सिहावलोकन 2020भूगोल

 


आता सन  2020  सरण्यास काही तास शिल्लक राहिलेल्या सन  2020  मध्ये प्रामुख्याने करून हा विषय सर्वांचा लक्षात राहिला असला तरी या वर्षात भूगोल या विषयात अंत्यंत महत्त्वाचे संशोधन प्रसिद्ध करण्यात आले .वर्षाखेर जवळ आल्याने याविषयी माहिती देण्यासाठी आजचे लेखन सन मध्ये भूगोल विषयाविषयी लागणाऱ्या शोधांचे आपण भारतावर परिणाम करणारे आणि जग्वार परिणाम करणारे अश्या दोन विभागात विभाजन करू शकतो. पहिल्यांदा भारतासावर परिणाम करणारे संशोधन बघू.भारताचा विचार करता दोन शोधांचा विचार करावाच  लागेल . त्यातील एक राजस्थानशी संबंधित आहे दुसरा लडाखशी संबंधित आहे . राजस्थानचा विचार पहिल्यांदा करूया सिंहावलोकन सध्या पाण्याचे प्रचंड दुर्भिक्ष असणाऱ्या पश्चिम राजस्थानात 1 लाख 72 हजार वर्षापुर्वी एक मोठी बारमाही पाणी असणारी नदी वहात असल्याचे स्पष्ट पुरावे भुगर्भ शास्त्रज्ञांना मिळाले आहेत. राजस्थान च्या बाडनेर , जैसलमेर या जिल्ह्यातून सदर नदी वहात होती . या नदीचा जो मार्ग भुगर्भ शास्त्रज्ञांना वाटतो, त्या मार्गापासून सुमारे सव्वादोनशे किलोमीटरवरुन सध्या नद्या वहात आहेत. ही नदी सरस्वती नदीपेक्षा वेगळी आहे, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. सरस्वती नदी 30 हजार वर्षापुर्वी सरस्वती नदी वहात होती, जी कालांतराने लुप्त झाली असे मानण्यात येते. तर नव्याने शोधलेली ही नदी 1लाख 72हजार वर्षापुर्वी वहात असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.  या नदीच्या वाहण्याचा कालावधीतच आफ्रिकेतून मानव भारतात वास्तव्यास आला होता. हा कालावधी जूने अश्मयुगाचा वेळचा आहे . भारतीय    आणि जर्मम भुगर्भ शास्त्रज्ञांनी हे संशोधन केले आहे . त्यासाठी त्यांनी "लूमिनियस डेटिंग "या पद्धतीचा वापर केला आहे. ज्यामध्ये प्रथमतः उपग्रहाद्वारे छायाचित्र घेवून नंतर सदर मार्गावरील खोलवर असणाऱ्या खडकांतील पाण्याचे अनुमान बांधत हा शोध घेण्यात आला .

 आता लडाखच्या विषयी बोलूया तर मित्रानो ,  इंडीयन प्लेट , युरेशियन प्लेटच्या खाली जात असल्याने हिमालयाची उंची आजमितीस वाढतच आहे. यादरम्यान  या प्रकियेमुळे काही फाँल्ट लाईन   निर्माण झाल्या आहेत. हिमालयात अस्या अनेक फाँल्ट लाईन    आहेत. त्यातीलच एक फाँल्ट लाईन   म्हणजे लडाखची फाँल्ट लाईन. लडाखची  फाँल्ट लाईन एका जागी जागी स्थिर आहे. आणि भुगर्गीय हालचालीचा विचार करता ती मृतवत असल्याचा आतापर्यत समज होता .मात्र  वाडीया इनस्ट्युट आँफ हिमालमयीन जिजाँलांजी या संस्थेने  नुकत्याच केलेल्या एका  संशोधनानुसार  लडाखची फाँल्ट लाईनची  लांबी उत्तरेकडे वाढत आहे. या संशोधनासाठी त्यांनी या फाँल्ट लाईनचे लेह ते सौनमुर या 213 किलोमीटरच्या पट्टयाचा अभ्यास केला या लडाखच्या फाँल्ट लाईनच्या वाढीमुळे  या भागात  सातत्याने मात्र छोटे भुकंप या क्षेत्रात येवू शकतात, अशी  भिती भुगर्भ शास्त्रज्ञांना वाटत आहे. या छोट्या भुकंपामुळे  मोठा पाउस झाला तर या क्षेत्रात दरडी कोसळणे, दगाडापासून माती पुर्णतः वेगळी होउन वाहत्या पाण्याबरोबर वहात आल्याने चिखलाचा पुर आदी समस्या निर्माण होवू शकतात . या संशोधनात नदी पात्र उंचावणे,आदी गोष्टी देखील त्यांना आढळून आल्या आहेत. भारताचा संरक्षणेच्या दृष्टीने सदर परीसर अत्यंत महत्त्वाचा आहे . या भागात सहजतेने जाता यावे म्हणून अनेक प्रकल्प सध्या सुरु आहेत, हे आपण या वेळी लक्षात घेयला हवे.

