21 वर्षे विमान अपहरणाची

       


 प्रत्येक माणसाच्या आणि देशाच्या वाटचालीत काही कटू दुःखद प्रसंग येतच असतात . आपल्या भारताच्या वाटचालीत सुद्धा आजपासून वीस वर्षांपूर्वी असाच  कटू प्रसंग आला होता , तो होता इंडियन एअरलाईन्स या कंपनीच्या आयसी 814 या काठमांडू ते दिल्ली येथे जाणाऱ्या विमानाचे लष्कर ए तैयबा या दहशतवादी संघटनेच्या अतिरेक्यांनी केलेले अपहरण हा होय . . यामध्ये रुपेण कटियाल या प्रवासाचा बळी गेला आणि आपण आपल्या तुरुंगात असलेल्या हाफिज सय्यद या दहशतवाद्याला सोडून दिले . याच हाफिज सय्यद याने पुढे भारतीय संसदेवर हल्ल्याची योजना आखली . सुदैवाने त्या  नंतर आपल्या एकाही विमानाचे अपहरण झालेले नाही . त्या वेळेस केंद्रात माननीय अटलबिहारी यांचे सरकार होते .

              काठमांडू  येथून 24 डिसेंबर1999 ला दुपारी सव्वातीनच्या सुमारास दिल्लीसाठी उड्डाण भरलेल्या या विमानाचे अपहरण करण्यात आले होते . यातील प्रवाशी सात दिवसांनी दिल्लीत परतले . आपण बाजूच्या नकाश्यात याचा मार्ग बघू शकतात . यातील काळ्या ठिपक्याच्या स्वरूपात जो मार्ग दिसत आहे तो आहे विमानाच्या मूळ मार्ग तर लाल रेषेत दाखवलेल्या मार्गावरून विमान पप्रत्यक्षात उडाले . अमृतसर येथे विमान इंधन भरण्यासाठी थांबले असताना त्यावर कार्यवाही का करण्यात आली नाही असा आरोप यावर करण्यात येतो . अतिरेक्यांचा विचार विमान अपहरण करून लाहोर विमानतळावर नेण्याचा होता . मात्र लाहोर विमानतळ प्रशासनाने ती परवानगी नाकारल्यावर दहशतवाद्यांच्या प्रयत्न ते विमान दुबईच्या विमानतळावर उतरवण्याच्या होता . मात्र तिथेही नकार घंटा मिळाल्यावर विमान अफगाणिस्तानच्या कंदहार विमानतळावर उतरण्याच्या आले . या दरम्यान विमान अमृतसर येथे इंधन  भरत असताना काही प्रवाशांना सोडून देण्यात आले 

या दहशतवादी कृत्यात सहभागी असणाऱ्या काही जणांना नंतर पकडण्यात येऊन योग्य त्या शिक्षाही झाल्या . खलिस्तानवादी अतिरेक्यांनी तनिष्क या विमानाचे अपहरण करून कॅनडा या देशात नेऊन तिथे स्फोटकांनी संपूर्ण विमान उडवून देण्याची आठवण यामुळे त्यावेळी अनेकांना झाली होती . याविषयी खूप काही बोलता येऊ शकते मात्र तुर्तास इथेच थांबतो .नमस्कार .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?