सिहावलोकन 2020.... भारतीय क्रीडाविश्व


या सन 2020 वर्षात प्रामुख्याने करोना हा विषय अधिक चर्चित असला, करोनामुळे अनेकांच्या आयुष्यात दुःख आलेले असले तरी भारतीय क्रीडाविश्वात अनेक आनंदाचे क्षण देखील अनुभवयास मिळाले . आणि ते देखील पूर्णतः भारतीय मातीतील खेळ असलेल्या बुद्धिबळात . (नाही म्हणायला बँडमिंटन सारखे काही खेळ पुण्यात अर्थात भारताच्या मातीत शोधले गेलेले असले तरी त्याचे शोधकर्ते हे भारतीय नव्हते , तर ब्रिटिश होते म्हणून त्यांना भारतीय खेळ म्हणणेथोडे धाडसाचे ठरेल .मात्र बुद्धिबळाचे तसे नाहीये ) आणि याची सुरवात झाली मागच्या वर्षाचे 2 दिवस शिल्लक असतातंच झाली हे विशेष

            तर मित्रानो 2019 डिसेंबर 29 रोजी मोठ्या कालावधीनंतर पुनरागमन करत भारतीय महिला बुद्धिबळ महिला बुद्धिबळ खेळाडूंच्या जलदगती या प्रकारच्या स्पर्धेत जागतिक अजिंक्यपद  मिळवले . मित्रांनो , पुरुष गटात  विश्वनाथ आंनदच्या गैरहजेरीत खेळणाऱ्या भारतीय पुरुष खेळाडूंच्या या स्पर्धेत क्रमांक लागलाय तो 40 . यावरून तुम्ही या स्पर्धेची काठिण्य पातळी काय असेल याचा अंदाज घेऊ शकता हा विजय आणखी एका कारणाने मह्त्वाचा आहे ते म्हणजे आई झाल्यावर सन 2016ते 2018 हे दोन वर्ष त्या स्पर्धात्मक बुद्धिबळापासून पूर्णतः अलिप्त होत्या


             बुद्धीबळाच्या विश्वातील मानाची समजली जाणारी नेशन कप ही स्पर्धा 5मे ते 10मे या कालावधीत पार पाडली .  फिडे अर्थात फेडरेशन इंटरनँशनल डिईचेस या बुद्धीबळ या खेळाच्याआंतरराष्ट्रीय संघटनेमार्फत आणि चेस डाँट काँम या संकेतस्थळाच्या सहकार्याने ही स्पर्धा इतिहासात पहिल्यांदाच आँनलाईन पद्धतीने पार पडली.(दरवर्षी होणारी ही स्पर्धा ईतरवेळी आँफलाईन पद्धतीने होते)मित्रांनो जरी बुद्धिबळ हा वैयक्तिक खेळ असला तरी ही स्पर्धामात्र गटाच्या माध्यमातून झाली प्रत्येक गटात मुख्य 4खेळाडु आणि दोन राखीव खेळाडू असे गटाचे स्वरुप होते .जे चार मुख्य खेळाडू खेळणार आहेत त्यामध्ये एक महिला असणे अत्यावश्यक होते .तसेच राखीव खेळाडुमध्ये सुद्धा एक महिला असणे बंधनकारक होते.या स्पर्धेत सहा संघांनी भाग घेतला होता , भारत, चीन, रशिया, युनाटेड किग्डम ,यूएसए, आणि शेष विश्व हे ते सहा संघ . दुर्देवाने भारताच्या संघाची कामगिरी या स्पर्धेत म्हणावी असी झाली नाही,असो  


                   मात्र हे अपयश दूर सारत भारताने नाशिकच्या ग्रँडमास्टर खेळाडू विदित गुजराथी यांच्या नेतृत्वाखाली खेळताना 29 ऑगस्ट रोजी बुद्धिबळ ओलऑलम्पियाड  मध्ये  रशिया बरोबर संयुक्तरित्या गोल्ड मेडल मिळवले सन 1920 पासून दुसऱ्या महायुद्धाच्या 6 वर्षातील 3 सोहळ्याचा अपवाद वगळता दर दोन वर्षाने आयोजित करण्यात येत  असणाऱ्या बुद्धिबळ ऑलम्पियाड मधील भारताची हि सर्वोत्तम कामगिरी होती या आधी या आधी सन मध्ये  2014भारताने कांस्य (ब्राँझ) पदक मिळवले.होते बुद्धिबळ ऑलम्पियाडच्या इतिहासात पहिल्यादाच ऑनलाईन पद्धतीने झालेल्या या बुद्धिबळ ऑलम्पियाड  या स्पर्धेत आंतीम पदापर्यत वाटचाल करताना भारताला अनेक अडथळांवर मात करावी लागली आहे. ज्यामध्ये अर्मेनियाच्या विरुद्ध आँनलाईन खेळताना वीजपुरवढा खंडीत होवून चार डावाच्या मालिकेत एक डाव गमावून सुद्धा , अर्मेनियाचा विरुद्ध विजयी आघाडी घेत पुढे वाटचाल सुरु ठेवण्याचा उल्लेख करावाच लागेल


 एकंदरीत भारताच्या क्रीडाविश्वाचा विचार करता हे वर्ष उत्तमच गेले असे म्हणावे लागेल

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?