भारताचे शेजारी आणि 2020 सिहावलोकन

         

 सन 2020 संपायला आता मोजकेच दिवस शिल्लक आहेत. हे वर्ष प्रामुख्याने करोना संसर्गामुळे चर्चेत आलेले असले तरी भारताच्या शेजारी देशांचा विचार करता भारताचे आपल्या शेजारी असलेल्या देशांबरोबर अनेक करार झाले, काही देशांबरोबर चकमकी उडाल्या .तर काही देशात भारताच्या हित संबधांना बाधा उत्पन होईल, अश्या गोष्टी घडल्या . थोडक्यात या बाबत आढावा घेयचा असल्यास बांगलादेशबरोबर आणि म्यानमारबरोबर झालेले  करार, मालदिवने  आंतराष्ट्रीय पातळीवर घेतलेली भारताची बाजू, बांगलादेश,  अफगाणिस्तान आणि श्रीलंका या देशांना केलेली मदत , नेपाळ आणि चीन झालेल्या चकमकी आणि पाकिस्तानने पाकव्यात काश्मीरच्या भाग असणाऱ्या गिलगीट बाल्टीस्तान या भागाला स्वतंत्र्य प्रांत म्हणून दिलेली मान्यता या बाबी प्रमुख मानता येतील . आता या बाबी  विस्ताराने बघूया 
प्रथमतः बांगलादेश 
तर मित्रांनो,  इशान्य भारताशी संपर्क साधणे सोईचे व्हावे, या उद्देश्याने बांगलादेशाच्या जमिनीचा वापर करता यावा , या उद्देश्याने भारताने बांगलादेशाबरोबर विविध करार करण्यात आले. ज्याद्वारे भारताच्या कोलकत्याहून बांगलादेशातील विविध बंदराच्या मार्फत भारताच्या त्रिपुरा, मिझोराम,  मेघालय या राज्यात विविध वस्तू पाठवण्यासाठी परवानगी मिळवणे ,  तसेच बांगलादेशाबरोबर जोडणारे विविध रेल्वेमार्ग बांधण्यासाठी करार करण्यात आले .तसेच भारताकडून बांगलादेशाला डिझेलवर चालणारे ब्राँडगेज मार्गावरचे WDM 3या प्रकारचे 10 रेल्वे इंजिन देण्यात आले . भारतातून बांगलादेशाला होणाऱ्या कांदा निर्यातीबाबत काहीसे वाद यावर्षी भारत आणि बांगलादेशात झाले. भारताला त्रास होवू नये , म्हणून बांगालादेशातील चीन विकसीत करण्यासाठी अत्यंत उत्सुक असणाऱ्या बंदराचे काम बांगलादेशातर्फे भारताचा मित्र असणाऱ्या जपानला देण्यात आले
म्यानमार या देशाचा विचार करता इशान्य भारताला उर्वरीत भारताबरोबर जोडण्यासाठी म्यानमारमधून इशान्य भारतात जाणारे  रस्ते बांधण्याचा कामातील अडथळे दूर करण्यासाठी यावर्षी विशेष प्रयत्न करण्यात आले.तसेच भारतीय नौदलातर्फे म्यानमारच्या नौदलासाठी एक पाणबुडी भाडेतत्वावर देण्यात आली .
भुतान या देशाचा विचार करता भारताच्या मी मोठा दादा, या पद्धतीचा भारत भुतान सबंधात या वर्षी मोठ्या प्रमाणात बदल झाला. या वर्षी आपण दोघे सारखेच या पद्धतीने भारत भूतान सबंध विकासावर भर देण्यात आला. या 2020 वर्षी भारत भुतान यांच्यात व्यापार वाढण्यासाठी तीन नविन व्यापारी मार्ग सुरु करण्यात आले..तसेच  भुतानमध्ये नविन जलविद्यूत प्रकल्प उभारण्यासाठी करार करण्यात आले.

