भारतीय रेल्वेची अपरीचीत कहाणी (भाग 6)

बाँक्स वँगन ओपन 

आपल्या भारताची रेल्वे फक्त विस्तारानेच मोठी आहे, असे नव्हे तर आपल्या रेल्वेत विविधता देखील मोठ्या प्रमाणावर आहे, ही विविधता रेल्वेमार्फत चालवल्या जाणाऱ्या उपकंपन्यांमध्ये आहे, रेल्वेतर्फे चालवल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या प्रवासी गाड्यांमध्ये आहे, भारतीय रेल्वेमार्फत प्रवासी गाड्यांमध्ये वापरण्यात येणाऱ्या डब्यांमध्ये देखील आहे. तसेच ती मालवाहतूकीच्या गाड्यांमध्ये देखील आहे. यातील मालवाहतूकीचे डबे सोडून इतर प्रकारची विविधता आपण या आधीच्या लेखात बघीतली (ज्यांना ती वाचायची असेल त्यांनी या लेखाच्या खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करावे)  .मी आज या लेखात बोलणार आहे. डब्यांविषयी
तर मित्रांनो मालवाहतूकीसाठी भारतीय रेल्वेत मुख्यतः 7 प्रकारचे डब्बे वापरले जातात. या 7 प्रकाराचे उपप्रकार देखील पडतात.तर भारतीय रेल्वेत वापरले जाणाऱ्या डब्यांंचे 6मुख्य प्रकार पुढील प्रमाणे 
1)बाँक्स वँगन कव्हर्ड 
2)बाँक्स वँगन ओपन
3)टँकर वँगन
4)हुपर वँगेन
5)BLC
6)BRN
7)NWN
आता हे 7 प्रकार विस्ताराने बघूया 
1)बाँक्स वँगन कव्हर्ड = या प्रकारचे डब्बे, ज्या गोष्टींवर वातावरणाचा परीणाम होतो, अस्या वस्तू , जसे की अन्नधान्य, सिमेंट वगैरै वाहून नेण्यासाठी करतात. या प्रकारच्या वँगनचा रंग लाल अथवा निळा असू शकतो. या प्रकारच्या डब्याना रेल्वेचा मार्केट यार्ड मध्ये योग्य ठिकाणी पोहचण्यासाठी उंचावरुन ढभिकलता येवू शकते.(ज्याला रेल्वेचा भाषेत लूज शंटिंग म्हणतात)
2)बाँक्स वँगन ओपन = या प्रकारच्या वँगनचा उपयोग ज्या वस्तूवर वातावरणाचा काहीही परीणाम होत नाही,अस्या दगड ,खडी यांचा वाहनासाठी केला जातो.या प्रकारच्या डब्याना रेल्वेचा मार्केट यार्ड मध्ये योग्य ठिकाणी पोहचण्यासाठी उंचावरुन ढकलता येवू शकते.(ज्याला रेल्वेचा भाषेत लूज शंटिंग म्हणतात)
3)टँकर वँगेन = या प्रकारच्या वँगनचा उपयोग द्रव्य,अथवा वायू स्वरुपात असणाऱ्या पेट्रोल, नैसर्गिक वायू या सारख्या ज्वालाग्रही पदार्थांना किंवा दुधाची वाहतूक करतात. या प्रकारच्या डब्यातून ज्वालाग्रही पदार्थांची वाहतूक करत असल्याने  या प्रकारच्या डब्याना रेल्वेचा मार्केट यार्ड मध्ये योग्य ठिकाणी पोहचण्यासाठी उंचावरुन ढकलता येवू शकत नाहीत(ज्याला रेल्वेचा भाषेत लूज शंटिंग म्हणतात. आपण रेल्वेमध्ये लूज शंटिग ना करे ही सुचना  बघतो ते याच प्रकारच्या डब्यांवर)
बाँक्स वँगन कव्हर्ड 