भारतानंतर आता जगाचा विचार करूया, जगाचा  विचार करता आफ्रिका या खंडाचे होणारे तुकडे आणि न्यझीलंड या देशाच्या जवळ समुद्रात बुडालेला खूपच मोठा भूभाग सापडण्याचा शोधाचा विचार करावाच लागेल पहिल्यांदा आफ्रिकेचे तुकडे होण्याचा विचार करूया 


आफ्रिका खंडाजवळ असणारी सोमालियन प्लेट ही आफ्रिकन प्लेटपासून दुर जात  इंडो आँस्टोलियन प्लेटकडे वेगाने सरकत असल्याने आफ्रिका खंडाचे दोन अथवा तीन भागात विभाजन होण्याची प्रक्रीया सुरु झाल्याची भुगर्भ शास्त्रज्ञांना खात्री पटल्याची ती बातमी होती .तसे बघायला गेले तर असे काही होत असेल याबाबत भुगर्भ शास्त्रज्ञांना सन 2016 पासून अंदाज होताच, मात्र त्याचे ठोस म्हणता येतील असे पुरावे मिळत नव्हते . जे आता मिळाले आहेत , या पुराव्यानुसार आजपासून 5ते 6कोटी वर्षानंतर पृथ्वीवर सध्या असणाऱ्या 7खंडामध्ये एका खंडाची भर पडेल .त्यावेळचे विद्यार्थी पृथ्वीवर आठ खंड असल्याचे शिकतील . आफ्रिका खंडाच्या इशान्य दिशेला असणाऱ्या  एथोपिया या देशाच्या इशान्य दिशेला असणाऱ्या इथोपिया  या प्रदेशापासून ही तूकडे पडण्याची सुरवात झाली आहे.  ज्यामुळे या प्रदेशात मोठ्या प्रमाणात भुकंप येतील 
        मित्रांनो आपल्यापैकी ज्यांचा भुगोलाशी जवळचा सबंध आला असेल, अश्या लोकांना वेगनर या भुगर्भ शास्त्रज्ञांची काँटिनेक्टल ड्रिफ्ट  थेअरी माहिती असेलच .त्या थेअरीत मांडलेल्या विचारानुसार ही प्रक्रीया होत आहे . याच थेअरीनुसार हिमालयीन प्रदेशात भविष्यात फार मोठे भुकंप येवू शकतात 
आफ्रिका खंडाजवळ असणारी सोमालियन प्लेट ही आफ्रिकन प्लेटपासून दुर जात  इंडो आँस्टोलियन प्लेटकडे वेगाने सरकत असल्याने हे बदल घडत आहेत.
         मित्रांनो, आपणास द्वारका हे शहर पाण्यात बुडाल्याचे माहिती आहेच . मात्र त्याच प्रमाणे न्युझीलंड या देशाच्या सभोवताली असणारा बराच मोठा  भुभाग समुद्रात बुडाल्याचे देखील दिसून आले आहे .आँस्ट्रोलिया खंडाच्या अर्ध्या भुभागाएव्हढा हा भाग समुद्रात बुडाला  आहे, याचे स्पष्ट  पुरावे भुगर्भ शास्त्रज्ञांना मिळाले आहेत . भुगर्भ शास्त्रज्ञांनी या भागाला झिलेंडिया असे नाव दिले आहे . या समुद्रात बुडालेल्या भागाची प्राकृतीक रचना करण्याचे गेल्या दोन अडीच वर्षापासून सुरु होते . जे नुकतेच पुर्ण झाल्यावर याची अधिकृत घोषणा सन  2020 मध्ये  करण्यात आली . एकंदरीत भूगोल प्रेमींसाठी हे वर्ष खूपच छान गेले असेच म्हणावे लागेल 
मी घेतलेला  भारतीय क्रीडाविश्वाच्या 2020 मधील आढावा वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लीक करा 




मी घेतलेला  हवामानशास्त्राचा  2020 मधील आढावा वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लीक करा




मी घेतलेला  खगोलशास्त्राचा   2020 मधील आढावा वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लीक करा




मी घेतलेला  भारताचे  शेजारील  देशांशी असणाऱ्या संबंधाचा   2020 मधील आढावा वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लीक करा




मी घेतलेला  भारतीय रेल्वेचा जानेवारी ते जून  2020 मधील आढावा वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लीक करा





मी घेतलेला  भारतीय रेल्वेचा जुलै ते डिसेंबर   2020 मधील आढावा वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लीक करा
















टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?