सिहावलोकन २०२० हवामानशास्त्र

 सिहावलोकन २०२० हवामानशास्त्र 


न 2020 मधील सर्वात चर्चीत असणारी गोष्ट करोना असली तरी मानवाच्या अस्तित्वाला धोका वाटावा अश्या हवामानशास्त्रासी संबंधित अनेक घडामोडी घडल्या . एका मोठ्या पारीपेक्षात जगात संदर्भात या वर्षाचे हवामान क्षेत्राशी संबधित घडामोडी बघायच्या झाल्यास  आपणास पृथ्वीच्या समशीतोष्ण पट्यात आलेली विविध वादळे आणि जगभरात मोठ्या प्रमाणात लागलेले वणवे यांच्या उल्लेख करावा लागेल .तसेच भारताच्या संदर्भात बघायचे झाल्यास  पश्चिम बंगाल या ठिकाणी झालेले विनाशकारी चक्रीवादला तसेच आना चक्रीवादळ यांचा विचार करावा लागेल . तसेच काश्मीरच्या थंड प्रदेशात ऑगस्ट महिन्यात  नोंदवलेले  याचा तसेच महाराष्ट्राचा विचार करता उत्तर कोकणात आलेल्या चक्रीवादळाचा विचार करावा  लागेल  . आपणास  सविस्तर सांगण्यासाठी   हे लेखन

 .फिलीपाईन्स या पँसिफिक महासागरातील बेटस्वरुपात असणाऱ्या .या देशाला गोनी या टायफूनने अक्षरशः भिकेला लावले आहे. तेथील रेड काँस या संघटनेच्या चेअरमन रिचर्ड गोर्डान  पत्रकार परीषदेत सांगितल्यानुसार या देशातील काही शहरात 80% घरांचे प्रचंड नुकसान झाले असून संपुर्ण देशात महापूर आला 

. रशियातील जंगले जगाच्या एकुण जंगलांपैकी 20%आहेत . रशियाच्या जंगलांपैकी बहुतांश जंगल सैबिरीयात आहे .दक्षिण अमेरीकेतील अँमेझाँनचा जंगलांना  पृथ्वीचे फुफ्फुस समजण्यात येते,  दोन्ही जंगले मोठ्या प्रमाणात जळाली   . दोन्ही ध्रुवांनंतर जगातील सर्वात जास्त गोड्या पाण्याचा साठा हिमालयात आहे. जो बहुतांशी बर्फाचा स्वरुपात आहे .जो  या वणव्याने झपाट्याने नष्ट झाला 


मार्वो ,लॉरा,सँली ही नावे आहेत , गेल्या सप्टेंबर महिन्याचा पहिल्या पंधरवड्यात आलेली अमेरीका देशाच्या पश्चिम किनाऱ्यावर आलेल्या चक्रीवादळांची . आँगस्ट महिन्यातील शेवटचा पंधरवाडा आणि सप्टेंबर महिन्यातील पहिल्या आठवड्यात प्रत्येक आठवड्यात एक या हिशोबाने दक्षिण कोरीया प्रदेशात आलेल्या चक्रीवादळातून मानवजात सावरत असतानाच पुन्हा एकदा मानवजातीने निसर्गावर केलेल्या अत्याचाराचा प्रतिकार म्हणून निसर्ग काय करु शकतो, याची झलक म्हणून या चक्रीवादळांकडे बघू शकतो . अमेरीकेत आलेली , मार्को, लाँरा, सँली सारखी चक्रीवादळे असो अथवा त्या आधी दक्षीण कोरीया प्रदेशात आलेली हैसेन, बावी, मायसर्क  ही चक्रीवादळे अधिक धोकादायक या श्रेणीमध्ये मोडणारी होती . मानवाने आपले सर्व मतभेद विसरुन पर्यावरणाचा प्रश्नावर एकत्र येणे आवश्यक असल्याचे सुचित करणारी ही चक्रीवादळे जरी अमेरीका आणि दक्षीण कोरीया या भारतापासून दुर असणाऱ्या प्रदेशात झाली आहेत, आपणाला काही घाबरण्याचे कारण नाही, असे याबाबत म्हणून चालणार नाही, आज आपण सुपात आणि ते जात्यात असले तरी यापुढील क्रमांक आपला आहे,  हे विसरुन चालणार नाही . आपण त्या दृष्टीने आताच तयारी करायला हवी .  