4)हुपर वँगन : या प्रकारच्या डब्यातून कोळसा, खडी या सारख्या पदार्थांची ने आण करतात. यांच्या विशिष्ट अस्या रचनेमुळे या प्रकारच्या डब्यातून जे पदार्थ पसरवून टाकायचे आहेत, अस्या प्रकारच्या मालाची वाहतूक सहजतेने होतेया प्रकारच्या डब्याना रेल्वेचा मार्केट यार्ड मध्ये योग्य ठिकाणी पोहचण्यासाठी उंचावरुन ढकलता येवू शकते.(ज्याला रेल्वेचा भाषेत लूज शंटिंग म्हणतात)
5)BLC या प्रकारच्या वँगनमधून कंटनेरची वाहतूक सहजतेने होते.समुद्रामार्गे आलेले कंटनेर वाहून नेण्यासाठी या प्रकारच्या वँगन मध्ये विशेष सोय केलेली असते. ज्यामुळे गरज वाटली तर एकमेकांवर देखील हे कंटनेर सहजतेने बसतात .या प्रकारच्या डब्याना रेल्वेचा मार्केट यार्ड मध्ये योग्य ठिकाणी पोहचण्यासाठी उंचावरुन ढकलता येवू शकते.(ज्याला रेल्वेचा भाषेत लूज शंटिंग म्हणतात)
6) BRN या प्रकारचे वँगन विविध प्रकारचे ट्रक, रणगाडे वाहून नेण्यासाठी होतो. कोकणामध्ये जी रो रो नावाने परीचीत असणारी सेवा रेल्वेमार्फत देण्यात येते, त्यासाठी या प्रकारचे वँगन वापरले जातात.या प्रकारच्या डब्याना रेल्वेचा मार्केट यार्ड मध्ये योग्य ठिकाणी पोहचण्यासाठी उंचावरुन ढकलता येवू शकते.(ज्याला रेल्वेचा भाषेत लूज शंटिंग म्हणतात)
7) NWN आपण रेल्वे प्रवाश्यामध्ये सर्व खिडक्या बंद केलेली ,मुळातील प्रवाशी गाडी जी आता मालगाडी म्हणून वापरलघ जात आहे,अशी रेल्वे बघतो, ती NWN प्रकारची असते. प्रवाशी गाड्यांचे सपेशंन इतर मालगाड्यांपेक्षा चांगले असल्याने ज्या प्रवाशी डब्याला निर्माण होवून 21 वर्षे पुर्ण झाली आहेत. त्यातील आतील सीट काढून या डब्याची निर्मिती केली जाते. या डब्यातून 12टनापर्यत वाहतूक केली जाते.या डब्यातून प्रामुख्याने महागड्या कार, टँक्टर आदींची वाहतूक केली जाते.या प्रकारच्या डब्याना रेल्वेचा मार्केट यार्ड मध्ये योग्य ठिकाणी पोहचण्यासाठी उंचावरुन ढकलता येवू शकते.(ज्याला रेल्वेचा भाषेत लूज शंटिंग म्हणतात)
हुपर वँगन 

भारतीय रेल्वे असंख्य आश्चर्यकारक गोष्टींनी भरलेली आहे. त्यातील काही गोष्टी आता पर्यत आपण बघीतल्या . यापुढेही वेळोवेळी आपण त्या बघू, तुर्तास इथेच थांबतो, नमस्कार.
भारतीय रेल्वेच्या उपकंपन्यांची ओळख करून देणारा भाग पहिला वाचण्यासासाठी 
भारतीय रेल्वेच्या उपकंपन्यांची ओळख करून देणारा भाग दुसरा  वाचण्यासासाठी 
भारतीय रेल्वकडून चालवल्या जाणाऱ्या प्रवाशी गाड्याची माहिती देणारा भाग पहिला वाचण्यासाठी 
भारतीय रेल्वकडून चालवल्या जाणाऱ्या प्रवाशी गाड्याची माहिती देणारा भाग  दुसरा  वाचण्यासाठी 
भारतीय रेल्वेकडून चालवल्या जाणाऱ्या प्रवाशी गाड्यामध्ये असणाऱ्या डब्यांची माहिती देण्यासाठी 




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?