नेपाळ या देशाबरोबर भारताचे सबंध या वर्षी तणावाचे राहिले. भारताच्या  उत्तरांचल या राज्याबरोबर असणाऱ्या नेपाळ सीमेवर यंदा तणाव बघण्यात आला . या प्रदेशात भारताने नेपाळच्या हद्दीत अतिक्रमण केले आहे. असा आरोप नेपाळने केला. तसेच नेपाळच्या मंत्रीमंडळातील सदस्यांनी भारतीयांची मने दुखावतील , असी अनेक विधाने देखील केली. बिहार नेपाळ सीमेवर नेपाळी पोलिसांमार्फत काही  भारतीयांना ठार करण्यात आले. करोनामुळे लाँकडाउन असताना देखील ,तसेच मनाई करुन देखील भारतीय तेथून नेपाळच्या हद्दीत शिरत असताना त्यांना रोखण्याचा प्रक्रियेत त्याचा मृत्यू झाला ,असे स्पष्टीकरण नेपाळकडून याबाबत देण्यात आले. भारतीय लष्कर प्रमुख एम एम नरवणे यांनी वर्षाच्या अखेरीस नेपाळचा दौरा केला ..तसेच नेपाळच्या प्रधानमंत्र्यांनी सातत्याने भारतविरोधी विधाने करणाऱ्या उपपंतप्रधानास बिन खात्याचे मंत्री नेमले.
चीन बरोबर भारताचा सीमावाद यावर्षी जोरात उफाळून आला. लडाखच्या पुर्व भागात दोन्ही सैन्याचा चकमकी उडाल्या.भारतात चीनी सामानाविरोधात जनमत एकटवले. भारताने विविध टप्याद्वारे एकंदरीत 275 चीनी अँपवर बंदी घातली. भारताने चीनच्या प्रभावाखाली असणाऱ्या रिजनल काँपरेशन फाँर इकाँनाँमिक्स प्रोग्राम ( RCEP) मध्ये सहभागी होण्यास नकार दिला.
अफगाणिस्तान बरोबर भारताचे सबंध या वर्षी खुपच उत्तम राहिले. अफगाणिस्तानमध्ये अनेक प्रकल्पांची उभारणी करण्याबाबत भारताने अफगाणिस्तानबरोबर करार केले. ज्यामध्ये अफगाणिस्तानची राजधानी असणाऱ्या काबूल शहराची पिण्याचा पाण्याची गरज भागवण्यासाठी धरण बांधणे (याप्रकल्पाला पाकिस्तानचा विरोध आहे) या प्रमुख प्रकल्पासह अजून 84 प्रकल्पाचा समावेश आहे.

पाकिस्तान बरोबर भारताचे सबंध तणावाचे राहिले. पाकव्यात काश्मीरचा भाग असणाऱ्या गिलगीट बाल्टीस्तान या प्रदेशाला स्वतंत्र्य प्रातांचा दर्जा देणे.कर्तारपूर येथील शिख गुरुद्वाराच्या नियोजन मंडळात एकाही शीख धर्मीय बांधवांचा समावेश न करणे पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथे हिंदू मंदीराची निर्मिती प्रक्रीया थांंबवणे लाहोरला गुरुद्वारा पाडणे . आणि भारत पाकिस्तान समुद्री सीमेजवळ असणाऱ्या कराची येथे चीनला तळ उभारु देणे या बाबींवरून भारत पाकिस्तानचे सबंध ताणले गेले.
मालदिव बरोबर भारताचे सबंध मैत्रत्वाचे राहिले. पाकिस्तानने  आँरगनायझेन आँफ इस्लामिक कंट्रीझ, (OIC) मध्ये काश्मीरचा मुद्दा उपस्थित केल्यावर भारताची पाठराखण करत हा भारताचा अंतर्गत मुद्दा असल्याचे प्रतीपादन करणे .तसेच त्यांचा व्हिटरी डे च्या जाहिर कार्यक्रमात भारताचे आभार मानणे, यामुळे भारत मालदिव सबंध मित्रत्वाचे राहिले.
श्रीलंका  बरोबर भारताचे सबंध सौद्यर्ह्याचे राहिले. श्रीलंकेच्या कोलोंबा बंदराच्या पुर्व भाग भारतातर्फे विकसीत करणे आदी विकासकामे भारतातर्फे श्रीलंकेत सध्या केली जात आहे.
एकदरीत भारतासाठी हे वर्ष शेजारील देशांचा विचार करता उत्तमच गेले असे म्हणावे लागेल.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?