणार आहे, आणि यावर आँनलाईन व्यवहारावर आकरण्यात येणारे 1% शुल्क देखील आकरण्यात येणार नाहीये. तसेच हे कार्ड वापरुन रेल्वे आरक्षण करणाऱ्या व्यक्तींना रेल्वेचा देशभरात असणाऱ्या सुटमधील सोइसुविधा तीन महिन्यातून एकदा या पद्धतीने सवलतीच्या दरात वापरता येणार आहे, तसेच रेल्वे स्टेशन परीसरात असणाऱ्या काही दुकानातून स्वस्तात खरेदी करता येणार आहे . हा मजकुर लिहीत असताना ही सोय जरी फक्त स्टेट बँक आँफ इंडियाचा ग्राहकांसाठी असली तरी भविष्यात यामध्ये अन्य बँकांंचा समावेश करता येवू शकतो,असो .

     पश्चिम मध्य रेल्वेच्या अजमेर डिव्हिजनतर्फे  आपल्या ड्युटीचा आठ ते दहा तासाच्या कालावधीत पाठीवर अवजड सामान रेल्वेमार्गातील सर्व अडथळ्यांवर मात करत पायी वाहून सुमारे 20किमी चा रेल्वेमार्ग सुरक्षीत आहे का ? याची चाचपणी करणाऱ्या गँगमनचे कार्य काहीसे सोपे व्हावे याहेतूने एका वाहनाची निर्मिती करण्यात आली आहे . सध्या या वाहनाला रेल्वेच्या सुरक्षा विभागाची मान्यता नसल्याने ते वापरता येत नाहीये , असो 
           ब्रिटीशांच्या काळापासून रेल्वेत असणाऱ्या डाक मेसेंजर  या पदाला रद्द करण्याची प्रक्रीया रेल्वेने सुरू केली आहे .सध्याच्या तंत्रज्ञानाचा काळात या पदाची आवश्यकता नसल्याचे कारण यासाठी देण्यात येत आहे
                रेल्वेच्या जबलपूर मंडला मार्फत इलेट्रीक आणि बॅटरी या दोन्ही ऊर्जासंसाधनावर कार्यरत राहू शकणाऱ्या रेल्वे इंजिनची निर्मिती ही होती तर  दुसरी बाब म्हणजे  रेल्वे प्रशासनाकडून रेल्वेच्या देशभरातील सर्व मंडलांना येत्या दोन वर्षात  त्यांचा मंडलातील  डिझेल इंजिनांना कार्यरत राहण्यासाठी किती खर्च येवू  शकतो, याचा आढावा एका महिन्यात सादर  करण्याचा दिलेला आदेश होय . ज्या माहितीमुळे रेल्वेतून डिझेल इंजिन बंद करण्यासाठी कारवायांच्या उपाययोजनेला गती मिळू शकते
           मित्रानो येत्या काही वर्षात रेल्वेचे पूर्णतः  विद्यतीकरण करण्याचे,  जगातील कोणत्याही देशातील रेल्वेने या आधी पूर्ण न केलेले  उद्दिष्ट येत्या काही वर्षात पूर्ण करण्याचे आपल्या भारतीय  रेल्वेचे उद्दिष्ट आहे . त्यासाठी महत्त्वाचे पाऊल म्हणून याकडे बघायला हवे . तुम्हाला प्रश्न पडू शकतो रेल्वेचे सर्वत्र विद्यतीकरण होत असताना बॅटरीवर चालणाऱ्या रेल्वे इंजिनाची निर्मिती करण्याची गरजच काय ? तर माझे तुम्हाला  सांगायचे आहे की, .रेल्वेच्या डब्याची दुरुस्ती आणि देखभाल ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणी डब्यांच्या छतावर बसवलेल्या उपकरणाची देखील दुरुस्ती होत असते . अशा वेळी रेल्वे इंजिनाला विद्युत पुरवठा करणाऱ्या तारा या धोकादायक ठरू शकतात .;  त्यामुळे या ठिकाणी डिझेल इंजिनचाच वापर करावा लागतो डिझेल इंजिनामुळे होणाऱ्या हवेच्या प्रदूषणामुळे रेल्वे त्यांचा वापर थांबवण्यासाठी विविध उपाय योजना करत आहे . त्याच संदर्भांत या दोन्ही गोष्टींकडे बघायला हवे .

               1जूलै 2020 रोजी भारतीय रेल्वेने एक परीपत्रक प्रसिद्ध केले .  या परीपत्रकाद्वारे भारतीय रेल्वेचे खासगीकरणाचा दृष्टीने पाउल पुढे गेल्याचे स्पष्ट दिसत आहे .या परीपत्रकाद्वारे रेल्वेने 109 रेल्वेस्थानकादरम्यान खासगी रेल्वे चालवण्यासाठी खासगी रेल्वे चालकांना त्यांची तयारी सिद्व करण्याचे आदेश दिले आहेत . या 109रेल्वे स्थानकांची 12 विभागात विभागणी केली आहे . या रेल्वे चालवतांना रेल्वेचेच कर्मचारी वापरण्यात येणार असल्याचे, आणि यामुळे भारतीय रेल्वे प्रगतशील होण्यात हातभार लागणार असल्याचे रेल्वेचा प्रसिद्धीपत्रकात नमुद करण्यात आले
आतापर्यंत आपण 1जुलै ते 31 डिसेंबर मधील रेल्वेतील बदलाचा धावता आढावा घेतला . पुढील भागात 1 जानेवारी ते 30 जुनपर्यंतचा आढावा घेईल तो पर्यंत नमस्कार  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?