भारताच्या बिहार , आसाम, हिमाचल प्रदेश, गुजरात या राज्यांसह पाकिस्तानातील सिंध प्रांत (त्यातही कराची शहर) आणि उत्तर कोरीया , दक्षीण कोरीया, चीन, युनाटेड स्टेटस् आँफ अमेरीका आदी देशात बदलत्या हवामानाने तेथील प्रशासनाला अक्षरशः.रडकुंडीला आणले आहे. बिहार ,आसाम, हिमाचल प्रदेश , गुजरात ,सिंध आदी भागात अत्यंत कमी वेळात पडलेल्या अतिमुसळधार पावसाने प्रचंड प्रमाणात पुर आलेले आहेत . तर उत्तर कोरीया , दक्षीण कोरीया, चीन, अमेरीका आदी देशात नेहमीपेक्षा अधिक तीव्रतेच्या आलेल्या वादळाने तेथील जनजीवन विस्कळीत केले 

बीबीसी मध्ये जुलै महिन्यात दोन बातम्या दाखवल्या गेल्या त्या मध्ये सांगितल्याप्रमाणे  सन 2017 आणि 2018 या दोन वर्षात  बर्फ वितळण्याचा वेग कमी झालेला असताना सन 2019 या वर्षी हा बर्फ वितळण्याचा वेग प्रचंड वाढल्याचे एका बातमीत सांगण्यात आले आहे . तर दुसऱ्या बातमीनुसार वाढत्या तापमानवाढीमुळे शेतकऱ्यांचा शेतीचे उत्पादन करताना येणाऱ्या उत्पादन खर्चात प्रचंड वाढ होऊ शकतेगेल्या वर्षभरात ग्रीनलँडचा 552 गीगाटन इतका बर्फ वितळला आहे . ज्यामुळे संपूर्ण युनिटेड किंगडम हा देश हा देश अडीच मीटर पाण्याखाली जाऊ शकतो .सन  2012 आणि गेल्या वर्षी ग्रीनलँड या बेटावर जेट स्ट्रीम या प्रवाहाचा  अधिक दाबाचा प्रवाह आल्याने त्याचा परिणाम स्वरूप ही बर्फ वेगाने वितळण्याची घटना घडली असे शास्त्रज्ञाचे मत आहे . मित्रानो आल्प्स पर्वतावरून वाहणाऱ्या दोन जेट स्ट्रीम पैकी पश्चिम दिशेला जेट स्ट्रीममुळे ही घटना घडली होती . पूर्व दिशेला जाणाऱ्या जेट स्ट्रीममुळे भारताच्या पावसावर परिणाम होतो  हा लाक्षणिय  बदल 1948 नंतर पहिल्यांदाच अनुभवत आहोत 

 भारतीय हवामान खात्यामार्फत जाहिर करण्यात आली . जेव्हापासून हवामानाच्या नोंदी घेण्यास सुरवात झाली, त्यापासूनच्या आतापर्यतचा विचार केला असता जमू काश्मीर  या केंद्रशासित प्रदेशमधील कुपवारा  येथे आँगस्ट महिन्यातील सर्वाधिक 17 आँगस्ट2020   रोजी  तापमान नोंदवले गेले , तसेच प्रमाणे श्रीनगर येथे देखील गेल्या 39 वर्षातील सर्वाधिक तापमान  नोंदवले गेले आहे.

अमेरीका या देशातील कँलिफोर्निया या राज्यात प्रचंड असा वणवा लागला  .  तो वणवा कँलिफोर्निया या राज्यचा शेजारील नेवाडा या राज्यात देखील पसरला हे . मित्रांनो कँफिलोर्निया या राज्यातील जंगले उत्तर अमेरीका खंडातील प्रमुख जंगले आहेत,  जगातील प्रमुख जंगलात वणवे लागण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे या वणव्याच्या .काही महिन्यांपुर्वी दक्षीण अमेरीकेतील अँमेझाँनच्या जंगलामध्ये वणवा लागलेला होता, तो शांत होतोच न होतो तोच आँस्टोलिया या देशात वणवा लागला . आँस्टोलिया येथील वणव्यामधून मानव उशांत घेत असताना सबैरीया येथे वणवा लागला .तो धुमसत असतानाच आता उत्तर अमेरीका खंडात वणवा  पेटला  .पृथ्वीच्या 7खंडापैकी 4खंडातील वनसंपदा वणव्यात जळून गेली  .ज्यामध्ये दक्षीण अमेरीका, आँस्टोलिया, आशिया , उत्तर  अमेरीका या खंडाचा समावेश होतो.

