सिहांवलोकन भारतीय रेल्वे 2020 (भाग2 )

 .       


   
या 
 2020   वर्षी करोना हा सगळ्यांचा आयुष्याशी निगडित प्रमुख  विषय असला तरी,  .भारतीय रेल्वेत देखील मोठ्या प्रमाणात बदल झाले . ते आपणापर्यंत पोहोचवणाऱ्या लेखमालेतील हा दुसरा भाग, आजच्या लेखात 1जानेवारी ते 30 जून या दरम्यान मध्ये घडणाऱ्या गोष्टीबाबत सांगेल .1 जुलै ते 31 डिसेंबर या कालावधीत घडलेल्या घडामोडी या आधीच्या लेखात सांगितल्या आहेत . ज्यांना त्या वाचायच्या असतील त्यांच्यासाठी या लेखाची लिंक या लेखाचा खाली देण्यात आली आहे . तर मित्रानो बघूया जानेवारी ते जून या कालावधीतील रेल्वेच्या घडामोडी  

       पुर्व विभागातील मेल, एक्सप्रेस ,  आरामदायी म्हणता येतील अस्या प्रकारच्या गाड्यांसह एकुण 34 गाड्या कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे .या गाड्यांना अधिक थांबे असल्याने रेल्वेचा अन्य वेगवान गाड्यांचा वेगावर अनुचित परीणाम होण्यासह, काही गाड्यांना अपेक्षीत प्रवाशी भारमान मिळत नसल्याचे कारण त्यासाठी रेल्वेने दिले आहे . सर्व भारतात लागू होणारा निर्णय यापेक्षा भयानक आहे . 200किमी पेक्षा अधिक प्रवास करणाऱ्या पँसेजर गाड्यांचे एक्सप्रेस गाड्यांमध्ये रूपांतर करून छूपी भाडेवाढ लागू करणे , आणि काही स्थानकावरील प्रवाशी गाड्यांचे थांबे कमी करणे ,हा तो रेल्वेचा प्रवाशी विरोधी निर्णय आहे रेल्वेचे कमी उत्पन देणाऱ्या स्थानकावरील तिकीटघरे रेल्वेने बंद करुन तेथील कर्मचाऱ्यांना अन्यत्र सामावून घेतले जाणार असल्याचे जाहिर केले होते .या बंद केलेल्या तिकीटघरांऐवजी , कंत्रांटदाराकडून यंत्राच्या साह्याने तेथील तिकीटे वितरीत करण्याची रेल्वेची योजना होती . एका व्यापक अर्थाने रेल्वेचे मागल्या दाराने खासगीकरणाचा हा घाट होता . ज्याचे पुढील पाउल म्हणून या निर्णयाकडे बघावे लागेल .


26  एप्रिलला आतापर्यंतच्या  मालवाहतुकीसाठी सर्वात वेगवान अश्या WAG 9HH या रेल्वेइंजिनची यशस्वी चाचणी करून महिना पूर्ण होण्याचा आधीच 19एप्रिलला आपल्याला WAG 12B या तस्यांचं वेगवान इंजिनाची काही अपयशी चाचण्यांनंतर यशस्वी चाचणी केल्याची शुभवार्ता रेल्वेकडून देण्यात आल्याने  करोनामुळे  भारतात सध्या सुरु असलेल्या लॉकडाउनचा  काहीही परिणाम न   झाल्याचे स्पष्ट होत आहे

 एका   फ्रेंच  कंपनीच्या  मदतीने तयार करण्यात आलेल्या या इंजिनात रेल्वे डायव्हरसाठी स्वच्छता गृहाची सोय करण्यात आलेली आहे , जी अन्य भारतीय  रेल्वे इंजिनात नसते .  या रेल्वे इंजिनामुळे सुमारे 7000 टनमाल  100किमी प्रति तास या वेगाने एका ठिकाणाहून नेता येणार आहे . 12000 अश्वशक्तीच्या या रेल्वे इंजिनात प्रत्येकी 6000 अश्वशाक्तीचे दोन इंजिने एकमेकांना जोडण्यात आलेली आहेत . जी सोयीनुसार एकावेळी  एक अथवा दोन्ही या प्रकारे वापरता येऊ  शकतील.  जरी एक इंजिन वापरले तरी दुसऱ्या इंजिनाच्या वजनामुळे टॉर्क वाढून  फायदाच  होणार आहे . आपल्या भारताच्या इतर रेल्वे इंजिनमध्ये चालकाला इंजिनच्या एका  टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे जायचे असल्यास  इंजिनाच्या बाहेर यावे लागते , या इंजिनात असे करावे लागणार नाही . रेल्वेच्या नियोजनानुसार हे इंजिन प्रामुख्याने प्रामुख्याने पूर्व बाजूच्या DFC साठी हे वापरण्यात येणार आहे . बिहार राज्यातील माधेपुरा येथे  या इंजिनाच्या निर्मिती आणि देखभालीसाठी स्वतंत्र सोय करण्यात आलेली आहे  WAG 9HHया इंजिनच्या तांत्रीक मुद्यांचा विचार करता यामध्ये प्रत्येकी 1000 हॉर्स पॉवरच्या 9 असतील . ज्या इंजिनापासून हे नवीन इंजिन तयार करण्यात आली आहे त्या WAG 9H या इंजिनापेक्षा ट्रॅक्शन मोटार ,ट्रॅक्शन कन्व्हटर , बोगी , आदी गोष्टीमध्ये बदल करण्यात आला आहे

वर्षाच्या सुरवातीला भारतात  बनारस ते नवी दिल्ली अशी एक खाजगी रेल्वे चालवली जात होती . त्यावेळेस आलेल्या बातमीनुसार  आगामी काळात अजून 20खाजगी रेल्वे चालवण्याचे सरकारचे नियोजन होते तसेच या वर्षाच्या सुरवातीला  रेल्वेत बऱ्याच मोठ्या कलावधीनंतर भाडेवाढ झाली  .यासाठी रेल्वेने आपल्या सेवांचे विविध प्रकारात विभाजन केले असून  ही भाडेवाढ प्रकारांप्रमाणे  1जानेवारी 2020पासून लागू करण्यात आली आहे . 

 नियोजनाच्या बाबतीत बोलायचे झाल्यास रेल्वेच्या कामकाजात सुसूत्रता येण्यासाठी रेल्वेच्या आठ विभागाचे एकत्रीकरण करण्याच्या संदर्भात ती बातमी होती . या आठ विभागापैकी 3 विभागात अधिकाऱ्यांची भरती केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवापरीक्षेच्या मार्फत होत असे .या परीक्षे  अंतर्गत ज्यांची   निवड इंडियन रेल्वे सर्विस या सेवेसाठी  होत असे ते हे तीन विभाग सांभाळत . आणि उरलेल्या 5 पदांसाठी स्वतंत्र परीक्षा होत असे . हि पाच पदे अभियांत्रिकी होती . आता या सर्व पदांसाठी  एकच परीक्षा होणार आहे 

रेल्वेमध्ये 1जुलै ते 31 डिसेंबर मध्ये झालेल्या बदलांविषयी वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लीक करा 


http://ajinkyatarte.blogspot.com/2020/12/2020-1.html

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?