   एकिकडे कँलिफोर्नियामध्ये वणवा पेटलेला असताना आफ्रिका खंडातील सागरी जैववैवधतेला मोठा धोका निर्माण झाला  आफ्रिका खंडाच्या पुर्व किनाऱ्यावर असणाऱ्या हिंदी महासागरातील माँरीशियस या भारतीयांची बहुसंख्येने असणाऱ्या बेटस्वरुपातील देशाच्या पुर्व किनाऱ्यावर हा धोका निर्माण झाला . आणि त्याला कारणीभूत ठरली आहे की, एक जपानी जहाज कंपनी . या कंपनीच्या तेलवाहतूक करणाऱ्या जहाजातून तेल सांडल्याने या देशाच्या किनाऱ्याचा प्रदेशातील जैवश्रुष्टी धोक्यात आली आहे .  भारत फ्रान्स , जपान या देशांचे नूकसान कमी करण्याचे प्रयत्न चालू आहेत . हा लेख लिहित असताना त्या जहाजाचे दोन तूकडे झाल्याने धोका अधिकच वाढला आहे . माँरीससच्या किनाऱ्यापासून समुद्रात हाकेच्या अंतरावर ही घटना घडली मुख्यतः सागरी पर्यटनावर अर्थव्यवस्था असणाऱ्या या देशाचे अक्षरशः.कंबरडे यामुळे मोडले आहे .समुद्राच्या पाण्याचा खोलीचा अंदाज न आल्याने  हे जपानी जहाज किनाऱ्याजवळचा उथळ दलदलीच्या प्रदेशात रुतले , आणि कलंडले , तेथून या प्रसंगाची सुरवात झाली .  ज्याचे परीणाम फार मोठ्या जनसमुहाला भोगावे लागत आहे 

 सैबेरियात लागलेला वणवा हा देखील या वर्षातील मोठी घटना होय . तसेच या भागात उन्हाळ्यांत नोंदवले गेलेलं तापमान हा देखील  काळजीचा विचार होता त्याचप्रमाणे ज्या भागात वर्षातील दहा महिने शुन्याचा खाली तापमान असते, तर उन्हाळ्याचा दोन महिन्यात ते तापमान सरासरी 20ते 28 सेल्सिअस  असते . त्या भागात नोंंदले गेलेले 38 सेल्सीयस तापमान ही होय .जे मानवाच्या ज्ञात इतिहासातील या भागात नोंदले गेलेले सर्वाधिक तापमान आहे.
 या वणव्याचा विस्तार ग्रीस या देशाचा एकुण क्षेत्रफळाएव्हढ्या भागात झाला .ज्या भागात हा वणवा लागलेला आहे, तो भाग वर्षातील बहुसंख्य काळ बर्फाच्छादीत असल्याने त्या भागात काही रासायनिक प्रकिया होवून त्या भागातील जमिनीत सहजतेने जळणारे सेंद्रीय पदार्थ मोठ्या प्रमाणात  साठलेले आहेत . दुर्देवाने या वणव्यामुळे तेथील झाडेच जळत नसून हे पदार्थ देखील जळत आहे.(थोडक्यात तेथील जमिन काही प्रमाणात नापिक होत आहे) परीणामी त्या भागात दाट जंगले निर्माण होण्याची शक्यता धूसर बनत आहे . 
     दिनांक 21 मे 2020रोजी पश्चिम बंगाल आणि ओडिशा या राज्यात आलेल्या आम्फाम या अतितीव्र स्वरुपाच्या चक्रीवादळाने 72 निष्पाप अभागी जणांचा मृत्यू झाला आहे . या मृत्यूने  अनेक प्रश्नांंना जन्म दिला आहे  त्यातील अनेक प्रश्न बदलत्या हवामानाशी संबंधित आहेत . .आपण जगभरातली  गेल्या काही वर्षांतील हवामानाचा एक आढावा घेतल्यास आपणास सहज लक्षात येते की , जगभरातील सर्व प्रकारचे हवामान अतितीव्र बनत चाललेले दिसते . मागील 2019पर्यतचा हवामानाचा विचार करता सन 2000पासून पुढची सर्व वर्षे मागच्या पेक्षा अधिक उष्ण होती , तसेच गेल्या काही वर्षाचा विचार करता ऊत्तर अमेरिका खंडातील अटलांटिक समुद्रातील चक्रीवादळे असो (ज्याला हरिकेन म्हणतात ) अथवा मे महिन्यात होणारी बंगालच्या उपसागरात तयार चक्रीवादळे असो अथवा या प्रकारची सर्वच चक्रीवादळे असो , त्यांची तीव्रता वाढलेलीच आपणास दिसते .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?